पुढील ४८ तासांत थंडीचा ‘ऑरेंज’ आणि ‘यलो’ अलर्ट जारी

An 'orange' and 'yellow' alert for cold weather has been issued for the next 48 hours.

 

 

उत्तरेकडील तीव्र थंड वाऱ्यांचा झंझावाती प्रवेश महाराष्ट्रात झाल्याने राज्यातील तापमानात मोठी घसरण झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीचा कडाका वाढला असून अनेक ठिकाणी रात्रीचे किमान तापमान

भारतीयांना आता अमेरिकेचा व्हिसा मिळवणे आणखी कठीण

नेहमीपेक्षा ४ ते ६ अंशांनी कमी नोंदले जात आहे. पुढील ४८ तासांत थंडी आणखी तीव्र होणार, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

 

राज्यातील अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, सोलापूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांत शुक्रवारी लक्षणीय थंडीची लाट जाणवली. जेऊर येथे राज्यातील सर्वात कमी ५.० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

ट्रम्प यांचा भारताला मोठा धक्का,भारतीयांच्या नोकऱ्या धोक्यात

अहिल्यानगरने सलग तिसऱ्या दिवशी राज्यातील सर्वात थंड जिल्हा म्हणून नोंद कायम ठेवली असून येथे किमान तापमान ६.६ अंश होते.

 

अहिल्यानगर आणि धुळे जिल्ह्याच्या काही भागांत तापमान ४ अंशांपर्यंत घसरल्याची नोंद आहे. धुळे व निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ६.१ अंश, जळगाव येथे ६.९ अंश,

ट्रम्प यांचा भारताला मोठा धक्का,भारतीयांच्या नोकऱ्या धोक्यात

तर परभणीमध्ये ५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. नाशिक, सातारा, वाशिम, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही किमान तापमान १० अंशांखाली राहिले.

 

हवामान तज्ज्ञांच्या मते, ‘ला निनो’ प्रक्रियेच्या प्रभावामुळे डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही महिने राज्यात सर्वाधिक थंड जाण्याची शक्यता आहे.

 

नव्या वर्षात युजर्सना झटका? Airtel, Jio, Vi चे रिचार्ज महागणार?
थंडीची तीव्रता लक्षात घेता हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा आणि छत्तीसगड परिसरासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे.

 

तर जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, नागपूर, गोंदिया यांसह अनेक जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मराठवाड्यातील जालना,

हवामान खात्याचा मोठा इशारा;राज्याला 11 डिसेंबरपर्यंत हुडहुडी

बीड, परभणी, नांदेड, लातूर आणि विदर्भातील गोंदिया व नागपूर जिल्ह्यांत पुढील काही दिवस तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

 

पंजाब, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार उत्तर प्रदेश सर्वच भागात थंडी वाढली आहे. उत्तरेकडून सध्या थंडीगार वारे वाहत आहे.

 

यामुळे राज्यातील थंडीत झपाट्याने वाढ झाली. पुढील काही दिवस थंडी वाढणार आहे. हेच नाही तर भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात थंडीची लाट येण्याची दाट शक्यता आहे.

 

काही जिल्ह्यांमध्ये पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेला. सकाळच्या वेळी सर्वत्र धुके बघायला मिळत आहे. मराठवाड्यासह विदर्भात थंडी वाढली आहे.

 

संपूर्ण डिसेंबर महिना थंडी असणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये शाळेच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला असून शाळा भरण्याची वेळ पुढे ढकलण्यात आली.

 

पुणे, मुंबई, नाशिकमध्येही थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडून शीत लहरी येत आहेत, ज्यामुळे गारठा अधिक वाढत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीमध्ये मोठी वाढ होईल

 

आणि राज्यातील हुडहुडी कायम राहिल. राज्यात जेऊरमध्ये नीचांकी तापमानाची नोंद झाली. 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सकाळी पूर्णपणे धुके पसरले होते.

 

परभणीत 5.5 अंश तापमानाची नोंद झाली. निफाड येथे 5.6 अंश सेल्सिअसची नोंद झाली. आहिल्यानगर, नाशिक येथे 8 पेक्षाही कमी अंश तापमान होते. वाशिम, सातारा, भंडारा, गोदिंया,

 

नागपूर येथे 10 अंश सेल्सिअसची नोंद झाली. राज्यातील बहुतांश भागात थंडी वाढताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर, हिंगोली, अकोला या जिल्ह्यांमध्येही थंडीचा कडाका वाढला आहे.

 

 

सायंकाळीच थंडी जाणवत आहे. उत्तर भारतात जरी थंडीचा कडाका असला तरीही केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील देखील नोव्हेंबरच्या सुरूवातीला पाऊस होता.

 

आता पूर्ण डिसेंबर महिना थंडी कायम राहणार आहे. थंडी वाढल्याने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ झाली. थंडी, खोकला आणि तापीच्या रूग्णात मोठी वाढ झाली आहे.

 

 

Related Articles