MIM च्या पाठिंब्यांवर भाजपचे जितेन बरेठिया स्वीकृत नगरसेवक

Jiten Barethia of BJP becomes nominated corporator with the support of MIM.

 

 

गेल्याच आठवड्यात भाजपने अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत आणि अकोल्यातली अकोटमध्ये एमआयएमसोबत युती केल्याने चांगलाच गदारोळ उठला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला मोठी धमकी

त्यानंतर, भाजपनेही या दोन्ही ठिकाणी संबंधित पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावत कारवाई केली, तसेच अशी युती कदापि मान्य नसल्याचेही स्पष्ट केले.

 

मात्र, अकोटमध्ये भाजप-एमआयएम युतीचा दुसरा अंक समोर आला आहे. ‘एमआयएम’कडून स्विकृत नगरसेवकपदी भाजपाच्या माजी नगराध्यक्षांचे पुत्र जितेश बरेठिया यांना ‘एमआयएम’च्या पाचही नगरसेवकांनी समर्थन दिलं.

VIDEO ;डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाप्रमाणे मोदींचंही अपहरण करतील?’, काँग्रेस नेत्याच्या विधानाने खळबळ

त्यामुळे, भाजप नेत्याच्या मुलाला नगरसेवक होण्यासाठी एमआयएमची मदत झाल्याने ही अप्रत्यक्ष युतीच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

पायलटसह 6 जण असलेल्या चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात

अकोला जिल्ह्यतील अकोटमध्ये झालेल्या ‘भाजप-एमआयएम’ युतीवरून देशभरात मोठा गदारोळ उडाला होताय.नंतर मुख्यमंत्र्यांनी ही युती तोडण्याचे आदेश दिले.

 

तर या युतीसाठी जबाबदार धरत स्थानिक आमदार प्रकाश भारसाकळे यांना भाजपने कारणे दाखवा नोटीस पाठवली. या सर्व घडामोडीनंतर एमआयएम भाजपच्या नेतृत्वाखालील ‘अकोट विकास मंचा’तून बाहेर पडला होता.

पायलटसह 6 जण असलेल्या चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात

त्यानंतर एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी स्वत:चा गट स्थापन केला होता. मात्र, पहिल्या युतीने वाद झाल्यानंतर आज परत ही युती नव्याने वेगळ्या रूपात परत आली आहे.

 

नगरपालिकेत आज स्विकृत सदस्य निवडण्याच्या प्रक्रियेत परत ‘भाजप-एमआयएम’ युती वेगळ्या रूपात समोर आली. एमआयएमकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी एमआयएमकडून ताज राणा यांचं नाव आलं होतं.

महापालिका निवडणुकीत एकच ईव्हीएम असणार की अनेक ? कसे करणार मतदान ,जाणून घ्या संपूर्ण माहिती

यासोबतच एमआयएमने भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचा मुलगा जितेन बरेठिया यांनाही उमेदवारी दिलीय. यात ताज राणा यांनी वेळ निघून गेल्यावर उमेदवारी दाखल केल्याचे कारण देत त्यांचा उमेदवारी अर्ज स्विकारण्यात आला नाही.

 

त्यामुळे एमआयएमकडून एकमेव अर्ज आलेले भाजपचे जितेन बरेठिया हे एमआयएमचे स्विकृत नगरसेवक असतील. आता, एमआयएमचे स्विकृत नगरसेवक पदाचे उमेदवार ताज राणा कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत.

शिंदेंचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले,दादागिरी हा आमचा धंदा

मात्र, भाजपने एमआयएमसोबत युती करण्यास कारणीभूत असलेले आमदार प्रकाश भारसाकळे आणि शहराध्यक्ष हरीश टावरी यांच्यावर अद्यापही कारवाई केली नाही. स्विकृत सदस्यामूळे अकोटमध्ये भाजप-एमआयएम युतीची परत नव्याने चर्चा सुरू झालीय.

 

दरम्यान, भाजप-एमआयएमच्या या पाठिंब्यावर आणि युतीवर काँग्रेस तीव्र शब्दात विरोध दर्शवला आहे. तसेच, भाजप आणि एमआयएम एकच आहे, असेही येथील काँग्रेस नेत्यांनी म्हटलं.

वर्षातील पहिले ग्रहण 3 तास 27 मिनिटे राहणार काळाकुठ्ठ अंधार

भाजप नेत्याला
स्विकृत
नगरसेवक
पदासाठी समर्थन देणारे
एमआयएमचे 5 नगरसेवक
:
1) आफरीन अंजुम शरीफोद्दीन : गटनेता

2) दिलशादबी रज्जाक खा

3) रेशमा परविन मोहम्मद अजीम

4) डॉ. युसूफ खान हादीक खान

5) हन्नान शाह सुलतान शाह

 

 

Related Articles