शिंदेंना मोठा धक्का; शिवसेनेच्या विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
A major blow to Shinde; approximately 200 office-bearers, including Shiv Sena's divisional heads, have submitted their collective resignations.

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, महायुतीच्या नेत्यांची धाकधूक वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
यामध्ये सर्वाधिक बंडखोरी ही शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेतून ३५ ते ४० ठिकाणी बंडखोरी झाली आहे
निवडणुकीआधीच 22 उमेदवार बिनविरोध;पाहा कोणत्या पक्षाचे कोण विजयी
आणि प्रत्येकालाच आपण निवडून येण्याची खात्री आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांसमोर डोकेदुखी वाढली असून त्याच वेळी, गोरेगाव दिंडोशीमध्ये, विभागप्रमुखांसह २०० जणांनी राजीनामा दिल्याची मोठी बातमी समोर येत आहे.
महायुतीच्या अनेक उमेदवारांनी अद्याप उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. शिंदेंच्या अनेक शिवसेनेच्या नेत्यांनी अर्ज मागे घेतले नाहीत.दरम्यान, अनेक बंडखोरांनी आम्ही निवडून येणार असल्याचे सांगत अर्ज मागे घेणार नाही,
न्यूयॉर्कच्या महापौर पदाची शपथ घेताच भारताच्या तिहार जेलमध्ये पाठवले पत्र
अशी भूमिका घेतल्याची माहिती मिळत आहे. या बंडखोरांना समजवण्यासाठी नेत्यांची एक फळीच कामाला लागली आहे. परिणामी शिंदेंच्य शिवसेनेसमोर बंडोबांचं मोठे आव्हान आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे गोरेगाव आणि दिंडोशी विधानसभा प्रमुख गणेश शिंदे हे पक्षातील सर्व सदस्य राजीनामा देत आहेत. मुलगी श्रेया शिंदे हिने अपक्ष अर्ज भरला आहे आणि ती माघार घेणार नाही अशी गणेश शिंदे यांची भूमिका आहे.
जगाचा अंत जवळ आला? पैगंबरांची ‘ती’ भविष्यवाणी पुन्हा जिवंत;पाहा VIDEO
गोरेगाव हिंदूश्री विभागाच्या शाखा प्रमुख गणेश शिंदे यांच्यासह, गटात प्रमुख आणि अनेक प्रमुख अधिकारी राजीनामा देत असल्याचे वृत्त आहे.
त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या आधी गोरेगाव दिंडोशी भागात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे.
गोरेगाव विधानसभेत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून पक्षात नव्याने पदावर येऊन उमेदवारी न दिल्याने जुने शिवसैनिक संतप्त आहेत.
पाहा VIDEO ;मोदींचा कार्यक्रम संपताच ,कुंडीचोर प्रकटले ,उडाली झुंबड
त्यामुळे विभागप्रमुखांसह सुमारे २०० अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. गोरेगाव दिंडोशी भागात दोन्ही प्रभागात तयारी असताना एक जागा भाजप आणि एक जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. त्यामुळे सेनेमध्ये पक्षांतर्गत नाराजी वाढल्याचं दिसून आलं.
प्रभाग ५४ शिंदे गटकाडे असतानाही विधानसभा मतदारसंघ भाजपच्या सोपवल्यामुळे असंतोष निर्माण झाला असल्याची माहिती आहे. विधानसभा विभाग प्रमुख गणेश शिंदे यांनी उघड नाराजी व्यक्त केली.
मोठी बातमी; शिंदेसेना–भाजप युती तुटली
त्यामुळे महिला उपविभाग प्रमुख सोनल हडकर यांच्यासह शाखा समन्वयक आणि इतर अनेक अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे सादर केले.









