उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी मागितला MIM ला पाठिंबा
Deputy Chief Minister Eknath Shinde sought support from the MIM party to form a government in the municipal corporation.

महापालिका निवडणुकीमध्ये असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमचा मोठा करिश्मा पाहायला मिळाला. अनेक महाालिकांमध्ये एमआयएमने मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं.
महापालिका निवडणुकीवरून राहुल गांधी म्हणाले ही लोकशाहीची थट्टा
राज्यातील 29 पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमने 125 जागा जिंकल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक म्हणजे 33 नगरसेवक विजयी झाले आहेत.
तर मालेगावात महापालिकेत एमआयएमने 21 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे राज्यभरात एमआयएमची जोरदार चर्चा रंगली आहे.
त्यातच आता एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मालेगाव महापालिकेत आमचा पाठींबा मागितल्याचा खळबळजनक दावा केलाय.
भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी
राज्यातील काही महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठी एमआयएम पक्षाचा पाठींबा मागितला जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत तुमच्याशी कोणत्या पक्षाने याबाबत चर्चा केली आहे का?
याबाबत विचारले असता इम्तियाज जलील म्हणाले की, तीन-चार महापालिकेमध्ये तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण आम्ही स्पष्ट केलेले आहे की,
दारुण पराभवानंतर काका- पुतण्यामध्ये दिड तास बैठक , पुढचा प्लॅन ठरला?
भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना वगळून चांगले अलायन्स करता येत असेल तर त्याचा अहवाल पाठवावा, अशा सूचना स्थानिक पातळीवर देण्यात आलेल्या आहेत.
काँग्रेसने एका ठिकाणी पाठिंबा मागितला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील पाठीमागे घेतलेला आहे. आम्ही त्याला स्पष्टपणे नकार दिलेला आहे.
कोणत्याही परिस्थितीत आम्ही मालेगावसारख्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणार नाही. जे भारतीय जनता पार्टी सोबत आहेत,
आता भाजपाला अजित पवार नको ?, अमित शाह यांच्या ‘त्या’ ट्वीटने चर्चा
त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. आता इम्तियाज जलील यांच्या दाव्यावर शिवसेना शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, मालेगाव महापालिका निवडणुकीत इस्लाम पक्षानं वर्चस्व मिळवलं आहे. इस्लाम पक्षानं मालेगाव महापालिका निवडणुकीत 35 जागांवर विजय मिळवला आहे.
मुबई महापालिका महापौर पदाबाबत उद्धव ठाकरेचं मोठं विधान म्हणाले ‘देवा’ची इच्छा असेल तर…
या पक्षानं समाजवादी पक्षानं 6 जागा मिळवला आहे. मालेगाव महापालिकेची सदस्यसंख्या 81 इतकी आहे. मालेगावात इस्लाम पक्ष आणि समाजवादी पक्षानं मालेगाव सेक्युलर फ्रंट या नावानं आघाडी केली होती.
या आघाडीचा महापौर मालेगाव महानगरपालिकेत होऊ शकतो. मालेगाव महानगरपालिकेत पूर्व भागात 62 जागा आहेत. या सर्व जागा इस्लाम पक्ष आणि एमआयएम यांच्यात प्रतिष्ठा पणाला लागली होती.
महापालिकेत कमी जागा पण शिंदेसेनेचा भाजपकडे सत्तेत वाट्याची मागणी , थेट या पदावर दावा
यात इस्लाम पक्षानं बाजी मारली आहे. त्यांच्या 35 जागा विजयी झाल्या. एमआयएमनं 21 जागांवर विजय मिळवला आहे. मालेगाव पश्चिममध्ये शिवसेना
आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेनेनं मालेगाव पश्चिममध्ये 18 जागांवर विजय मिळवला तर भाजपनं 2 जागांवर विजय मिळवला आहे.
राज्यात काँग्रेसचे पाच महापौर?
इस्लाम पार्टी – 35
समाजवादी पार्टी – 5
शिवसेना (शिंदे गट) – 18
एमआयएम – 21
काँग्रेस – 3
भाजप – 2








