महायुतीत बिघाडी,फडणवीस म्हणाले ‘मी आत्तापर्यंत संयम पाळला, अजितदादा 15 जानेवारीनंतर…’

Trouble in the grand alliance, Fadnavis said, 'I have maintained restraint until now, Ajit Dada after January 15...'

 

 

महापालिका निवडणुकीला अवघे काही दिवस उरलेयत. अशावेळी राजकीय पक्षांच्या जाहीर सभा जोरात सुरु आहेत. विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

MIM च्या पाठिंब्यांवर भाजपचे जितेन बरेठिया स्वीकृत नगरसेवक

पण महायुतीत एकत्र असलेले भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी निवडणुकीनंतर एकत्र राहतील का? असा प्रश्न उपस्थित होतोय. यामागे कारणही तसंच आहे.

दोन लाखांची लाच,दोन फौजदार अँटी करप्शन चा ट्रॅप , गुन्हा दाखल होताच पसार

तिन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जातेय. ज्यांनी माझ्यावर आरोप केले, त्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसलोय, असे विधान अजित पवारांनी केले होते. आता त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊया.

 

 

पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत पार पाडली. यावेळी त्यांनी पुण्यातील विकासावर भाष्य केले. पुण्यातून जेवढी उडणारे विमान आहेत त्यातून महिलांना मोफत प्रवास देऊ असं म्हणतायत.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; राजकीय वर्तुळात खळबळ

घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं.जिंकून येणार नसेल तर काहीही जाहीरनामा करतात. किमान विश्वास बसेल असं तरी सांगा, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

 

पुणेकरांना रिलायबल आणि डिपेंडेबल सेवा हव्या आहेत. पुणेकरांना पीएमपीएल मोफत मिळणार नाही हे माहिती आहे. कारण पुणेकरांना माहिती आहे की ते राष्ट्रवादीला जिंकून देणार नाहीत, असे ते म्हणआले.

महापालिका निवडणुकीच्या मतदानावर थेट बहिष्कार, मुंबईत खळबळ

मुंबईत भूमिगत मेट्रो साठी झाडे कापण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला, मी त्यांना समजण्याचा प्रयत्न केला. सुप्रीम कोर्टात गेलो. त्यानंतर सरकार बदललं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी स्थगिती दिली.

 

पुन्हा सुप्रीम कोर्टात गेल्यावर कोर्टाने निकाल दिला आणि स्थगिती हटवल्याचे फडणवीस म्हणाले. त्या एका कारशेडने 10 हजार कोटी रुपयांनी मुंबई मेट्रो खर्च वाढल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.

निवडणुकीआधीच 22 उमेदवार बिनविरोध;पाहा कोणत्या पक्षाचे कोण विजयी

काही पुलाचे बांधकाम बिनडोकपणे केलं गेले. पुण्यातील काही भागात एलिव्हेटेड कॉरिडॉर करायचं ठरवलं आहे. खाली रस्ता आहे वर कॉरिडॉर असेल आणि त्यावर मेट्रो असेल, असे ते म्हणाले.

 

तसेच यावेळी त्यांनी पुणे वाहतूक कोंडीवरदेखील भाष्य केले. 32 रोडवर पुण्याचा ट्रॅफिक चालतो असं एका अहवालातून समोर आलं दीड पट ते अडीच पट त्यावर वाहतूक आहे.

खासदार ओवेसींनी मोदींना ललकारले म्हणाले,तुमची 56 इंच छाती आहे तर….

पुण्यातील 32 रस्त्यांना डी कन्जेस्ट केलं जाणार आहे.अतिक्रमण काढून टाकणं, सिग्नल यंत्रणा सुधारित करणे, रस्त्यावर इतर अडथळे दूर करणे अशी उपाययोजना केल्या जाणार आहेत. पुण्यात 23 उड्डाण पुलं होणार असून त्यातील 8 चे काम सुरू असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.

 

यावेळी फडणवीसांनी अजित पवारांच्या विधानावर भाष्य केले. अजित दादा बोलतात पण माझं काम बोलतं. मी आत्तापर्यंत संयम पाळला. त्यांचा संयम ढासळला. 15 तारखेनंतर अजित दादा बोलणार नाहीत, असे फडणवीस म्हणाले.

बापरे… राष्ट्राध्यक्षाला थेट बेडरुममधून बायकोसह उचलत कैद्यासारखं अमेरिकेत आणलं

कुठलाही परिवार एकत्र येत असेल तर मला आनंद आहे. राज ठाकरे यांनी मला क्रेडिट दिलं त्यांचे मी आभार मानतो. त्यांचा मला आशीर्वाद मिळेल.भाऊबहीण एकत्र आले तर ते मला देणार धन्यवाद का? हे 15 तारखेनंतर कळेल, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

 

 

Related Articles