अजित दादा परभणीत आले आणि नेहमीचे विकासाचे तुणतुणे वाजवून गेले
Ajit Dada came to Parbhani and left after playing his usual tune about development.

अजित पवार परभणीत आले कि शहराच्या विकासाचे जनतेला स्वप्न दाखवतात हे वेळोवेळी गेल्या वीस वर्षांपासून परभणी वासियांनी अनुभवले आहे ,
भाजप कायकर्त्यांकडूनच ’50 खोके एकदम ओके’ची घोषणाबाजी; शिंदे गट संतप्त
पण परभणी जिथे आहे तिथेच ,पुन्हा अजितदादांनी त्याच विकासाची स्वप्ने परभणी जनतेला दाखविल्या जनतेला सुद्धा आली . आज अजित पवार परभणीत आले होते. त्यांच्या भाषणात ते म्हणाले माझ्या विचारांची महानगर पालिका निवडून द्या.
सर्व स्तराचा विकास करायचे काम माझे आहे. उपमुख्यमंत्री म्हणून मी शब्द देतो की इथल्या विकासाचा पाठपुरावा मी स्वत: करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
हवामान विभागाचा राज्यात पावसाचा इशारा, अलर्ट जारी
ते परभणीत बोलत होते. परभणी शहर दत्तक घ्यायला मी तयार आहे, पण महापालिकेत राष्ट्रवादीचे घड्याळ आणि तुतारीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असे आवाहनही यावेळी अजित पवार यांनी केले.
परभणीचा जसा पाहिजे तसा विकास दुर्दैवाने झाला नाही. सर्व धर्मातील उमेदवार मग नवीन असो की जुने देण्याचा प्रयत्न करतो. दोघांमध्येही समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असतो.
डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला मोठी धमकी
पिंपरी चिंचवडचा विकास कसा केला हे विचारा त्यांना असे अजित पवार म्हणाले. केंद्राचा आणि राज्याचा निधी कसा आणायचा याची सांगड घालावी लागते.
परभणीत पिण्याच्या पाण्याची योजना भूमिगत गटार योजना हातात घेतली आहे. सर्व रस्ते चांगले करु असे अजित पवार म्हणाले. सर्व जाती धर्मातील नागरिकांना सुविधा देवू.
कार्यालयातून उमेदवाराचा ‘एबी फॉर्म’ झाला गायब
जाती पतीचा नात्याचा उमेदवार आहे म्हणून बघू नका विकास कोण करेल हे बघा. उपमुख्यमंत्री म्हणून मी शब्द देतो की इथल्या विकासाचा पाठपुरावा मी स्वत करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
जिल्ह्याचे ठिकाण असेल तिथे कॅन्सरचे रुग्णालय उभे करणार आहोत असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. देशात कॅन्सर चे प्रमाण वाढले आहे. परभणी धुळ आणि खड्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे.
कार्यालयातून उमेदवाराचा ‘एबी फॉर्म’ झाला गायब
मी धूळमुक्त खड्डेमुक्त शहर करण्यासाठी पुढाकार घेतो असे मत अजित पवार म्हणाले. राज्याचा केंद्राचा निधी आणू, जसे पिंपरी चिंचवड बारामती केले तसेच परभणी करु.
इथली MIDC बंद आहे ती चालू करु, उद्योगपती पाणी जमीन लाईट रस्ते आहेत का नाही हे पाहत असतात असे अजित पवार म्हणाले.
हवामान विभागाचा राज्यात पावसाचा इशारा, अलर्ट जारी
पहिले जकात मिळत होता पुन्हा एलबीटी मिळत होता त्यात सर्व होत होते, मात्र आता जीएसटी मिळतोय, पण त्यात आमचे भागत नाही.
आम्हाला जेवढा पैसा पाहिजे तेवढा मिळत नाही. सगळी काम करत येतात पण पैश्याचे सोंग करता येत नाही. नागरिकांना चांगल्या सुविधा पाहिजे असतात मी त्या 100 टक्के परभणीला देतो असे अजित पवार म्हणाले.
भरारी पथकाची मोठी कारवाई,अडीच कोटींची रक्कम सापडली
माझे अनेक उद्योगपती मित्र आहेत. मध्यंतरी बारामती ला गौतम अदानी आले होते. त्यांनी ही मी बोलू शकतो. 35 वर्षाच्या राजकीय जीवनात अनेक महत्वाच्या विकास कामांना निधी दिल्याचे अजित पवार म्हणाले.
परभणी महानगर पालिकेची इमारत अद्यावत बांधू. महापालिकेत सरकार ने मान्यता दिली तर भरती करु. परभणीकरांना हेवा वाटेल असे क्रीडा संकुल तयार करून देईल असे अजित पवार म्हणाले. क्रीडा खात माझाकडेच आहे.
महापालिका निवडणुकीत भाजप-MIM युती
परभणीतील सय्यद शाह तुराबुल हक्क दर्गाह,परदेश्वर मंदिर परिसर याचा विकास आराखडा तयार करून निधी देवू. परभणी शहर दत्तक घ्यायला तयार पण महापालिकेत राष्ट्रवादीचे घड्याळ आणि तुतारीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन अजित पवार यांनी केले.









