परभणीत काँग्रेसचा खेळखंडोबा;जेष्ठ नेत्याचा पुत्र भाजपचा उमेदवार ,आता कोणाचा प्रचार करणार ?

Congress is in disarray in Parbhani; the son of a senior leader is the BJP candidate, so whose campaign will they support now?

 

 

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून आता जोरदार मोर्चेबांधणी केली जात असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे उमेदवारांची अंतिम यादी ठरवण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी चांगलीच कसरत करावी लागते आहे.

 

अशातच महायुती आणि महविकास आघाडीमध्ये आद्यपा बहुतांश ठिकाणी उमेदवारांच्या यादी संदर्भात तिढा कायम आहे. असे असताना ऐन महापालीका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नेत्यांच्या पोरांचे पक्षप्रवेश चांगलेच चर्चेत आले आहे.

लाचखोर महिला अधिकाऱ्याला 15 हजारांची लाच घेताना अटक

परभणीत काँग्रेस नेते माजी खासदार तुकाराम रेंगे याचे पुत्र दत्तराव रेंगे यांनी भाजपमध्ये तर भाजप नेते विजय वरपुडकर यांचे चिरंजीवांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केलाय.

 

परभणी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाचे पदाधिकारी इकडून तिकडे पक्षप्रवेश करत आहेतच, त्याच बरोबर नेत्यांची मुलांचेही प्रवेश होते आहेत.

शक्तिशाली ‘बॉम्ब’ चक्रीवादळ ; 48 तास धोक्याचे

परभणीतील काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांचे चिरंजीव दत्तराव रेंगे यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला आहे.

 

दत्तराव रेंगे हे प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढवणार आहेत. तर भाजप नेते विजय वरपुडकर यांचे चिरंजीव ऐश्वर्य वरपूडकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केलाय.

पाहा VIDEO ;मोदींचा कार्यक्रम संपताच ,कुंडीचोर प्रकटले ,उडाली झुंबड

आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झालाय. ते प्रभाग 5 मधून निवडणूक लढवणार आहेत. एकीकडे घराणेशाहीवर टीका केली जात असताना दुसरीकडे या पक्षप्रवेशाने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपास्थीत केले जात आहे.

 

परभणी महानगर पालिका निवडणुकी शिवसेना आणि भाजपमध्ये अंतिम बोलणी आज होणार आहे त्यामुळे संध्याकाळपर्यंत युतीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

भाजप दोन पावले मागे जाईल अथवा आम्ही जाऊ, पण परभणीच्या विकासासाठी आम्ही महापालिकेत युती करू, असे शिंदे सेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

 

तर आम्हाला शिवसेने बरोबर युती करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे आज शिंदेसेनेबरोबर बैठक घेवून युतीचा निर्णय होईल, असे भाजप नेत्यांनी सांगितले आहे.

हवामान विभागाचा मोठा इशारा , पुढचे 6 दिवस धोक्याचे

त्यामुळे समसमान जागांवर युती होते की कुणाला किती जागा मिळतात? हे आज युती फायनल झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र सेना भाजपच्या युतीचा तिढा आज मिटणार असल्याची शक्यता आहे.

 

 

Related Articles