महायुतीत जुंपली;’अजित पवारांवर फडणवीसांचा थेट आरोप

Engaged in the grand alliance; Fadnavis makes a direct accusation against Ajit Pawar.

 

 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करताना, “अजित पवारांनी युती धर्म पाळलेला नाही,” असं म्हटलं आहे. पिंपरी-चिंडवड आणि पुण्यातील राजकारणाबद्दल भाष्य करताना अजित पवारांना लक्ष्य केलं.

 

“युती, आघाड्यांवरुन टीका होते भाजपावर. नगरपरिषदांमध्ये पण तुम्ही मित्रपक्षांविरोधात लढलात. आताही काही ठिकाणी मित्रपक्षांविरोधात लढत आहात. पक्ष हा ब्रॅण्ड म्हणून वापरला जातो.

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुका लांबणीवर?

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार थेट भाजपाला भ्रष्ट्चारी ठरवतात. तुम्ही म्हणता स्थानिक निवडणुका पण जेव्हा ट्रीपल इंजिन म्हणता तेव्हा थेट पक्षावर आरोप होतो ना?” असा सवाल फडणवीस यांना विचारण्यात आला.

 

या प्रश्ना उत्तर देताना फडणवीस यांनी आधीपासूनच आम्ही या दोन्ही ठिकाणी एकत्र लढणार नाही असं ठरल्याचं सांगितलं. मात्र अजित पवारांनी भाजपावर टीका करण्यास सुरुवात केल्याचं नमूद केलं. हे सारं सांगताना फडणवीसांनी जागावाटपामध्ये काय फिस्कटलं हे सुद्धा इतर शहरांचं उदाहरण देत सांगितलं.

 

“आम्ही निवडणुकीआधी हा निर्णय केलेला जिथे शक्य असेल तिथे युती करु. स्टॅटर्जिकली काही ठिकाणी युती न करणं बरोबर ठरेल. तिथे मैत्रीपूर्ण लढत करु.

मंत्री राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग अन् एक पत्र…बॅग पाहा ठेवणाऱ्याचा VIDEO

उदाहरण द्यायचं झालं तर कल्याण-डोंबिवलीमध्ये आमची स्थिती उत्तम असताना आम्ही आमच्या जोरावर निवडून लढू शकलो असतो. लढाई आमच्यात आणि शिवसेनेत झाली असती.

 

तरीही आम्ही तिथे निर्णय घेतला. या शहराचं नेचर पाहता आम्ही एकत्र आलं पाहिजे. आम्ही 56 जागा घेतल्या त्यांना 65 जागा दिल्या. जळगावसारखं शहर जिथे मागच्या वेळी आमचे 57 नगरसेवक निवडून आलेले.

निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ?काय म्हणाल्या सुप्रिया सुळें

विधानसभेत दीड लाखांची आघाडी होती. तरी आम्ही शिवसेनेला सोबत घेतलं. 23 जागा त्यांना दिल्या. त्यामुळे आम्हाला 57 जागा जिंकून 47 जागाच आम्हाला मिळाल्या.

 

तरी आम्ही त्या घेतल्या. असं करत असताना पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये आम्ही आधीच जाहीर केलेले की इथे वेगवेगळं लढू,” असं फडणवीस म्हणाले.

निवडणुकीआधीच 22 उमेदवार बिनविरोध;पाहा कोणत्या पक्षाचे कोण विजयी

पुणे, पिंपरी-चिंचवडचं प्लॅनिंग काय होतं याबद्दल फडणवीसांनी सविस्तर माहिती दिली. “पुणे, पिंपरी-चिंडवड येथे दोनच प्रमुख पक्ष आहेत, भाजपा आणि राष्ट्रवादी! बाकी पक्ष इथे छोटे आहेत.

 

आम्ही युती केली तर दोघांच्याही कार्यकर्त्यांना जागा मिळणार नाही. तिथे उबाठा आणि शरद पवारांचा पक्ष आमच्याच उमेदवारांना उमेदवारी देतील. त्यातून एकप्रकारे त्यांना आयते लोक मिळतील.

प्रचार सभेत नारायण राणेंना स्टेजवरच आली चक्कर

म्हणून या दोन महानगरपालिकांमध्ये युती केली नाही तर सत्ता पक्षाची विधानसभेच्या निवडणुकीत तयार झालेली स्पेस आपल्याकडे राहील,” असं ठरल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

 

 

Related Articles