नव्या वर्षाची सुरुवात महागाईपासून ,एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ
New year begins with inflation, LPG cylinder prices increase sharply

2026 ला जोरदार सुरूवात झाली असून लोकांमध्ये नवीन वर्षाचा मोठा उत्साह बघायला मिळतोय. मात्र, 2026 च्या सुरूवातीलाच महागाईने मोठा झटका दिला.
सरकारचा नवा कायदा; आता गुन्हा केल्यावर शिक्षा नाही?
याचा परिणाम आपल्या सर्वांच्या घरावर होईल. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. हे दर 1 जानेवारी 2026 पासून लागू होतील.
मुंबई, दिल्ली आणि कोलकाता, हैद्राबाद यासारख्या प्रमुख शहरांसह देशभरात एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली.
लाचखोर महिला अधिकाऱ्याला 15 हजारांची लाच घेताना अटक
तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या 1 किलो आकाराच्या सिलेंडरच्या किंमती वाढवल्या आहेत, ज्यामुळे प्रति सिलिंडर 111 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर ज्याची किंमत पूर्वी 1580.50 रूपये होती, त्याची किंमत आता 1691.50 झाली आहे.
“या” महापालिकेची निवडणूक रद्द होणार?
गेल्या अनेक दिवसांपासून देशात महागाई सातत्याने वाढताना दिसत आहेत. त्यामध्येच आता एलपीजी सिलेंडरच्या भावात थेट वाढ करण्यात आली. हे नवीन दर वर्षाच्या पहिल्या दिवसापासून लागू करण्यात आली.
सरकारचा नवा कायदा; आता गुन्हा केल्यावर शिक्षा नाही?
महागाई कमी केल्याचा दावा सातत्याने सरकारकडून केला जात असला तरीही ही वस्तूस्थिती आहे की, मागील काही वर्षांपासून महागाईत मोठी वाढ झाली आहे.
5 लाखांची लाच घेताना GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक
मुंबईत एलपीजी सिलेंडरची किंमत पूर्वी 1531.50 होती, ती आता वाढून 1642.50 झाली आहे. चेन्नईमध्ये किंमत 1739.5 वरून 1849.50 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
1 नोव्हेंबर रोजीही व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती कमी करण्यात आल्या होत्या, ज्यामुळे ते सर्व शहरांमध्ये स्वस्त झाले होते. मात्र, आता परत सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.
नगर परिषद निवडणुकीत EVM मशीनवरील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे नाव झाकले, मोठा गदारोळ
1 नोव्हेंबर रोजी 19 किलोच्या सिलेंडरची किंमत दिल्लीमध्ये 1594.50 रुपयांवरून 1590 रुपये झाली आणि कोलकातामध्ये ती 1700.50 रुपयांवरून कमी झाली. नवीन वर्षात महागाई कमी होण्याची लोकांना अपेक्षा होती.
मात्र, प्रत्यक्षात उलटेच घडले. महागाई कमी होण्यापेक्षा वाढताना दिसत आहेत. त्यामध्येच वर्षाच्या पहिल्याच दिवशी अशाप्रकारचा मोठा झटका तेल कंपन्यांनी सर्वसामान्य नागरिकांना दिला आहे.
बापरे.. शिक्षक भरती घोटाळ्यात शिक्षणाधिकाऱ्याने केला 12 कोटींचा भ्रष्टाचार









