पीएम श्री जिल्हा परिषद प्रशाला परतूर शाळेत उत्साहात स्वयंशासन दिन साजरा

Self-governance day was celebrated with enthusiasm at PM Shri Zilla Parishad School, Partur.

 

 

परतूर; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पीएम श्री जिल्हा परिषद प्रशाला, परतूर येथे दि. ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत शालेय स्वयंशासन दिन अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

अजित दादा परभणीत आले आणि नेहमीचे विकासाचे तुणतुणे वाजवून गेले

विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 900 हून अधिक विद्यार्थ्यांची शाळा यशस्वीरीत्या चालवण्यात आली, हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

महिलांकडून केवायसी करताना तांत्रिक चुका झाल्याने 1,500 अनुदान झाले बंद

या कार्यक्रमाचे अध्यक्ष व एक दिवसाचे मुख्याध्यापक म्हणून इयत्ता दहावी ‘क’ मधील विद्यार्थी यशराज सुवर्णा राजाराम जाधव यांनी जबाबदारी सांभाळली. त्यां

काँग्रेस पक्षाकडून नुकतेच निवडून 12 आलेले नगरसेवक गेले भाजपात

च्या नेतृत्वाखाली ६ समित्यांची स्थापना* करण्यात आली असून ६० महिला व पुरुष शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
*कार्यक्रमादरम्यान शालेय समिती अध्यक्ष द. या. काटे महाराज, शिक्षणतज्ञ भगवान तात्या मोरे, बरीदे सर तसेच शालेय समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.

 

या सर्व मान्यवरांनी एक ना एक वर्गाची प्रत्यक्ष पाहणी करून कार्यक्रमाचे निरीक्षण केले.विशेष म्हणजे एका ही व्यक्तीने कार्यक्रमावर टीका केली नाही, उलट सर्वांनी नियोजन, शिस्त व विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाचे मुक्तकंठाने कौतुक केले.

पायलटसह 6 जण असलेल्या चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात

कार्यक्रमाचे व्यवस्थापन अत्यंत प्रभावीपणे पार पडले.राजनंदिनी काळे हिने सर्व विद्यार्थिनींचे नियोजन व नियंत्रण यशस्वीरीत्या सांभाळले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालनआर्या कुलकर्णी व भक्ती देशपांडे यांनी आत्मविश्वासपूर्ण शैलीत केले.

 

पर्यवेक्षक म्हणून रामानंद मगर, दिपाली निर्वळ, साक्षी साळवे, वैष्णवी उबाळे यांनी जबाबदारी पार पाडली, तर शिस्त विभाग प्रमुख दीपक राऊत यांनी संपूर्ण शाळेत शिस्तबद्ध वातावरण राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

शिंदेंचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले,दादागिरी हा आमचा धंदा

यशराज यांच्या नेतृत्वाखाली ५० पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.
कार्यक्रमातील यशराज यांच्या अध्यक्षीय भाषणाने उपस्थितांना विशेष भावनिक केले.ज्येष्ठ शिक्षकआठवे सर यावेळी भावूक झाले.

एक दिवसाचा नगरसेवक… मनसेच्या इशाऱ्यानंतर दिला राजीनामा; भाजप बॅकफूटवर

विष्णुनाना कदम सर यांनी हा कार्यक्रम शाळेच्या इतिहासातील सर्वात मोठा असल्याचे नमूद केले.मुख्याध्यापक गणेश राठोड सर यांनी कार्यक्रम अत्यंत शिस्तीत पार पडल्याचे सांगत समाधान व्यक्त केले.

 

महापालिका निवडणुकीत एकच ईव्हीएम असणार की अनेक ? कसे करणार मतदान ,जाणून घ्या संपूर्ण माहिती
समारोपप्रसंगी कदम सर म्हणाले,“ ज्या पद्धतीने यशराज यांनी नियोजन व भाषण केले, त्या क्षमतेने तो उद्याचा अधिकारी आहे.तरवटे मॅडम व गाडगे सर यांनीही कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.

 

वर्षातील पहिले ग्रहण 3 तास 27 मिनिटे राहणार काळाकुठ्ठ अंधार
हा शालेय स्वयंशासन दिन विद्यार्थी नेतृत्व, शिस्त, सहकार्य व नियोजनाचा उत्कृष्ट आदर्श ठरला असून शाळेच्या इतिहासात हा कार्यक्रम सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल , अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

 

 

Related Articles