भाजप कायकर्त्यांकडूनच ’50 खोके एकदम ओके’ची घोषणाबाजी; शिंदे गट संतप्त

BJP workers themselves chanted the slogan '50 crore rupees, absolutely fine'; the Shinde faction is angered.

 

 

मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा रणसंग्राम हळहळू रंगतदार होऊ लागला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

 

महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा देण्यात आल्या. आतापर्यंत ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांकडूनच या घोषणा देत शिंदे गटाला डिवचले जात होते.

आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा सर्वसाधारण जागांवर प्रवेश नाही

पण आता मात्र थेट मित्रपक्ष भाजपकडून अशा घोषणा दिल्या गेल्याने शिंदे गट संतापल्याचे दिसत आहे. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच प्रतिक्रीया दिली आहे.

 

एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले, कुठल्या कार्यकर्त्यांनी कोणत्या घोषणा दिल्या, हे मला माहिती नाही. पण शिवसेना-भाजप मुंबईत मोठ्या ताकदीने लढत आहेत.

महापालिका निवडणुकीत भाजप-MIM युती

त्यामुळे अशा घोषणा देण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एकदा विचारा, अशा घोषणा देणारे मंत्री आज कुठे गेले, तेही एकदा तपासून पाहा.

 

तसेच आज आमच्यामुळेच तुम्ही सत्तेत आहात, हे विसरू नका. ज्यांनी या घोषणा दिल्या, त्यांची संस्कृती कुठे गेली?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

दरम्यान मुंबईतील चेंबूरमधील प्रभाग क्रमांक १७३ मध्ये शिंदे सेनेच्या पूजा कांबळे विरूद्ध भाजपच्या शिल्पा केळूस्कर यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

अजित पवारांचा उमेदवारांना विजयासाठी दिला ‘अनोखा’ कानमंत्र

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या पूजा कांबळे आणि भाजपच्या उमेदवारी शिल्पा केळुसकरांचे कार्यकर्ते प्रभागात प्रचार करत होत्. प्रचारादरम्यान भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आले,

 

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना समोर पाहताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा देण्यास सुरूवात केली.

 

निवडणुकीनंतरही राज्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्रच
घोषणा देणारे दत्ता केळुस्कर म्हणाले की, आमच्याकडून चुकीचे शब्द वापरले गेले. जाहीर केलेल्या प्रॉपर्टीनुसार ‘५० खोके’ नव्हे तर ‘अकरा खोके एकदम ओके’ अशी घोषणा द्यायला हवी.

 

११ कोटींची जंगम मालमत्ता कुठून आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ही घोषणा फक्त रामदास कांबळे आणि त्यांच्या पत्नी उमेदवारापुरती वैयक्तिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

VIDEO ;डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाप्रमाणे मोदींचंही अपहरण करतील?’, काँग्रेस नेत्याच्या विधानाने खळबळ

माझे तिकीट चोरल्याचा आरोप करत त्यांनी ही लढाई होणारच असल्याचे सांगितले. दरम्यान, मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

 

 

Related Articles