मंत्री राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग अन् एक पत्र…बॅग पाहा ठेवणाऱ्याचा VIDEO

An abandoned bag and a letter were found outside Minister Rane's bungalow... Watch the video of the person who placed the bag.

 

 

राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय बंगल्याबाहेर एक बेवारस बॅग आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला मोठी धमकी

या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, बॉम्ब शोधक पथकाकडून बॅगची तपासणी सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण बॅग ठेवून जाताना दिसत आहे. या घटनेमागे घातपाताचा प्रयत्न आहे की काय, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

 

नितेश राणे यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान ‘सुवर्णगड’ बंगल्याबाहेर ही बेवारस बॅग सापडली असल्याची माहिती आहे. त्यांच्या बंगल्याशेजारीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बाळासाहेब भवन आणि मंत्री जयकुमार गोरे यांचा बंगला देखील आहे.

निवडणुकीनंतरही राज्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्रच

त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच बंगल्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.

बॉम्ब शोधक पथकाकडून बॅगची तपासणी सुरू आहे. घटनास्थळी येण्या-जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

VIDEO ;डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाप्रमाणे मोदींचंही अपहरण करतील?’, काँग्रेस नेत्याच्या विधानाने खळबळ

ज्यामध्ये ब्राऊन कलरचा टी-शर्ट, ब्लॅक कलरचे जॅकेट आणि पँट घातलेला एक तरुण हातामध्ये ही ब्लॅक कलरची ट्रॉली बॅग घेऊन येताना दिसत आहे.

 

हा तरुण नितेश राणे यांच्या बंगल्याजवळ येतो आणि तो त्याठिकाणी ही बॅग सोडून निघून जातो, असंही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

महापालिका निवडणुकीत भाजप-MIM युती

मागील काही दिवसांपासून नितेश राणे आक्रमकपणे हिंदुत्वाची भूमिका मांडत आहेत. नितेश राणेंची आज छत्रपती संभाजी नगरमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यापूर्वीच त्यांच्या बंगल्याबाहेर ही बेवारस बॅग सापडल्याने या घटनेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

मंत्र्यांच्या शासकीय बंगल्याबाहेर अशाप्रकारे बेवारस बॅग ठेवल्याच्या घटना होत असतील तर ही अतिशय गंभीर बाब आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही व्हिडीओद्वारे त्यामध्ये दिसणारी व्यक्ती कोण आहे, याचा शोध घेत आहेत.

पायलटसह 6 जण असलेल्या चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात

ही बॅग त्याने इथे का आणून ठेवली? याचा देखील पोलीस तपास करत आहेत. आता पोलिसांच्या तपासणीत नेमके काय समोर येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles