नगर परिषद निवडणुकीत EVM मशीनवरील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे नाव झाकले, मोठा गदारोळ
In the municipal council elections, the name of the NCP candidate on the EVM machine was covered up, leading to a major uproar.

राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यात महापालिका निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहितादेखील संपुष्टात आली आहे.
मराठवाड्यात एकाच कुटुंबातील 4 जणांचा धक्कादायक अंत
पण त्याचवेळी महापालिका क्षेत्रातील प्रशासनाच्या कामात वाढ झाली आहे. हे सर्व सुरू असतानाच नगरपालिका निवडणुकीत झालेल्या निष्काळजीपणा आणि
भारताच्या अरुणाचल प्रदेशवर चीनची वाकडी नजर ,पेंटागॉनच्या रिपोर्टने जग हादरल
बेजबाबदारपणामुळे भंडारा नगरपालिका मतदान केंद्रातील ७ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.
आता विमानाचा हा नियम ट्रेनसाठी देखील लागू,रेल्वेचा प्रवाशांना मोठा दणका
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन मधील एका मतदान केंद्रावरील EVM मशीनमध्ये उमेदवाराच नावचं नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी मतदान केंद्र प्रमुखासह सात कर्मचाऱ्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर सावन कुमार यांनी
काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश
निवडणूक निर्णय अधिकारी माधुरी तिखे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
भंडारा नगरपालिकेच्या प्रभाग तीनमधील मतदान केंद्रावरील EVM मशीनमध्ये पाच उमेदवार आणि एक नोटा असे सहा पर्याय देण्यात आले होते. मतदान केंद्र अधिकारी आणि तेथील कर्मचाऱ्यांनी मतदान यंत्र तयार करताना
ठाकरे बंधूच्या युतीबाबत घोषणेची मोठी अपडेट समोर
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार करूणा राऊत यांच्या नावसह नोटा पर्याय झाकला गेला. त्यामुळे प्रत्यक्षात EVM मशीनवर फक्त चारच उमेदवारांचे पर्याय दिसत होते.
त्यामुळे या चारच उमेदवारांना मते मिळाली. यात करूणा राऊत यांच्या नावाचा पर्यायच न दिसल्यामुळे आपल्याला मतेच मिळाली नाहीत, असा आरोप राऊत यांनी केली.
आता विमानाचा हा नियम ट्रेनसाठी देखील लागू,रेल्वेचा प्रवाशांना मोठा दणका
या संपूर्ण प्रक्रियेत EVM मशीन तपासल्यानंतर मतदान केंद्र प्रमुखासह सात कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. माधुरी तिखे आणि जुम्मा प्यारेवाले यांना ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.









