उमेदवाराने एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला

The candidate made a fool of the BJP by attaching a color photocopy of the AB form.

 

 

भाजपच्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळुसकर यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या निवडणूकविषयक याचिकांवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला.

असदुद्दीन ओवेसींच्या सभेत पोलिसांचा लाठीचार्ज

“आम्ही तुमची कोणतीही मदत करू शकत नाही” असे नमूद करत हायकोर्टाने निवडणुकीसंदर्भातील जवळपास 10 याचिका ऐकून घेण्यास नकार दिला. शिवसेना (शिंदे गट) उमेदवार पूजा कांबळे यांचे पती रामदास कांबळे यांनी याचिका दाखल केली होती.

 

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 173 मधून भाजप उमेदवार शिल्पा केळुसकर यांनी कलर झेरॉक्स केलेला एबी फॉर्म उमेदवारी अर्जासोबत सादर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.

२०२६ पासून बँकांच्या वेळा बदलणार?

निवडणूक आयोगाने सुरुवातीला हा अर्ज ग्राह्य धरल्याने भाजपची मोठी अडचण झाली होती. मात्र, शेवटच्या क्षणी उमेदवारी नाकारल्यानंतरही केळुसकर यांनी बंडखोरी करत अर्ज कायम ठेवला.

 

दुसरीकडे, शिल्पा केळुसकर यांच्याविरोधात सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डुप्लिकेट एबी फॉर्म दाखल केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

इंडिगोची 80 उड्डाणं रद्द,काय घडले कारण ?

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी याबाबत पत्र पाठवत कारवाईची मागणी केली होती. केळुसकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केले होते.

 

तसेच अमित साटम यांनी निवडणूक आयोगाकडे फॉर्म रद्द करण्याची मागणीही केली होती. प्रभाग क्रमांक 173 मध्ये जागा वाटपानुसार ही जागा शिवसेना शिंदे गटाला गेली असून,

1 जानेवारीपासून रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल

माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे निवडणूक रिंगणात आहेत. भाजपने शिल्पा केळुसकर यांना सुरुवातीला एबी फॉर्म दिला होता; मात्र नंतर तो मागे घेण्यात आला. त्यानंतर केळुसकर यांनी बनावट (कलर झेरॉक्स) एबी फॉर्म तयार करून तो अर्जासोबत जोडल्याचा आरोप आहे.

 

दरम्यान, महायुतीतील महानगरपालिका निवडणुकांदरम्यान एबी फॉर्म वाटपावरून राज्यभर गोंधळ पाहायला मिळाला. उमेदवारांना शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म न मिळाल्याने अनेक ठिकाणी संघर्ष रस्त्यावर आला.

असदुद्दीन ओवेसींच्या सभेत पोलिसांचा लाठीचार्ज

काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी भावना अनावर झाल्याने छाती बडवून घेतली, तर काही ठिकाणी अश्रू वाहिले. एबी फॉर्म असलेल्या गाड्यांचा पाठलाग झाल्याच्या घटनाही समोर आल्या.

 

 

Related Articles