पुन्हा एका देशाने लावला भारतावर टेरिफ ; देशभरात खळबळ
Another country has imposed tariffs on India; this has caused a stir across the country.

भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला आहे. त्यामुळे आता अमेरिकेनं भारतावर लावलेला एकूण टॅरिफ 50 टक्क्यांवर पोहोचला आहे.
19 डिसेंबरला मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार;सर्वात मोठा राजकीय भूकंप
अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे भारत आणि अमेरिकेमधील संबंध ताणले गेले आहेत. निर्यातीला देखील मोठा फटका बसला आहे.
शक्तिपीठ चा मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत घोषणा
मात्र अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारतानं रशिया आणि चीनसोबतची निर्यात वाढवली आहे, याचा काही प्रमाणात भारताला फायदा होताना दिसत आहे.
मात्र दुसरीकडे भारतीय वस्तूंची आवक अमेरिकेत घटल्यामुळे तिथे मात्र महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकीकडे भारत अमेरिकन टॅरिफसोबत लढत असतानाच आता भारतासाठी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे, यामुळे भारताचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
विरोधक आक्रमक;अजितदादांच्या अडचणी वाढणार?
मॅक्सिकोने भारत, चीनसह आशिया खंडातील अनेक देशांवर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता भारत सरकार आणि भारतातील निर्यातदारांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
एका रिपोर्टनुसार मॅक्सिकोने केलेल्या या घोषणेनंतर भारतानं यावर आक्षेप देखील घेतला आहे, येत्या एक जानेवारीपासून मॅक्सिको भारतामधील विविध वस्तूंवर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावणार आहे.
आता राज्य निवडणूक आयोग कोर्टात जाणार
पीटीआयच्या एका रिपोर्टानुसार मॅक्सिकोने भारतामधील निर्यात होणाऱ्या विविध वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे,
या सर्व पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारकडून स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत, की या टॅरिफ धोरणानंतर भारत सरकार आपल्या देशातील निर्यातदारांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते सर्व पाऊलं उचलेल.
UIDAI ने केले 20 दशलक्ष आधार नंबर बंद
मॅक्सिकोने लावलेल्या या टॅरिफमुळे तब्बल 52000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त निर्यातीवर थेट परिणाम होणार आहे. भारत आणि मॅक्सिकोदरम्यान सुरू असलेल्या आयात -निर्यातीच्या आकड्यांवर नजर टाकल्यास स्पष्ट दिसून येते की,
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारतानं तब्बल 8.90 अब्ज डॉलर रुपयांच्या वस्तुंची निर्यात मॅक्सिकोमध्ये केली होती. तर मॅक्सिकोकडून 2.9 डॉलरची आयात केली होती,
तलाठ्यांकडे चकरा मारण्याची झंझट संपली ;आता डायरेक्ट मिळवा 7/12
अशा स्थितीमध्ये जर आता एक जानेवारीपासून मॅक्सिकोने भारतावर टॅरिफ लावला तर त्याचा मोठा परिणाम हा भारतावर होण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर मॅक्सिकोसोबत सरकारचं बोलणं सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
तर दुसरीकडे प्रशांत महासागरामध्ये आता तणाव प्रचंड वाढला आहे, महाशक्ती देश मैदानात उतरले आहेत. तैवानच्या मुद्द्यावरून चीन आणि जपानमध्ये आधीच संघर्ष पेटलेला होता,
त्यामध्ये चीनच्या बाजूने रशियानं कारवाई केली, त्यानंतर आता याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनं मोठं पाऊल उचललं आहे. जपानच्या समर्थनार्थ अमेरिकेनं आता आपलं सर्वात खतरनाक बी-2 बॉम्बर फायटर जेट बाहेर काढलं आहे,
सध्या अमेरिकेचं बी 2 बॉम्बर जपानच्या एफ-35 आणि एफ-15 सह एकूण 10 फायटर जेटसह पूर्व चीनी समुद्रात पेट्रोलिंग करताना दिसून येत आहे. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे,
याच आठवड्यात चीनने रशियाच्या फायटर जेटसोबत मिळून या भागामध्ये पेट्रोलिंग केलं होत, त्याला उत्तर देण्यासाठी आता अमेरिकेनं आपलं बी-2 बॉम्बर फायटर जपानच्या मदीतला पाठवलं आहे.
चीन आणि रशियाच्या वायुदलानं मंगळवारी इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये संयुक्तपणे एअर पेट्रोलिंग केली होती. या पेट्रोलिंगदरम्यान रशियाच्या टीयू 95 स्ट्रॅजेजिक मिसाईल वाहक बॉम्बर जेटने चीनच्या एच-6 बॉम्बर्स सोबत ईस्ट चायना,
जपानचा समुद्र आणि पश्चिम प्रशांत महासागरात टेहळनी केली. चीनचा जपानसोबत सुरू असलेल्या संघर्षच्या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत महत्त्वाची मानली गेली, त्यानंतर
आता जपानच्या मदतीला अमेरिका धावून आलं असून, जपान आणि अमेरिकेनं आता या भागात संयुक्त पेट्रोलिंग सुरू केलं आहे. दरम्यान यावर स्पष्टीकरण देताना रशियानं म्हटलं होतं की,
आम्ही सर्व आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन करून ही पेट्रोलिंग केली आहे, मात्र दुसरीकडे जपान आणि दक्षिण कोरियाने रशियाच्या या भूमिकेला विरोध केला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला तिसर्या महायुद्धाचा इशारा दिला आहे, युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये गेल्या तीन ते चार वर्षांपासून युद्ध सुरूच आहे,
आता हे युद्ध थांबलं नाही तर जग तिसऱ्या महायुद्धाकडे जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. जे देश युक्रेन आणि रशियाला प्रत्यक्ष
किंवा अप्रत्यक्षपणे मदत करतात अशा सर्व देशांना हा माझा इशारा असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं होतं, आणि त्यानंतर त्यांनी आता थेट बी 2 बॉम्बर जपानच्या बाजूनं मैदानात उतरवल्यामुळे जगात खळबळ उडाली आहे.








