निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय,उमेदवारांना प्रचारासाठी एक दिवस जास्तीचा वेळ
Election Commission's big decision, one more day for candidates to campaign

राज्यातील 246 नगरपालिका व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचारात व्यस्त आहेत.
या जिल्हा परिषद, महापालिकांची नव्याने होणार आरक्षण सोडत
अशातच आता राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराच्या वेळेत बदल केला आहे. याआधी 30 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रचाराची मुदत होती.
चर्चा सोन्याची, पण भाव खाल्ला चांदीने
मात्र आता यात वाढ करण्यात आली असून आता नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
5 विमानतळं बॉम्बने उडवणार, धमकीने खळबळ
याबाबत माहिती देताना निवडणूक आयोगाचे अधिकारी जगदीश मोरे यांना म्हटले की, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असून,
त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ मधील तरतुदीनुसार 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 पर्यंत असेल.
बिहारमध्ये अजित पवारांचे 13 उमेदवारामध्ये सर्वात जास्त मते घेणारा उमेदवार 370 मतावर
निवडणुकांसंदर्भातील कायद्यात जाहीर प्रचाराचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजल्यापासून प्रचार पूर्णपणे बंद होईल.
त्यानंतर प्रचारसभा, मोर्चे आणि ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. त्याचबरोबर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारण करता येणार नाही.
प्रचाराची वेळ वाढवण्याचे कारण म्हणजे, नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अपक्ष उमेदवारांना 26 नोव्हेंबरला चिन्हाचे वाटप करण्यात आले.
अमेरिकेच्या कंपन्यांमुळे भारतावर मोठं संकट
त्यामुळे या उमेदवारांना प्रचारासाठी खुप कमी म्हणजे फक्त चार दिवसांचा वेळ मिळणार होता. मात्र आता निवडणूक आयोगाने प्रचाराला वेळ वाढवल्याने अपक्ष आणि स्थानिक पक्षांच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मतदान केंद्रांचा आढावा घेतला जात आहे.
बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ ;‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील
या निवडणुकांसाठी 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार मतदान करणार आहेत. यासाठी तब्बल 13 हजार 355 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.








