कोट्याधीश भिकारी ,3 बंगल्यांचा मालक,कार आणि स्वतःसाठी ठेवलाय ड्रायव्हर

A millionaire beggar, owner of 3 bungalows, a car, and even has a driver for himself.

 

 

 

image.png

 

रस्त्यावर फिरण्यासाठी लोखंडी चाकं असणारं लाकूड, खांद्यावर पिशवी आणि हात जमिनीवर ठेवण्यासाठी शूज….अशा अवस्थेत भीक मागण्यासाठी सराफा बाजारात फिरणारा भिकारी करोडपती असेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती.

 

तो वाटसरूंकडे भीक मागत नाही, पण अशाप्रकारे बसतो की लोकांना त्याच्याकडे पाहून मदत म्हणून एखादं नाणं किंवा नोट टाकण्याची इच्छा व्हावी. या भिकाऱ्याचं नाव मंगिलाल आहे.

अजितदादांना निवडणुकीत अपयश येण्याचे बड्या नेत्याने सांगितले कारण

शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असणारा करोडपती, ज्याच्या नावावर सरकारी योजनेतून मिळालेल्या घरासह तीन घरं, तीन ऑटो-रिक्षा आणि एक मारुती सुझुकी डिझायर कार आहे.

 

महिला आणि बाल विकास विभागाने भिकारीमुक्त शहर बनवण्यासाठी इंदूरमध्ये सुरू केलेल्या मोहिमेदरम्यान ही बाब उघडकीस आली. शनिवारी रात्री उशिरा बचाव पथकाने मंगिलालला ताब्यात घेतलं.

मुंबईतील MIMचा पहिला हिंदू नगरसेवक,उमेदवारीसाठी डिपॉझिट भरायला पैसे उधार घेतले

कारण तो सराफा परिसरात नियमितपणे भीक मागणारा कुष्ठरोगी असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यांना ही एखादी नियमित घटना असावी असं वाटलं. परंतु, त्याऐवजी एका आर्थिक नाट्यमय घटनेचा उलगडा झाला.

 

वर्षानुवर्षे, मंगिलालने न मागता भीक मागण्याची कला आत्मसात केली होती. तो कधीही भीक मागत नसे. तो आपल्या लाकडी फळीवर बसून राहायचा. नंतर सहानुभूतीच सर्व काही काम करत असे.

राज्यात काँग्रेसचे पाच महापौर?

लोक स्वतःहून त्याला पैसे देत असत. केवळ भीकमधून त्याची दररोजची कमाई 400 ते 500 रुपयांच्या दरम्यान होती. पण, तपासकर्त्यांच्या मते, खरा धंदा अंधार पडल्यानंतर सुरू व्हायचा.

 

चौकशीदरम्यान, मंगिलालने कबूल केले की भीकमधून मिळालेले पैसे तो जगण्यासाठी खर्च करत नव्हता, तर ते थेट सराफा बाजारात गुंतवत होता. तो स्थानिक व्यापाऱ्यांना एक दिवसासाठी किंवा आठवड्यासाठी रोख रक्कम कर्ज म्हणून देत असे

 

आणि दररोज संध्याकाळी स्वतः व्याज वसूल करत असे. अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, त्याने 4 ते 5 लाख रुपये कर्ज दिले असून, व्याजासह दररोज 1 ते 2 हजार रुपये कमावत होता.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी मागितला MIM ला पाठिंबा

गरीब वाटणाऱ्या मंगिलालची संपत्ती चक्रावून टाकणारी आहे. त्याच्या मालकीची प्रत्यक्षात, प्रमुख भागांमध्ये तीन घरे आहेत, ज्यात एक तीन मजली इमारत, दररोज भाड्याने दिल्या जाणाऱ्या तीन ऑटो-रिक्षा आणि एक मारुती सुझुकी डिझायर कार यांचा समावेश आहे,

 

ही कार तो स्वतः चालवण्याऐवजी भाड्याने देतो असं सांगितले जातं आहे. अनेक मालमत्तांचा मालक असूनही, त्याला त्याच्या अपंगत्वामुळे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (PMAY) वन बीएचके घरही मिळालं आहे.

