निवडणुकीआधीच 22 उमेदवार बिनविरोध;पाहा कोणत्या पक्षाचे कोण विजयी
22 candidates elected unopposed even before the elections; see which candidates from which parties have won.

कल्याण-डोंबिवली महापालिकेतून भाजपने विजयाच शंखनाद फुंकला होता. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात येथे भाजपच्या 5 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.
तर, केडीएमसीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध आले आहेत. त्यामुळे, केडीएमसी महापालिकेत भाजप-शिवसेना युतीने 9 उमेदवार बिनविरोध करत मोठी आघाडी घेतली आहे.
दरम्यान, राज्यातील 8 महापालिकेत एकूण 22 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून येताच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
लाचखोर महिला अधिकाऱ्याला 15 हजारांची लाच घेताना अटक
राज्यात बिनविरोध निवडून आणण्याचं काम सुरु आहे. धमक्या आणि ब्लॅकमेल करून बिनविरोध निवडून आणले जाताय. भाजपा आणि मिंदेमध्ये चढाओढ सुरु आहे.
प्रत्येक ठिकाणी पालकमंत्र्याचा दबाव आणाला जातोय. याला तुम्ही लोकशाही म्हणता?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
1 जानेवारीपासून रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल
जळगावला उमेदवारांचं अपहरण करण्यात आलं. धमक्या देऊन अर्ज मागे घ्यायला लावले. आम्हालाही धमक्या सगळीकडून आल्या, पण आम्ही धमक्यांना भीक घालत नाही, असंही संजय राऊतांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी 15 जानेवारीला निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीआधीच प्रभाग क्र. 24 मधील निवडणूक निकालांनी स्थानिक राजकारणात शिवसेना शिंदे गटाचे स्थान अधिक भक्कम केले आहे.
तो थेट मेलेला पोपट घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात
या प्रभागात शिवसेना ठाकरे गटाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भारतीय जनता पार्टीचाही एक उमेदवार विजयी झाला आहे. तिन्ही जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेना शिंगे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.
8 महापालिकेतील भाजपचे एकूण 12 उमेदवार बिनविरोध
1. कल्याण-डोंबिवली – वॉर्ड १८ मधून भाजपच्या रेखा चौधरी
2. कल्याण-डोंबिवली – वॉर्ड २६ क मधून भाजपच्या आसावरी नवरे
3. कल्याण-डोंबिवली – वॉर्ड २६ ब भाजपच्या रंजना पेणकर
गौतम अदानींमुळे देशाच्या राजकारणात लवकरच मोठा भूकंप?
4. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ ब मधून भाजपच्या ज्योती पाटील
5. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २७ अ मधून भाजपच्या मंदा पाटील
6. धुळे – वॉर्ड क्र १ मधून भाजपच्या उज्ज्वला भोसले
7. धुळे – प्रभाग ६ ब मधून भाजपच्या ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील
8. धुळे – प्रभाग १७ मधून भाजपच्या सुरेखा उगले
9.पनवेल – वॉर्ड क्र १८ ब मधून भाजपचे नितिन पाटील
लाचखोर महिला अधिकाऱ्याला 15 हजारांची लाच घेताना अटक
10.भिवंडी – प्रभाग १७ अ मधून भाजपचे सुमित पाटील
11.जळगाव – प्रभाग १२ ब मधून भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे
12.पिंपरी-चिंचवड – भोसरी प्रभाग 6 मधून भाजपचे रवि लांडगे बिनविरोध
दोन महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचे 7 बिनविरोध-
1. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ अ मधून शिंदेंच्या शिवसेनेचे रमेश म्हात्रे
2. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ ब मधून शिंदेंच्या शिवसेनेचे विश्वनाथ राणे
3. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ क मधून शिंदेंच्या शिवसेनेचे वृषाली जोशी
परभणीत काँग्रेसचा खेळखंडोबा;जेष्ठ नेत्याचा पुत्र भाजपचा उमेदवार ,आता कोणाचा प्रचार करणार ?
4.कल्याण-डोंबिवली – प्रभाग २८ अ मधून शिंदेच्या शिवसेनेचे हर्षल राजेश मोर
5. जळगाव – प्रभाग १८ अ मधून शिंदेंच्या शिवसेनेचे गौरव सोनवणे
6. जळगाव – प्रभाग क्रमांक 9 अ मधून शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी बिनविरोध
7. जळगाव – प्रभाग 9 ब मधून शिवसेना शिंदे गटाच्या प्रतिभा देशमुख बिनविरोध
नगरमध्ये अजित पवाराचे दोन बिनविरोध
1.नगर – प्रभाग ८ ड मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कुमार वाकळे
“या” महापालिकेची निवडणूक रद्द होणार?
2.नगर – प्रभाग क्रमांक 14 अ मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे
मालेगावमध्ये
1. मालेगाव – वॉर्ड ६ क मधून इस्लाम पार्टीच्या मुनिरा शेख फकीर मोहम्मद
नव्या वर्षाची सुरुवात महागाईपासून ,एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ








