VIDEO ;डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाप्रमाणे मोदींचंही अपहरण करतील?’, काँग्रेस नेत्याच्या विधानाने खळबळ

VIDEO: 'Will Donald Trump abduct Modi like he did in Venezuela?', Congress leader's statement creates a stir.

 

 

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. व्हेनेझुएलामध्ये जे घडलं, तेच भारतातही घडू शकते का?

आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा सर्वसाधारण जागांवर प्रवेश नाही

मिस्टर ट्रम्प आपल्या पंतप्रधानांचे अपहरण करतील का? अशी विचारणा त्यांनी केली आहे. त्यांच्या या विधानानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये लष्करी कारवाई करत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी याचा संदर्भ देत विधान केलं.

 

आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा सर्वसाधारण जागांवर प्रवेश नाही

IANS ला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाणांनी अमेरिकेने भारतावर लावलेल्या आयात करावर भाष्य केलं. ते म्हणाले की, “50 टक्के करावर कोणताही व्यापार शक्य नाही. एकाप्रकारे त्यांनी भारतातून अमेरिकेत निर्यात होणारा माल बंद केला आहे.

 

थेट बंद करु शकत नाही यामुळे त्यांनी कर लावला आहे. आता भारताला हे सहन करावं लागेल. भारतातील लोकांना अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीतून मिळणारा नफा आता मिळणार नाही.

अजित पवारांचा उमेदवारांना विजयासाठी दिला ‘अनोखा’ कानमंत्र

आता आपल्याला दुसरी बाजारपेठ शोधावी लागेल. त्यासाटी प्रयत्न सुरू आहेत. केवळ कर आकारणीने काही फरक पडणार नाही. अजून 50 टक्के लावले तरी काही फरक पडत नाही. व्यापार आधीच बंद आहे. निर्यात होत नाहीये.”

 

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “आता प्रश्न आहे की, व्हेनेझुएलामध्ये जे झालं तसं काही भारतात होणार का? आपल्या पंतप्रधानांचं अपहरण करुन ट्रम्प घेऊन जाणार का? आता हेच राहिलं आहे”.

 

निवडणुकीनंतरही राज्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्रच
जम्मू आणि काश्मीरचे माजी पोलीस प्रमुख एस.पी. वैद यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर टीका केली आहे. हे विधान संपूर्ण देशासाठी अपमानास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

सोशल मीडियावर अनेकांनी भारतासारख्या अणुशक्ती असलेल्या देशाच्या बाबतीत हे विधान किती हास्यास्पद आहे, हे निदर्शनास आणून दिले.

 

सरकारचा नवा कायदा; आता गुन्हा केल्यावर शिक्षा नाही?
माजी डीजीपी पुढे म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की व्हेनेझुएलामध्ये जे घडले तसंच ट्रम्प मोदींना घेऊन जातील अशी आशा करण्यासारखेच आहे.

 

हे बोलण्यापूर्वी तुम्ही तुमची मान झुकली का नाही? तुम्ही देशाचे नागरिक नाही का? तुम्हाला देशात असे घडावे असे वाटते, तुम्हाला मोदींबद्दल खूप द्वेष आहे. तुम्ही सरकारच्या धोरणांवर टीका करता, पण तुम्ही तुमच्याच देशाविरुद्ध बोलता. तुमची मानसिकता खूपच वाईट आहे,

 

बापरे… राष्ट्राध्यक्षाला थेट बेडरुममधून बायकोसह उचलत कैद्यासारखं अमेरिकेत आणलं
चव्हाण यांची ही टिप्पणी खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेच्या एक दिवसानंतर आली आहे. यावेळी ही टीका ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल नसून, भारताने रशियाकडून केलेल्या तेल खरेदीच्या संदर्भात ट्रम्प यांच्या एका विधानावरून करण्यात आली आहे.

 

Related Articles