मराठवाड्यात एकाच कुटुंबातील 4 जणांचा धक्कादायक अंत
The shocking death of four members of the same family.

नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड तालुक्यातील जवळा गावात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या गावातील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
दोन्ही ठाकरेंच्या युतीची घोषणा ,काय असेल फार्मुला ?
दोन मुलांनी रेल्वेखाली उडी मारून आपलं आयुष्य संपवलंय. तर त्यांचे आई-वडील घरात मृतावस्थेत आढळले. त्यामुळे या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
मुदखेड तालुक्यातील जवळा गावात राहणाऱ्या लखे कुटुंबातील ही घटना आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं आणि संभ्रमाचं वातावरण आहे.
बापरे.. शिक्षक भरती घोटाळ्यात शिक्षणाधिकाऱ्याने केला 12 कोटींचा भ्रष्टाचार
एकाच कुटुंबातील चार जणांच्या आयुष्याचा अशा धक्कादायक पद्धतीने अंत झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या चौघांनी आत्महत्या केली की काही घातपात झालाय, याविषयी पोलिसांचा तपास सुरू आहे.
नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जवळा मुरार गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पहायला मिळतोय. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूमागील कारण काय आहे,
महाराष्ट्राच्या शेजारी GPS ट्रॅकर असलेल्या पक्षाच्या घिरट्या; सुरक्षा यंत्रणा सतर्क
याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. बजरंग रमेश लखे (वय 22 वर्षे ) आणि उमेश रमेश लखे (वय 25 वर्षे ) या दोन सख्ख्या भावांनी मुगट रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेखाली उडी मारून आपलं आयुष्य संपवलंय.
तर दुसरीकडे त्यांचे वडील रमेश होनाजी लखे (वय 51 वर्षे) तर आई राधाबाई रमेश लखे (वय 44 वर्षे) हे दोघं त्यांच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.
5 लाखांची लाच घेताना GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक
मोठा मुलगा उमेश लखे हा मनसेचा मुदखेडचा माजी तालुका उपाध्यक्ष असल्याची माहिती समोर येत आहे. तर सामाजिक कार्यातही उमेशचा सक्रिय सहभाग होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बजरंग, उमेश, रमेश आणि राधाबाई लखे या चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
हवामान विभागाचा मुसळधार पाऊस, आणि अतिवृष्टीचा इशारा
या चौघांचे कोणाशी वाद होते का, कौटुंबिक वादातून असं टोकाचं पाऊल उचललंय का किंवा त्यांचा घातपात झालाय का, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळावरून सुसाइड नोट सापडली का, याचीही चौकशी सुरू आहे.