अजितदादांना निवडणुकीत अपयश येण्याचे बड्या नेत्याने सांगितले कारण

महिला आणि बाल विकास अधिकारी तथा बचाव कार्याचे नोडल अधिकारी दिनेश मिश्रा यांच्या माहितीनुसार, मंगिलालला आता उज्जैन येथील सेवाधाम आश्रमात हलवण्यात आलं आहे.

 

त्याच्या बँक खात्यांची आणि मालमत्तांची चौकशी सुरू आहे आणि त्याच्याकडून पैसे घेतलेल्या व्यापाऱ्यांचीही चौकशी केली जाणार आहे.

चिंता वाढवणारी बातमी;’या “लाडक्या बहिणींचे पैसे थांबवले

या कारवाई आणि त्यातील निष्कर्षांबद्दल सविस्तर माहिती देताना मिश्रा म्हणाले, “चौकशीदरम्यान, मंगिलालने कबूल केलं की तो भीक मागून मिळालेले पैसे सराफा भागातील काही व्यापाऱ्यांना व्याजाने देत असे.

 

तो एका दिवसासाठी किंवा आठवड्यासाठी पैसे उधार देत असे आणि व्याज वसूल करण्यासाठी दररोज सराफा भागात येत असे.”

 

या कारवाईची सविस्तर माहिती देताना मिश्रा पुढे म्हणाले, “शनिवारी रात्री १० वाजता, बचाव पथकाला माहिती मिळाली की, सराफा भागात जवळपास दर आठवड्याला भीक मागणारा मंगिलाल नावाचा एक माणूस कुष्ठरोगी आहे.

अजित पवारांचा उमेदवारांना विजयासाठी दिला ‘अनोखा’ कानमंत्र

बचाव पथकाने काळजीपूर्वक नियोजन करून रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत बाहेर थांबून त्याची सुटका केली. सुटकेनंतर, जेव्हा त्याच्याबद्दल माहिती गोळा करण्यात आली,

 

तेव्हा असे आढळून आले की, मंगिलालच्या मालकीची तीन घरं आहेत, त्यापैकी एक तीन मजली इमारत आहे आणि इतर दोन एक मजली घरं आहेत,

प्रचार सभेत नारायण राणेंना स्टेजवरच आली चक्कर

जी सर्व चांगल्या परिसरात आहेत. त्याच्या मालकीच्या तीन ऑटो-रिक्षा देखील आहेत, ज्या तो भाड्याने देतो. त्याच्याकडे मारुती सुझुकी डिझायर कार आहे, जी तो प्रवासासाठी वापरतो.”

 

मंगिलाल 2021-22 पासून भीक मागत आहे. त्याला सध्या एका निवारागृहात ठेवण्यात आलं आहे. त्याच्याबद्दल अधिक माहिती गोळा केली जात आहे,

निवडणुकीनंतरही राज्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्रच

आणि एक संपूर्ण अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. पुढील निर्देशानुसार कारवाई केली जाईल, असं मिश्रा यांनी सांगितलं आहे.

 

या प्रकरणामुळे फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू झालेल्या इंदूरच्या भिकारीविरोधी मोहिमेत एक अनपेक्षित अध्याय जोडला गेला आहे. एका अधिकृत सर्वेक्षणानुसार शहरात सुमारे 6500 भिकारी असल्याचं आढळून आलं आहे.

काँग्रेस पक्षाकडून नुकतेच निवडून 12 आलेले नगरसेवक गेले भाजपात

आतापर्यंत, 4500 जणांनी समुपदेशनानंतर भीक मागणं सोडलं आहे, 1600 जणांची सुटका करून त्यांना पुनर्वसन केंद्रांमध्ये पाठवण्यात आलं आहे, आणि 172 मुलांना शाळांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

 

 

Related Articles