राज्यात काँग्रेसचे पाच महापौर?
Five Congress mayors in the state?

गेल्या दशकभरात काँग्रेस रसातळाकडे जात आहे. बोटावर मोजण्यात इतकी राज्य सर्वात जुन्या पक्षाच्या हातात आहेत. तर अनेक संस्थांवर भाजपचे अधिक्रमण वेगाने होत आहे.
लोकसभा वगळता काँग्रेसला विधानसभेत अतिआत्मविश्वास नडला तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळाची खुमखुमी आणि आघाडीची चुकलेली गणितं, काँग्रेसला पुन्हा ‘वंचित’ करून गेली.
बापरे…! मराठवाड्यातील 155 पोलीस कर्मचाऱ्यांवर त्यांच्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
राज्यात इतकी हाराकिरी सुरु असताना लातूरची गढी राखण्यात काँग्रेसला यश आले. तर कोल्हापूरच्या तालमीत पक्षाने अनेकांना चित्तपट करूनही सत्ता मिळेल याची शाश्वती नाही.
विजय वडेट्टीवारांमुळे चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा सूर्य उगवला. तर भिवंडीत कदाचित काँग्रेस सत्तेतील वाटेकरी असेल. एकूणच अनेक ठिकाणी पराभवाच्या राखेतूनही विजयाचे धुमारे फुटले आहेत.
भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी
त्यामुळे थोडी अधिक मेहनत घेतली, नियोजन केलं, अंतर्गत वादावर तोडगा काढला आणि पक्षाला शिस्त लावली तर दिल्ली दूर नही असाच संदेश मिळताना दिसतोय.
काँग्रेसने लातूरची गढी राखली. एकूण ७० जागा असलेल्या महापालिकेत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत ४३ जागांवर बाजी मारली. गेल्यावेळीपेक्षा काँग्रेसने अधिक जागा खिशात घातल्या.
वंचितला ४ जागा मिळाल्या. या ठिकाणी भाजप २२ जागांवरच थांबली. तर शिंदेसेनेला भोपळा मिळाला. शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धवसेना, मनसेला भोपळा मिळाला. तर दादांचा एक उमेदवार निवडून आला.
दारुण पराभवानंतर काका- पुतण्यामध्ये दिड तास बैठक , पुढचा प्लॅन ठरला?
परभणीत उद्धव सेना आणि काँग्रेसने मोठा खेला केला. एकूण ६५ जागांपैकी उद्धव सेनेला २५ तर काँग्रेसला १२ जागा मिळाल्या. परभणीकरांनी भाजपला १२ ठिकाणी रोखले.
शिंदे सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला खातं उघडता आलं नाही. जगात जर्मनी आणि भारतात परभणी, असे उगाच म्हणत नाही हे या शहरानं दाखवून दिलं.
आता भाजपाला अजित पवार नको ?, अमित शाह यांच्या ‘त्या’ ट्वीटने चर्चा
चंद्रपूरमध्ये एकूण ६६ जागांपैकी काँग्रेसने २७ ठिकाणी मुसंडी मारत भाजपला मोठा धक्का दिला. याठिकाणी भाजप अंतर्गत कलहामुळे २३ जागांवरच आटोपली.
विजय वडेट्टीवारांच्या गणितामुळे काँग्रेसने भाजपला अस्मान दाखवले. त्यामुळे भाजपला हरवणे अवघड नाही असेच संदेश दिल्लाला दिला.
आता भाजपाला अजित पवार नको ?, अमित शाह यांच्या ‘त्या’ ट्वीटने चर्चा
अमरावतीत भाजप आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षात राजकीय चुरशीचा काँग्रेसला फायदा घेता आला नाही. काँग्रेसला या ठिकाणी १५ जागा मिळाल्या.
थोडा जोर लावला असता तर कदाचित काँग्रेसने येथे मोठा गेम पालटवला असता. युवा स्वाभिमानीला १५ आणि भाजपला इथं २५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे युवा स्वाभिमानी हा किंगमेकरच्या भूमिकेत आहे.
मुबई महापालिका महापौर पदाबाबत उद्धव ठाकरेचं मोठं विधान म्हणाले ‘देवा’ची इच्छा असेल तर…
राज्यातील २९ महानगरपालिकांचे निकाल हाती आल्यानंतर ठाकरे ब्रँड, पवार काका-पुतणे यांच्या पाठोपाठ काँग्रेसच्या हाराकिरीची चर्चा रंगली.
नव्या दमाचे विदर्भातील प्रदेशाध्य हर्षवर्धन सपकाळ यांनी या निवडणुकीत हरेएक प्रयोग करून पाहिला. मुंबईत स्वबळाचा नारा दिला.
काही ठिकाणी वंचितसोबत आघाडी, तर इतर महापालिकांमध्ये वेगळा प्रयोग केला. तरीही पाहिजे तसे यश खेचून आणण्यात काँग्रेसला यश आले नाही.
महापालिकेत कमी जागा पण शिंदेसेनेचा भाजपकडे सत्तेत वाट्याची मागणी , थेट या पदावर दावा
पक्षाला मिळालेले यश समाधानकारक नसले तरी यश अपयशाची चर्चेत पडता ही वैचारिक लढाई असल्याचा दावा प्रदेशाध्यक्षांनी केला.
सध्याची जी आकडेवारी आहे. त्यानुसार काँग्रेस अनेक महापालिकेत जसा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समोर आला आहे. तसेच पाच शहरात काँग्रेसचा महापौर तर ३५० नगरसेवक आणि १० ठिकाणी सत्तेत सभागी होऊ असे चित्र असल्याचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुका लांबणीवर?
अपयशाने खचून न जाता पुढच्या लढाईसाठी काँग्रेस सज्ज असल्याचा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजपवर फिक्सिंगचा वापर केल्याचा आरोप केला.
मुंबईत काँग्रेसने २४ जागा मिळवल्या आहेत. मनसेच्या तुलनेत त्यांनी चांगलं प्रदर्शन केलं असलं तरी गेल्यावेळी पेक्षा काँग्रेसला मोठी कामगिरी बजावता आलेली नाही.
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुका लांबणीवर?
इतर काही महापालिकेत तर काँग्रेसला खातंही उघडता आलेले नाही. ठाणे, नवी मुंबई, धुळे, जळगाव, पिंपरी चिंचवड,इलचकरंजीत काँग्रेसला उमेदवार निवडून आणता आलेला नाही.
गटातटातील काँग्रेस एकजूट होऊन जर कामाला लागली तर सत्तेचे गणित पालटू शकते हे या निकालावरून दिसून येते. या महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना जादा मेहनत घेतली.
डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला मोठी धमकी
तर प्रचारावर फार काही जोर दिसला नाही. त्यामुळे काँग्रेसने अंग झाडून प्रयत्न केला तर मोठं यश या पक्षाच्या पदरात पडू शकते, हेच या पराभवातून शिकण्यासारखं आहे.








