असदुद्दीन ओवेसींच्या सभेत पोलिसांचा लाठीचार्ज

Police lathi-charge at Asaduddin Owaisi's rally.

 

 

एमआयएम नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या अकोल्यातील सभेत मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळालंय. अचानक सभेच्या स्टेजजवळ जमावाने गर्दी केल्याने हि गर्दी नियंत्रणात आणणं अवघड झालं.

निवडणूक आयोगाने दिली दोन मृत शिक्षकांना निवडणूक ड्युटी

परिणामी पोलिसांना पोलिस बळाचा वापर करत सभेत लाठीचार्ज करावा लागलाय. यात मोठी धावपळ होऊन चेंगराचेंगरी झाल्याचेही बघायला मिळाले. तर सभेला आलेले लोक अनियंत्रित झाल्यामुळे आणि सभेच्या नियोजनामुळे सभेत मोठा गोंधळ उडाला.

 

बापरे… राष्ट्राध्यक्षाला थेट बेडरुममधून बायकोसह उचलत कैद्यासारखं अमेरिकेत आणलं
अकोल्यातील गडंकी भागातील झुल्फिकार अली मैदानावर खासदार असदुद्दीन ओवेसी यांची सभा होती. अकोला महानगरपालिकेच्या निवडुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार असदुद्दीन ओवेसी आपल्या उमेदवारांच्या आयोजित प्रचार सभेत आले होते.

 

सभा संपल्यानंतर साऱ्यांनीच स्टेजकडे धाव घेतल्याने मोठा गोंधळ उडाला. तर दुसरीकडे हा गोंधळ लक्षात येताच ओवेसी यांनी सभेतून काढता पाय घेतल्याचेही दिसून आलं. ओवेसी यांनी पोलिसांच्या गराड्यातून कारमध्ये बसून सुरक्षित स्थळी नेण्यात आले .

 

बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या अडचणीत वाढ,होऊ शकते 6 वर्षांची बंदी?
दरम्यान, सभा संपत असताना सर्व जमाव ओवेसी यांना भेटण्यासाठी व्यासपीठाकडे येत असल्याने हा गोंधळ उडालाय. परिणामी पोलिसांना सभेत लाठीचार्ज कारवा लागला आणि नंतर चेंगराचेगरी झाली.

 

एमआयएम अकोल्यात 37 जागांवर निवडणूक लढत आहे. तर आधीच्या महापालिकेतील एमआयएमचा 1 नगरसेवक होता. दरम्यान या प्रचार सभेत बोलताना ओवेसी यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

पुढील 24 तास धोक्याचे, हवामान विभागाचा मोठा इशारा

अकोल्यात जन्म आणि मृत्यू दाखला देणे बंद केले. भाजप मुस्लिमांचा किती राग करते हे यातून दिसून येतंय. मुस्लिमांना दाखला देण्यासाठी फडणवीस-शिंदे-अजित पवार डोकं का दुखतं? देशाला विश्वगुरू करण्यासाठीची ही कोणती पद्धत.

 

शहरातील सधन भागांचा विकास होतोय. गरीब भागांचा विकास करतांना हे आंधळे झालेत का? मुस्लिम आणि दलितांकडे एव्हढे दुर्लक्ष का? असा सवाल ओवेसींनी यावेळी केला.

भाजपला होतोय अजित पवारांना महायुतीत घेतल्याचा पश्चाताप?

तर आमच्या 32 लोकांना अकोल्यात निवडून द्या. आम्ही दुर्लक्षित भागात विकास करू, असं आश्वासन देखील खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अकोलेकरांना दिलं.

 

 

Related Articles