शरद पवार लवकरच भाजप एनडीए मध्ये येणार ,मंत्र्याच्या वक्तव्याने चर्चाना उधाण
Sharad Pawar will soon join the BJP-led NDA; the minister's statement has fueled speculation.

भाजपा आणि शिवसेनेकडे इच्छुकांची गर्दी जास्त असल्याने चर्चा सुरू आहेत. कोणता प्रभाग सोडायचा आणि कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे. इच्छुक जास्त आहेत आणि जागा कमी आहेत,
पाहा VIDEO ;मोदींचा कार्यक्रम संपताच ,कुंडीचोर प्रकटले ,उडाली झुंबड
म्हणून कोणती जागा घ्यायची आणि लढवायची ही चर्चा होणे गरजेचे आहे. आज किंवा उद्या आमची महायुतीची घोषणा होईल” असं संजय शिरसाट म्हणाले. भाजप-शिवसेनेने छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक युतीमध्ये लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन
“दोन-चार जागेवर जे अडलेलं आहे, त्यावर मंत्री अतुल सावे आणि मी आज चर्चा करणार आहोत आणि योग्य निर्णय घेणार आहोत” असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.
“युती बाबतची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. कोण कुठे लढणार याची यादी एक-दोन दिवसात फायनल होईल. अतुल सावे आणि मी आज फायनल चर्चा करून, ती यादी भाजपा आणि शिवसेनेच्या वरिष्ठांना पाठवू
चौदा हजार पुरुषांनी लाडकी बहिणी बनून 21 कोटी लाटले
आणि नंतर जाहीर केली जाईल” असं शिरसाट म्हणाले. “शरद पवार हे जास्त काही विरोधी पक्षात राहू शकत नाहीत. त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास बघितला तर त्यांनी अनेक वेळा असे उलटे-सुलटे प्रयत्न केलेले आहेत” असं संजय शिरसाट म्हणाले.
“अजित दादा सत्तेमध्ये आहेत. त्यांच्याकडे महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे अजित दादा कोणीकडे जाणार नाहीत. परंतु शरद पवार एनडीए मध्ये येऊ शकतात. शरद पवार यांना एनडीएमध्ये घ्यायचं का नाही?
हवामान विभागाचा राज्यात थंडीचा यलो अलर्ट; कसं असेल हवामान?
हा निर्णय भाजपचे वरिष्ठ ठरवतील. राष्ट्रवादीची भाजप बरोबर आघाडी आहे आणि आमची युती भाजप बरोबर आहे. म्हणून भाजपची शरद पवार यांच्याबद्दल काय भूमिका असेल ती भाजपने ठरवावी” असं संजय शिरसाट म्हणाले.
“शरद पवार यांना एनडीए मध्ये घ्यायचं का नाही हे एनडीएच्या नेत्यांनी ठरवायचे आहे, आम्ही पहिल्यापासून सांगत आलो आहेत भाजपची
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी
आणि आमची नैसर्गिक युती आहे. इतर घटक पक्ष एनडीएमध्ये येत असतील तर त्याला भाजप जबाबदार राहील आम्ही नाही” असं शिरसाट म्हणाले.








