निवडणूक आयोगाने दिली दोन मृत शिक्षकांना निवडणूक ड्युटी

The Election Commission assigned election duty to two deceased teachers.

 

 

संभाजी नगर मध्ये 2 मृत शिक्षकांना महापालिकेने निवडणूक ड्युटी लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 3 आणि 13 महिन्यांपूर्वी मृत झालेल्या दोन शिक्षकांना प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिल्याबद्दल नोटीसही बजावत कारवाईचा इशाराही दिला आहे.

शिंदेंना मोठा धक्का; शिवसेनेच्या विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

पैठण तालुक्यातील संभाजी कर्डिले यांचे 3 महिन्यांपूर्वी, तर राजेश बसवे यांचे 13 महिन्यांपूर्वी निधन झाले. असे असतानाही त्यांना निवडणुकीच्या कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांचा दबाव

त्यानंतर चुकीची उपरती न झालेल्या प्रशासनाने आता या मृत शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावत हलगर्जीपणाचा कळस गाठला.

न्यूयॉर्कच्या महापौर पदाची शपथ घेताच भारताच्या तिहार जेलमध्ये पाठवले पत्र

आयुक्तांनी दिलेल्या पत्रात म्हटले की, निवडणूक कामात हलगर्जीपणा दाखवल्याबाबतचा खुलासा नोटीस मिळाल्यापासून २४ तासांच्या आत सादर करावा,

रेल्वेने रातोरात बदलले नियम ,RAC तिकिटांबाबत मोठी अपडेट

अन्यथा कारवाई करण्यात येईल. या आधीही दोन दिवंगत शिक्षकांवर महापालिका निवडणुकीसाठी मतदान अधिकारीपदाची जबाबदारी सोपवल्याचा प्रकार समोर आला होता.

 

संजय गुळवे: यांचे वर्षभरापूर्वीच निधन झाले होते.
वंदना सोळुंके: यांचेही काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते.

 

ठाकरे बंधूच्या युतीबाबत घोषणेची मोठी अपडेट समोर
या प्रकारामुळे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडे कर्मचाऱ्यांची अद्ययावत माहिती नसल्याचे उघड झाले. मृतांच्या नावावर निवडणूक ड्युटीचे आदेश निघाल्याने शिक्षक संघटना आणि नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

 

हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाने आपली चूक मान्य केली. या प्रकरणातील तांत्रिक त्रुटी सुधारण्याचे आणि भविष्यात असा प्रकार घडू नये यासाठी डेटा अपडेट करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते.

शरद पवार लवकरच भाजप एनडीए मध्ये येणार ,मंत्र्याच्या वक्तव्याने चर्चाना उधाण

अशा प्रकारच्या घटनांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. अधिकृत माहितीसाठी तुम्ही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

 

 

Related Articles