गौतम अदानींमुळे देशाच्या राजकारणात लवकरच मोठा भूकंप?

Will Gautam Adani soon cause a major upheaval in the country's politics?

 

 

 

नवीन वर्षात महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता राज्यातील बड्या नेत्याने व्यक्त केली आहे.

मतदानापूर्वीच भाजपचे 3 उमेदवार जिंकले

सध्या राज्यात महापालिका निवडणुकींची धूमधाम असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राज ठाकरेंची मनसे असे सर्वच प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांच्या साथीने आणि अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उभे आहेत.

 

राजकीय तडजोडी केल्या जात असून वेगवेगळ्या आघाड्या आणि युतींच्या माध्यमातून स्थानिक राजकारणानुसार जवळपास सर्वच पक्षांनी एकमेकांशी जुळवून घेत या निवडणुकींना सामोरे जाण्याचं निश्चित केलं आहे.

14 ठिकाणी महायुती तुटली, निष्ठा पैशाच्या पावसात वाहून गेली

मात्र असं असतानाच या निवडणुकीदरम्यान झालेल्या एका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात भारताच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आणि जगातील 11 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानींच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रसचे संस्थापक शरद पवार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 

पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असून ही एकत्रीकरणाची पहिली पायरी असल्याचं मत, काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे.

तो थेट मेलेला पोपट घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या धुरळ्यादरम्यान वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानामुळे वेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. वडेट्टीवार यांनी, “उद्योगपती अदानी यांच्या मध्यस्थीने शरद पवार एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यता आहे,” असं म्हटलं आहे.

 

पुढे बोलताना वडेट्टीवर यांनी, “मोदींनाही लोकसभेत खासदारांची गरज आहे. शरद पवार यांच्याकडेही आमदार कमी आहेत.

1 जानेवारीपासून रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल

पुण्यात दोन्ही गट एकत्र आल्याने एकत्रीकरणाची पहिली पायरी गाठल्याचे स्पष्ट झाले असून पुण्यातील ही युती स्थानिक स्तरावरची तात्पुरती युती ठरते का याकडे सर्वांचे लक्ष आहे,” असं मोठं विधान केलं आहे.

 

खरोखरच पुण्यातील ही पहिली स्थानिक स्तरावरील युती तात्पुरती ठरते की पुढे यामधून इतर मार्गांवर राज्याचं आणि पर्यायाने देशाचं राजकारण जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

फडणवीस टप्प्याटप्प्यानं गेम करतील, संजय राऊतांचा कुणाला इशारा?
28 डिसेंबर रोजी बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलेन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजेन्स’ या संस्थेच्या उद्घाटनासाठी गौतम अदानी प्रमुख पाहुणे म्हणून सपत्नीक उपस्थित होते.

 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अदानी यांचे बारामती विमानतळावर स्वागत केलं. तिथून अदानींच्या कारचं सारथ्य आमदार रोहित पवार यांनी केलं. कार्यक्रमस्थळी अदानींचं स्वागत करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.

5 लाखांची लाच घेताना GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक

तर शरद पवारांनी अदानींचे मुख्य इमारतीमध्ये स्वागत केलं. या वेळी भाषणादरम्यान अदानींनी शरद पवार माझे मेंटॉर असल्याचं म्हटलं. तर सुप्रिया सुळेंनी गौतम अदानी हे पवार कुटुंबाच्या जवळची व्यक्ती असल्याचं सांगत ते भावासारखे असल्याचं सांगितलं होतं.

 

 

Related Articles