निवडणुकीनंतरही राज्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्रच

Even after the elections, Ajit Pawar and Sharad Pawar will remain together in the state.

 

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी- चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घेतलेल्या जाहीर सभेत चौफेर फटकेबाजी करत मोठं वक्तव्य केलं आहे. फक्त महापालिका निवडणुका नव्हे तर नंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच संकेत त्यांनी उघडपणे दिले आहेत.

भरारी पथकाची मोठी कारवाई,अडीच कोटींची रक्कम सापडली

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत असून, याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी प्रचारसभेत सूचक वक्तव्य केलं. “तुतारी आणि घड्याळ सोबत लढतोय.

 

 

आम्हाला वाद घालायचा नाही. मागचं जे काही झालं ते गंगेला मिळालं,” असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना एकोप्याने काम करण्याचं आवाहन केलं. तसंच “काकांच्या पुण्याईने माझं लई बरं चाललंय.

आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा सर्वसाधारण जागांवर प्रवेश नाही

मी खोटं बोलत नाही,” असं म्हणत अजित पवारांनी थेट शपथ घेतली. “माझी काळजी करू नका,” असं सांगत त्यांनी शरद पवारांचे योगदानही मान्य केलं. हिंजवडीतील आयटी पार्क शरद पवारांनी आणल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं.

 

अजित पवारांनी या प्रचारसभेत आपल्या राजकीय विरोधकांना थेट इशाराही दिला. “ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी. मी कुणाच्या नादी लागत नाही, पण कोणी माझ्या नादी लागलं तर मी सोडत नाही,” असं म्हणत त्यांनी विरोधकांसह नाराज नेत्यांनाही तंबी दिली.

अजित पवारांचा उमेदवारांना विजयासाठी दिला ‘अनोखा’ कानमंत्र

दरम्यान, पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर अजित पवारांनी जोरदार हल्लाबोल केला. “मी ज्यांना ताकद दिली, तेच मला सोडून गेले. त्यांच्या मुलांवर काय आरोप होते, हे ते विसरले. दादागिरी, दहशत, गुंडगिरी सुरू होती,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर बोलताना अजित पवारांनी थेट आव्हान दिलं. “भ्रष्टाचार करणाऱ्या आकाला संपवायचं आहे,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार महेश लांडगे यांना लक्ष्य केलं.

परभणीत काँग्रेसचा खेळखंडोबा;जेष्ठ नेत्याचा पुत्र भाजपचा उमेदवार ,आता कोणाचा प्रचार करणार ?

“त्या आकाला आपल्याला जागा दाखवायची आहे. अनेक जण सरड्यासारखे रंग बदलतील, भावनिक आवाहन करतील, ही माझी शेवटची निवडणूक आहे

 

म्हणून पाय धरतील. पण तुम्ही त्यांना पराभूत केल्याशिवाय त्यांची शेवटची निवडणूक होणार नाही,” असं आवाहन अजित पवारांनी नागरिकांना केलं.

 

निवडणूक आयोगाने दिली दोन मृत शिक्षकांना निवडणूक ड्युटी

दरम्यान, एकीकडे अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत, तर दुसरीकडे भ्रष्टाचार, दहशत आणि गुंडगिरीवर थेट हल्ला केला. अजित पवारांच्या या सभेनंतर पिंपरी- चिंचवडचं राजकारण पुन्हा तापल्याचं पाहायला मिळत आहे.

 

 

Related Articles