महाराष्ट्राच्या शेजारी GPS ट्रॅकर असलेल्या पक्षाच्या घिरट्या; सुरक्षा यंत्रणा सतर्क

A bird with a GPS tracker was spotted circling near Maharashtra's border; security agencies are on high alert.

 

 

कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार किनारपट्टीवर बुधवारी दुपारच्या सुमारास एक स्थलांतरित समुद्री पक्षी आढळून आलाय. या पक्षाच्या अंगावर चिनी बनावटीचे जीपीएस ट्रॅकर उपकरण बसविण्यात आलेले होते.

दोन्ही ठाकरेंच्या युतीची घोषणा ,काय असेल फार्मुला ?

भारतीय नौदलाच्या अत्यंत महत्त्वाच्या ‘आयएनएस कदंब’ तळाजवळ हा पक्षी सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडालीय.

 

दरम्यान, या घटनेची स्थानिक पोलिसांसह वन विभाग आणि नौदल प्रशासनाच्या संयुक्त पथकाने चौकशी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतावर हेरगिरी करण्याचा कोण प्रयत्न करतंय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बापरे.. शिक्षक भरती घोटाळ्यात शिक्षणाधिकाऱ्याने केला 12 कोटींचा भ्रष्टाचार

तर कारवारच्या नौदल तळावर चीनची नजर आहे का? असा प्रश्नही या निमित्याने विचारला जाऊ लागला आहे. परिणामी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून त्या दृष्टीने आता पाऊले उचलली जात आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवारच्या किनारपट्टीवर बुधवारी दुपारच्या सुमारास एक पक्षी जखमी अवस्थेत पडून होता. त्याच्या पाठीवर जीपीएस ट्रॅकिंग उपकरण बसविण्यात आलेले होते.

चार तहसीलदारांसह 10 जणांवर निलंबनाची कारवाई

ही बाब लक्षात येताच स्थानिकांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी या पक्ष्याला ताब्यात घेऊन त्याला वनविभागाकडे सुपूर्त केले.

 

वन अधिकाऱ्यांनी पक्ष्याच्या अंगावर लावलेले उपकरण तपासले असता, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक युनिट आणि लहान सोलर पॅनल असल्याचे आढळून आले.

भाजपचेच माजी मंत्री म्हणाले शिंदे गटाच्या आमदाराचा विजय बोगस मतदारांमुळे

धक्कादायक बाब म्हणजे, या पक्षाच्या अंगावर बसविण्यात आलेल्या उपकरणाला एक चिठ्ठी जोडलेली होती, ज्यावर एक ई-मेल आयडी लिहिलेला होता.

 

 

सदरील पक्षी कुणालाही सापडल्यास त्याने दिलेल्या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, अशा आशयाचा मजकूर या चिठ्ठीत नमूद केलेला होता. पोलिसांनी या ई-मेलची तपासणी केली असता,

पुन्हा एका देशाने लावला भारतावर टेरिफ ; देशभरात खळबळ

तो बीजिंगमधील चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस अंतर्गत असलेल्या रिसर्च सेंटर फॉर इको-एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस या संस्थेशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

 

Related Articles