अजितदादा लवकरच महाविकास आघाडीत;मोठ्या नेत्याचा दावा

Ajit Dada will soon join the Maha Vikas Aghadi; a senior leader claims.

 

 

महापालिका निवडणुकांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी युत्या, आघाड्या दिसल्या. काही ठिकाणी भाजप-शिंदे एकत्र लढले, 20 वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधूही एकत्र आले.

 

काही काळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार बाहेर पडले आणि महायुतीत सामील झाले. मात्र नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन त्यांनी पुणे, पिंपरीसह अनेक ठिकाणी निवडणूक लढवली.

16 वर्षांच्या खालील मुलांना सोशल मीडिया बंदी

याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार हे आता माहाविकास आघाडीत दिसणार नाहीत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने तुमच्यासोबत नसतील का असा सावल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला.

 

मात्र त्यावर थेट उत्तर न देता संजय राऊत यांनी सकाळी सकाळी एक वेगळाच बॉम्ब फोडला. शरद पवार अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील असा का विचार करत नाही ?

 

असा उलट सवालच राऊतांनी विचारला. भविष्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्रित महाविकास आघाडीत दिसतील.

सर्वात भ्रष्ट पक्ष जर देशात कोणताही असेल, तर तो भारतीय जनता पक्ष

अजित पवार त्यांच्या पक्षासह आज शरद पवारांसोबत युती करत आहेत. त्यांचं मन कुटुंबाकडे आहे. त्यामुळे अख्खं कुटुंब महाविकास आघाडीत येईल असं भाकित राऊत यांनी केल्याने एकच खळबळ माजली आहे.

 

या पएकंदर मुद्यावर राऊत सविस्तर बोलले. शरद पवार बाहेर पडणार असा का विचार करता. शरद पवार अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील असा का विचार करत नाही ?

काँग्रेसच्या नगरसेवकांना भाजपकडून एक कोटींची ऑफर ?

कारण शरद पवार हे आमच्यासोबत आहेत. त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे. अजित पवार यांचा पक्ष युतीत आहे. तरीही महाविकास आघाडीसोबत पाट लावला आहे.

 

अशावेळी त्यांच्यावर तिथे कारवाई होईल, असं राऊत म्हणाले. आमच्या माहितीनुसार, भविष्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्रित महाविकास आघाडीत दिसतील. अजितदादांना बाहेर पडावं लागेल. दोन दगडावर पाय कसे ठेवणार? काही तरी एक सोडावं लागेल ना? असंही राऊत म्हणाले.

दारुण पराभवानंतर काका- पुतण्यामध्ये दिड तास बैठक , पुढचा प्लॅन ठरला?

सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद केलेली नाही अशी आठवण भाजपचे नेते अनेकदा करून देत असता, याबद्दल राऊत यांना सवाल विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी एका वाक्यात चपखल उत्तर दिलं.

 

“मेलं मेंढरू आगीला भीत नाही” अ,ं राऊत म्हणाले. तुम्ही (भाजप) एकदा अजित पवारांना क्लीनचिट दिलीय ना. स्वत मोदींनी गर्जना केल्यावरही ते सरकारमध्ये आले.

महापालिका निवडणुकीत एकच ईव्हीएम असणार की अनेक ? कसे करणार मतदान ,जाणून घ्या संपूर्ण माहिती

कोणत्या तोंडाने डरकाळ्या फोडत आहात? त्या फाईलमध्ये काही आहे की नुसत्या पोकळ डरकाळ्या फोडत आहात? असा सवाल राऊतांनी विचारला.

 

छगन भुजबळ यांच्या विरोधात किती बोंबा मारल्या. अडीच वर्ष जेलमध्ये राहिले. आम्हीही राहिलो. भुजबळ सर्व प्रकरणात निर्दोष झाले. याबद्दल गृहखात्याने आणि ईडीने प्रायश्चित घेतलं पाहिजे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी मागितला MIM ला पाठिंबा

म्हणजे ते निर्दोष आहेत. असं त्यांना वाटतं. जोपर्यंत भाजपकडे सत्ता आहे. तोपर्यंत मनाने तनाने धनाने भाजपसोबत आहेत. जेव्हा सत्ता पालटेल तेव्हा मनाने तनाने धनानं ते आमच्यासोबत असतील असंही राऊत म्हणाले.

 

 

दरम्यान अजित पवार महाविकास आघाडीत येतील असं संजय राऊत यांनी म्हटलं. त्यावर सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. “राजकारणात अनेक दगडांवर पाय ठेवण्याची राजकारण्यांना सवय लागली आहे.

 

दोन दगडांवर पाय आहे, म्हणून पाय घसरेल असं काही होत नाही. अजित पवार समर्थ आहेत. अजित पवार जे काही करतायत त्याच्या क्रिया-प्रतिक्रियांची त्यांना पूर्ण जाणीव आहे.

 

त्यामुळे त्यांना याची जाणीव नाही असं म्हणणं अयोग्य आहे. ते जे काही करत असावेत ते सर्वांना विश्वासात घेऊन केलं असेल किंवा जे काही करत असतील, त्याच्या परिणामांची त्यांना पूर्ण जाणीव असेल आणि ते जाणीवपूर्वक राजकारण करत असावेत” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

 

 

भुजबळ यांना ईडीने क्लीनचीट दिली. त्यावर मुनगंटीवार म्हणाले की, “ईडी च्या क्लीनचीट बाबत मला काही माहीत नाही. जर क्लीन चीट दिली असेल तर त्यांचं नशीब, त्यांचं काम त्यांच्यासोबत आहे”. “एक तर गट नोंदणी करायला 30 दिवस आहेत आणि दुसरं म्हणजे आम्हाला आमच्या नगरसेवकांवर पूर्ण विश्वास आहे” असं चंद्रपूरमधील भाजपच्या गट नोंदणीवर सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

 

“उबाठाचा महापौर करण्याचा दुर दुर पर्यंत विषय नाही. महापौर होईल तर भाजपचाच होईल, नाहीतर आम्ही विरोधी पक्षात बसू, दुसऱ्या पक्षाचा महापौर करण्यात भाजपच्या नगरसेवकांना कुठलीच रुची नाही” असं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

 

 

Related Articles