दोन लाखांची लाच,दोन फौजदार अँटी करप्शन चा ट्रॅप , गुन्हा दाखल होताच पसार
A bribe of two lakhs, two police sub-inspectors caught in an Anti-Corruption trap, absconded as soon as the case was registered.

फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी कंत्राटदाराकडून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्याने मुंबईनाका पोलीस ठाण्यातील दोन उपनिरीक्षकांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नव्या वर्षाची सुरुवात महागाईपासून ,एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ
विशेष म्हणजे, गुन्हा दाखल होताच दोन्ही पोलीस उपनिरीक्षक पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. दत्तात्रय एकनाथ गोडे (रा. शकुंतला हाइट्स, कामटवाडे रोड, सिडको) आणि अतुल भुजंगराव क्षीरसागर (रा. सिंहगड, शासकीय विश्रामगृह) अशी या संशयित उपनिरीक्षकांची नावे आहेत.
या प्रकरणात गडकरी चौकातील शासकीय विश्रामगृहाच्या उपहारगृहाचे चालक रमेश गंभीरराव आहिरे आणि त्यांचा मुलगा कल्पेश रमेश आहिरे यांनी मध्यस्थी केल्याचे उघड झाले आहे.
उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांचा दबाव
क्षीरसागरच्या माध्यमातून गोडे याच्यापर्यंत पोहोचत, चौघांनी संगनमताने लाचेची रक्कम स्वीकारल्याचा आरोप आहे. विशेष बाब म्हणजे, ज्या मुंबईनाका पोलीस ठाण्यात हे दोन्ही उपनिरीक्षक कार्यरत आहेत,
त्याच पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) उपअधीक्षक एकनाथ पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
अजित पवारांचा उमेदवारांना विजयासाठी दिला ‘अनोखा’ कानमंत्र
या प्रकरणातील मूळ तक्रारदार केतन भास्करराव पवार हा मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयित असून, तो व्यवसायाने कंत्राटदार आहे.
अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितली जात असल्याची मागणी उपनिरीक्षकांमार्फत उपहारगृह चालक कल्पेश आहिरे याने केल्याचे तपासात समोर आले.
मात्र, केतन पवारने लाच देण्यास नकार देत थेट एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने पडताळणी केली असता, लाचेची मागणी होत असल्याचे स्पष्ट झाले.
हवामान विभागाचा राज्यात पावसाचा इशारा, अलर्ट जारी
त्यानुसार, एसीबीच्या पथकाने शनिवारी रात्री शासकीय विश्रामगृहात सापळा रचला. सापळ्यादरम्यान कल्पेश आहिरे याने पंचासमक्ष दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान, ही रक्कम दत्तात्रय गोडे आणि अतुल क्षीरसागर यांच्यासाठीच घेतल्याची कबुली त्याने दिली.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील यांच्यासह हवालदार योगेश साळवे आणि दिनेश खैरनार यांच्या पथकाने केली.
VIDEO ;डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाप्रमाणे मोदींचंही अपहरण करतील?’, काँग्रेस नेत्याच्या विधानाने खळबळ
सध्या दोन्ही पोलीस उपनिरीक्षक पसार असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीच्या पोलीस निरीक्षक पूनम केदार करत आहेत.
या प्रकरणात अतुल क्षीरसागर हा मास्टरमाइंड असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मूळ तक्रारदार केतन पवार हा देयके काढण्यासाठी नेहमीच शासकीय विश्रामगृहात येत-जात असल्याने त्याची आहिरे पिता-पुत्रांशी ओळख झाली होती.
अजित दादा परभणीत आले आणि नेहमीचे विकासाचे तुणतुणे वाजवून गेले
दाखल गुन्ह्यातून सुटका मिळवण्यासाठी पवारने उपहारगृह चालकांकडे मार्गदर्शन मागितले. त्यावेळी आहिरे पिता-पुत्रांनी विश्रामगृहात वास्तव्यास असलेल्या क्षीरसागरशी असलेली ओळख वापरत मध्यस्थी केली,
हवामान विभागाचा राज्यात पावसाचा इशारा, अलर्ट जारी
तर क्षीरसागरने पुढे दत्तात्रय गोडे याच्याशी संपर्क साधून जामीन मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी चौघांनी मिळून दोन लाख रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याचे तपासात उघड झाले आहे.









