आमदाराच्या पुतण्याचा तुरुंगामध्ये मृत्यू

The MLA's nephew died in prison.

 

 

शहापूर तालुक्यातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा यांचे पुतणे हरीश दरोडा यांना आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली होती.

कोट्याधीश भिकारी ,3 बंगल्यांचा मालक,कार आणि स्वतःसाठी ठेवलाय ड्रायव्हर

कारागृहात असतानाच हरेश दरोडा यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला, त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले,

 

मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहापूर तालुक्यासह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेना नाव आणि धनुष्यबाणावर अंतिम सुनावणी पुढे ढकलली ,काय घडले कारण ?

शहापूर तालुक्यात खरीप व रब्बी हंगाम 2022-23 या आर्थिक वर्षात केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या भात खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.

 

तपासात असे उघड झाले की, साकडबाव केंद्रांतर्गत 13 हजार 892 क्विंटल भात खरेदी दाखवण्यात आली होती. यापैकी 8 हजार 771 क्विंटल भात भरडाईसाठी उचलण्यात आला.

राजकारणात मोठी घडामोड;महापौरपदासाठी मनसेने दिला थेट शिंदे गटाला पाठिंबा

मात्र, उर्वरित 5 हजार 120 क्विंटल भात प्रत्यक्षात शिल्लक आढळून आला नाही. या प्रकारामुळे सुमारे एक कोटी साठ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे तपासणीदरम्यान स्पष्ट झाले आहे.

 

या प्रकरणात साकडबाव आदिवासी सेवा सोसायटीचे अध्यक्ष हरीश दरोडा, तसेच आदिवासी विकास महामंडळाचे तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे,

जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात MIM ची इंट्री

शहापूरचे तत्कालीन उपप्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड यांच्यासह एकूण सहा जणांविरोधात किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

शहापूरचे उपप्रादेशिक व्यवस्थापक सागर सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शेतकऱ्यांच्या खोट्या व बोगस चलन पावत्या तयार करून तब्बल पाच हजार क्विंटल भात खरेदीचा बनाव करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

 

मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली?
गुन्हा दाखल झाल्यानंतर हरेश दरोडा यांना अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, कारागृहात असतानाच त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 

दरम्यान, अटक होण्यापूर्वी हरेश दरोडा यांनी या भात खरेदी घोटाळ्यात आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा केला होता. साकडबाव आदिवासी सेवा संस्थेचे केंद्रप्रमुख जयराम सोगीर यांनी

23 जानेवारीला सर्व शाळांना सुट्टी, नेमकं कारण काय?

भात खरेदीत कोणताही गैरव्यवहार केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी माझी असेल, असे हमीपत्र दिले असल्याचे दरोडा यांनी सांगितले होते. तसेच महामंडळाशी थेट करार सोगीर यांचाच होता, असा दावाही त्यांनी केला होता.

 

 

Related Articles