कार्यालयातून उमेदवाराचा ‘एबी फॉर्म’ झाला गायब

The candidate's 'AB form' went missing from the office.

 

 

महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरताना अनेक ठिकाणी गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी कार्यकर्त्यांची झुंबड पाहायला मिळाली तर, कुठे निवडणूक अधिकाऱ्यांसमवेत वादावादीही घडली.

बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या अडचणीत वाढ,होऊ शकते 6 वर्षांची बंदी?

पिंपरी चिंचवड महापालिकेतही अर्ज छाननीनंतर उमेदवार आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जयश्री भोंडवे या अधिकृत उमेदवार होत्या.

 

मात्र, त्यांचा एबी फॉर्म गहाळ झाला, त्यामुळे छाननीमध्ये त्यांना अपक्ष उमेदवार ठरवण्यात आलं. मग त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सीसीटीव्ही, व्हिडिओग्राफी, तसेच इतर तांत्रिक पुरावे सादर केले.

पुढील 24 तास धोक्याचे, हवामान विभागाचा मोठा इशारा

त्यानंतर, न्यायालयाच्या आदेशानंतर झालेल्या चौकशीतून अखेर त्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली, अन् घड्याळ हे चिन्हही देण्यात आलं. मात्र, अद्यापही त्यांचा एबी फॉर्म सापडला नाही.

 

पिंपरी चिंचवडमध्ये अर्ज छाननीनंतर अपक्ष ठरलेल्या उमेदवाराला, चिन्ह वाटपात मात्र राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह द्यावं लागलं. याप्रकरणात एबी फॉर्म गहाळ करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांची बदली करण्यात आली.

भाजपला होतोय अजित पवारांना महायुतीत घेतल्याचा पश्चाताप?

अजित पवार राष्ट्रवादीच्या जयश्री भोंडवेंचा एबी फॉर्म पाटील यांच्याकडून गहाळ झाला होता, यात स्वतःची चूक असतानाही पाटील यांनी छाननीवेळी त्यांना अपक्ष उमेदवार ठरवलं.

 

त्यामुळे, या विरोधात जयश्री भोंडवेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सीसीटीव्ही, व्हिडिओग्राफी, तसेच इतर तांत्रिक पुरावे सादर केले. यात तथ्य असल्याचं पाहून न्यायालयाने निवडणूक आयोगाला हे पुरावे तपासण्यासाठी स्वतंत्र सुनावणीचे आदेश दिले.

असदुद्दीन ओवेसींच्या सभेत पोलिसांचा लाठीचार्ज

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी एबी फॉर्म गहाळप्रकरणी चिन्ह वाटपाच्या दिवशीच तातडीनं सुनावणी घेतली. त्यानुसार, संबंधित उमेदवाराने मुदतीत अर्ज सादर केला होता,

 

मुदतीतच त्यांनी एबी फॉर्म निवडणूक कार्यालयात सादर केला होता. जयश्री भोंडवे यांनी वेळेतचं एबी फॉर्म सादर केला होता हे त्यांच्या ही निदर्शनास आले. त्यामुळे, हर्डीकरांनी जयश्री भोंडवेंचा एबी फॉर्म ग्राह्य धरला.

उमेदवाराने एबी फाॅर्मची कलर झेराॅक्स जोडत भाजपचा पोपट केला

त्यामुळे अर्ज छाननीच्या अंतिम यादीत अपक्ष ठरलेल्या जयश्री भोंडवेंना चिन्ह वाटपाच्या यादीत घड्याळ चिन्ह दिल्याचं जाहीर करण्यात आलं. मात्र, हा घोळ ज्यांच्यामुळं झाला ते निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांची आता बदली करण्यात आली आहे.

 

संबंधित उमेदवाराने एबी फॉर्म सादर केल्याचे व्हिडिओ पुराव्यात दिसून येत आहे. मात्र, अन्य कुठल्यातरी दस्ताला तो लागलेला असावा.

डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला मोठी धमकी

तो एबी फॉर्म गहाळ झालेला असला तरी त्यांच्याकडे असलेली पोच ग्राह्य धरुन त्यांना एबी फॉर्मनुसारच पक्षाचं चिन्ह वाटप करण्यात आले, असे महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

 

दरम्यान, एबी फॉर्मबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यानुसार चौकशी करण्यात येत आहे. अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती,

उमेदवार बिनविरोध कसे झाले मनसेकडून थेट पुरावे सादर

जास्त अर्ज आले होते. त्यातूनच एखादी चूक झाली असून अन्य कुठल्याही तक्रारी प्राप्त नाहीत, असेही हर्डीकर यांनी स्पष्ट केले.

 

 

Related Articles