शक्तिपीठ चा मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत घोषणा

The route to the Shaktipeeth will be changed, Devendra Fadnavis announced in the Legislative Assembly.

 

 

नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तिपीठ मार्गाला विरोध होत असतानाच राज्य सरकारने या मार्गाचे संरेखन (अलायनमेंट) बदलण्याचा निर्णय घेतला असून नवा मार्ग सोलापूर आणि सांगलीतून जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

19 डिसेंबरला मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार;सर्वात मोठा राजकीय भूकंप

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना सांगितलं की, नागपूर गोवा द्रुतगति मार्ग हा एक अतिशय महत्त्वाचा महामार्ग आहे त्याचं नाव जरी नागपूर गोवा असलं तरी देखील याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे,

 

मराठवाड्याचे चित्र हा एक महामार्ग बदलून टाकेल, आणि या संदर्भात मागच्या काळामध्ये काही आक्षेप लोकांचे आले होते, विशेषता लोकांचा एक आक्षेप होता तो खरा होता की,

 

आपण जी अलाइनमेंट फॉलो केली होती ती लोकांनी आपल्या लक्षात आणून दिली. सोलापूर पासून आपली अलाइनमेंट ही जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला समांतर जात होती,

आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या या 40 नगरपरिषदाच्या निवडणुकीवर कोर्टाची टांगती तलवार कायम

आणि त्याच्यामुळे ग्रीनफिल्ड महामार्ग का बनवतो कारण यामुळे नवीन एरिया ओपन होतात, ग्रीन फील्ड महामार्गामुळे न जोडले गेलेले लोक त्याला जोडले जातातआणि तिथे विकास होतो, म्हणून जयकुमार गोरे

 

आणि सर्वांची आम्ही चर्चा केली आणि याची सोलापूर पासून एक वेगळी नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

नव्या वर्षात युजर्सना झटका? Airtel, Jio, Vi चे रिचार्ज महागणार?

पुढे बोलताना ते म्हणाले की, वेगळी नवीन अलाइनमेंट ही चंदगड पासून सोलापूर, सांगलीपासून जाते, आमचे जयंतराव पहिल्यांदा सुटून गेले होते, शक्तीपीठ मार्गातून आता त्यांच्याजवळ महामार्गाने पोहोचता येईल,

 

आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की जयंतरावच मला पत्र देतील की हा महामार्ग करा, याचा मोठा फायदा त्यांच्या मतदारसंघाला होणार आहे,

अमेरिका 30 हून अधिक देशांना प्रवेश करण्यास घालणार बंदी; लवकरच यादी जाहीर

पंढरपूर जवळून तो मार्ग जाईल आधी जॉईंट मेजरमेंट केले आहे, त्याचं संपादन आपण चालू केलेले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना दिली आहे.

दुसरं मोठं संकट, 6 राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात…

शक्तिपीठ प्रकल्प हा धार्मिक पर्यटन आणि राज्यातील संपर्क सुविधा वाढविणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. नागपूर ते गोवा हा मार्ग अनेक जिह्यांमधून जाणार असल्याने पर्यटन,

 

व्यापारी देवाणघेवाण आणि स्थानिक रोजगार निर्मितीसाठी तो लाभदायी ठरणार आहे. मात्र, धाराशीवमध्ये काही ठिकाणी स्थानिक पातळीवर विरोध दिसून आला होता.

भाजपचेच माजी मंत्री म्हणाले शिंदे गटाच्या आमदाराचा विजय बोगस मतदारांमुळे

सरकार कोणावरही अन्याय करणार नाही. त्यामुळे शक्तिपीठ मार्गाचे नवे संरेखन सोलापूर आणि सांगली जिह्यांमधून नेण्यात येईल, ज्यामुळे या दोन्ही जिह्यांचा शक्तिपीठाशी थेट संपर्क प्रस्थापित होईल, असे फडणवीसांनी सांगितले.

 

 

Related Articles