उमेदवारी न मिळाल्याने पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न
Disappointed at not receiving the nomination, he attempted self-immolation by dousing himself with petrol.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहरात जोरदार राजकीय नाट्य रंगताना पाहायला मिळाले.
उमेदवारी न मिळालेल्या दिव्या मराठे या महिलेने भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने भाजपच्या कार्यालयाबाहेरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
मोठी बातमी; शिंदेसेना–भाजप युती तुटली
आज महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजपच्या छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयाबाहेर एबी फॉर्म घेण्यासाठी इच्छूकांनी प्रचंड गर्दी केली होती.
यावेळी काही जणांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. तेव्हा दिव्या मराठे या उमेदवारी नाकारण्यात आलेल्या इच्छूक उमेदवार आणि काही कार्यकर्त्यांनी अतुल सावे
दोन्ही ठाकरेंच्या युतीची घोषणा ,काय असेल फार्मुला ?
आणि भागवंत कराडांच्या केबिनचा दरवाजा तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. तसेच या महिलेने बाटलीतून पेट्रोल आणले होते. तिने हे पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
मात्र, पोलिसांनी तिला वेळीच पकडल्याने पुढील अनर्थ टळला. दिव्या मराठे यांच्यासह भाजपमधील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
यापैकी काही जणांनी निवडणूक लढवण्यासाठी नोकरी सोडली होती. मात्र, ऐनवेळी पक्षाने उमेदवार बदलला, असे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
अखेर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अजित पवारांकडून घोषणा
दिव्या मराठे या इच्छूक महिला उमेदवाराने भाजपच्या स्थानिक नेतृत्त्वावर गंभीर आरोप केले. मी पक्षासाठी 15 केसेस अंगावर घेतल्या. मी नगरसेवक असताना माझ्या प्रभागात प्रचंड विकास केला.
तरीही भाजपने मला उमेदवारी दिली नाही. मागच्यावेळी सुध्दा माझं नाव होत सर्व्हेत, तरीही मला तिकीट नाकारले होते. मी गेल्या 18 वर्षांपासून पक्षात काम करत आहे. मी अतुल सावे यांना याचा जाब विचारणार आहे, असे या महिलेने म्हटले.
हवामान विभागाचा मोठा इशारा , पुढचे 6 दिवस धोक्याचे
प्रभाग २० मधील इच्छूक उमेदवार दिव्या उल्हास मराठे यांनी तिकीट नाकारल्याने आज भाजपच्या प्रचार कार्यालयात नेत्यांना अक्षरशः धारेवर धरले. आम्ही पक्षाशी एकनिष्ठ होतो.
मला उमेदवारी मिळायला पाहिजे होती. जेव्हा पक्ष कठीण काळात होता, तेव्हा माझी मुले लहान असतानाही मी घरादाराचा विचार न करता पक्षाचे काम केले.
नगर परिषद निवडणुकीत EVM मशीनवरील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे नाव झाकले, मोठा गदारोळ
आज पक्ष एक नंबरवर आल्यावर आम्हा जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. नेत्यांच्या बायका एसीमध्ये बसतात आणि कार्यकर्त्या महिलांनी मात्र रस्त्यावर उतरून संघर्ष करायचा का, असा सवाल दिव्या मराठे यांनी विचारला.









