एका मेल वर 16 हजार कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
16,000 employees were laid off via a single email.

अॅमेझॉन पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर नोकरकपातीच्या दिशेने जात असल्याचे संकेत मिळत आहेत. एका अहवालांनुसार 27 जानेवारी रोजी अॅमेझॉनकडून नव्या फेरीतील कर्मचारी कपात जाहीर होण्याची शक्यता असून यात जगभरातील सुमारे 16 हजार कर्मचाऱ्यांवर गंडांतर येऊ शकते.
16 वर्षांच्या खालील मुलांना सोशल मीडिया बंदी
ही कारवाई कंपनीच्या व्यापक पुनर्रचनेचा भाग असून, 2026 च्या मध्यापर्यंत एकूण जवळपास 30 हजार कॉर्पोरेट नोकऱ्या कमी केल्या जाऊ शकतात.
विशेष म्हणजे यावेळी ही नोकरकपात भौगोलिकदृष्ट्या अधिक व्यापक असण्याची शक्यता आहे. आधीच्या तुलनेत भारतामधील टीम्सवर अधिक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वात भ्रष्ट पक्ष जर देशात कोणताही असेल, तर तो भारतीय जनता पक्ष
Blind आणि Reddit यांसारख्या प्लॅटफॉर्मवर सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या चर्चांनुसार आणि विविध माध्यमांच्या वृत्तांनुसार येत्या काही दिवसांत अॅमेझॉनकडून अधिकृत घोषणा होऊ शकते.
या छाटणीचा फटका Amazon Web Services (AWS) आणि Prime Video यांसारख्या महत्त्वाच्या विभागांनाही बसू शकतो.
Reuters च्या एका अहवालानुसार 2025 अखेरपर्यंत अॅमेझॉनने सुमारे 30 हजार कॉर्पोरेट पदे कमी करण्याचा आराखडा आखला होता. त्यानंतर कंपनीने 14 हजार नोकऱ्या कमी केल्याची अधिकृत पुष्टी केली.
खळबळजनक घटना;नाशिक मध्ये 400 कोटी पळवले? पोलिसांना खबर नाही,
आता दुसऱ्या टप्प्यात आणखी 16 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाण्याची शक्यता असून, त्यामुळे एकूण नोकरकपात जवळपास 30 हजारांवर पोहोचू शकते.
असे झाल्यास ही कपात 2022 आणि 2023 मध्ये झालेल्या 27 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरकपातीपेक्षाही मोठी ठरेल. सध्या अॅमेझॉनकडे जगभरात सुमारे 15.7 लाख कर्मचारी आहेत. मात्र या कपातीचा मुख्य फटका सुमारे 3.5 लाखांच्या कॉर्पोरेट वर्कफोर्सला बसणार आहे.
अजितदादा लवकरच महाविकास आघाडीत;मोठ्या नेत्याचा दावा
या आगामी कपातीचा परिणाम अॅमेझॉनच्या अनेक महत्त्वाच्या विभागांवर होण्याची शक्यता आहे. यामध्ये AWS (Amazon Web Services),Prime Video, Retail Operations, People Experience and Technology (PXT) म्हणजेच
अॅमेझॉनचा अंतर्गत HR विभाग यांचा समावेश आहे. विशेषतः बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई येथील भारतीय कॉर्पोरेट टीम्स यावेळी अधिक असुरक्षित मानल्या जात आहेत.
अजितदादा लवकरच महाविकास आघाडीत;मोठ्या नेत्याचा दावा
Reddit, Blind आणि LinkedIn वरील अॅमेझॉन कर्मचाऱ्यांच्या पोस्टनुसार 27 जानेवारीच्या आठवड्याच्या सुरुवातीलाच नोकरकपात प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. Blind वरील अनेक कर्मचाऱ्यांचा दावा आहे की, काही मॅनेजर्स आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आधीच कपातीचे संकेत दिले आहेत.
काही अहवालांनुसार, Performance Improvement Plan (PIP) वर असलेल्या कर्मचाऱ्यांना आधी सूचना दिली जाऊ शकते. तसेच, आधीच 1,000 ते 2,000 कर्मचाऱ्यांना WARN नोटिसा पाठवण्यात आल्याचेही म्हटले जात आहे.
कोणत्याही क्षणी उडू शकतो युद्धाचा भडका, जग भयंकर संकटात
अमेरिकेच्या कायद्यानुसार मोठ्या प्रमाणावर नोकरकपात करण्यापूर्वी अशा नोटिसा देणे बंधनकारक आहे. मात्र अॅमेझॉनने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.








