मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी

An arrest warrant has been issued against Minister Nitesh Rane and two other MLAs.

 

 

कोरोना कालावधीतील एका आंदोलनप्रकरणी कुडाळ न्यायालयाने भाजपच्या तीन नेत्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. मंत्री नितेश राणे , आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाने दणका दिला.

ठाकरे बंधूंची युती होताच शरद पवारांचा मोठा निर्णय

राज्याचे कैबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना कुडाळ न्यायालयाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. संविधान बचाव आंदोलन केल्याप्रकरणी आमदार प्रविण दरेकर

5 लाखांची लाच घेताना GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक

आणि आमदार प्रसाद लाड यांनाही अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 26 जून 2021 रोजी झालेल्या ओबीसी आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

नगर परिषद निवडणुकीत EVM मशीनवरील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे नाव झाकले, मोठा गदारोळ

सिंधुदुर्गात राजन तेली यांच्यासह आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य 42 जणांवर आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

5 लाखांची लाच घेताना GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक

त्याप्रकरणी, न्यायालयात आज झालेल्या सुनावणीस आमदार निलेश राणे आणि राजन तेली तसेच अन्य आरोपी उपस्थित होते. मात्र, नितेश राणे यांच्यासह अन्य 5 जण गैरहजर होते.

भारताच्या अरुणाचल प्रदेशवर चीनची वाकडी नजर ,पेंटागॉनच्या रिपोर्टने जग हादरल

मंत्री नितेश राणे वारंवार न्यायालयाच्या तारखांना गैरहजर राहिल्याने न्यायालायाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.

शक्तिपीठ चा मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत घोषणा

दरम्यान, न्यायालयाने अनुपस्थित राहिलेल्या नितेश राणे यांच्या वकिलांचा विनंती अर्ज नाकारला आहे. त्यामुळे, मंत्री महोदयांना कोर्टाकडून दणका देण्यात आला आहे.

मराठवाड्यात एकाच कुटुंबातील 4 जणांचा धक्कादायक अंत

 

Related Articles