प्लेन क्रॅशपूर्वी अजित पवारांनी ‘या’ BJP नेत्याला केला होता शेवटचा फोन कॉल

Before the plane crash, Ajit Pawar had made his last phone call to 'this' BJP leader.

 

 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत लँडिंगदरम्यान अपघात झाला. हे विमान मुंबईहुन रवाना झाले होते. लँडिंगच्या वेळी हा अपघात झाला.

अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची सूत्रं कोणाच्या हाती? पक्षाला नवा चेहरा मिळणार?

साधारण बुधवारी सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास अजित पवार बारामतीकडे येत होते. त्यावेळी बारामती विमानतळापासून थोड्याच साधारण 500 फूट उंच आभाळात असतानाच हे विमान दरीसदृश्य भागामध्ये विमान कोसळलं. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आले आहे.

 

दोनदा विमानाने राउंड मारला आणि त्यानंतर उतरताना विमान क्रॅश झाले असं प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. हे विमान कोसळताच आधी मोठे धुराचे लोट उठले आणि त्यानंतर आग लागलेली दिसली. दरीमध्ये असणाऱ्या एका शेतात हे विमान कोसळल्याची माहिती मिळाली. या घटनेचे अनेक व्हिडीओ समोर आले असून ते फारच धक्कदायक आहेत.

राज्यात काँग्रेसचे पाच महापौर?

 

कोणाला केला होता शेवटचा कॉल?
मिलेल्या माहितीनुसार, अपघातापूर्वी अजित पवार यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना शेवटचा फोन कॉल केला होता. तसेच विमानात बसण्यापूर्वी त्यांच्यात संवाद झाला होता आणि बारामतीत उतरल्यावर पुन्हा बोलणं होणार होतं, असेही म्हटले जात आहे. मात्र या सर्व बाबींना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

 

अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची सूत्रं कोणाच्या हाती? पक्षाला नवा चेहरा मिळणार?

कोण आहेत राणाजगजीतसिंह पाटील?
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या आत्या आहेत. त्यामुळे राणाजगजितसिंह पाटील हे त्यांच्या कुटुंबातीलच आहेत. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच राणाजगजीतसिंह पाटील कुटुंब बारामतीकडे रवाना झाले आहेत.

 

 

हे ही वाचा: बुधवार ठरला ‘घात’वार! अजित पवारांप्रमाणेच ‘या’ मुख्यमंत्र्यांचा झाला होता विमान अपघातात मृत्यू, 25 तासांनंतर सापडलेला मृतदेह

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी मागितला MIM ला पाठिंबा

विमानात अजित पवारांसोबत कोण कोण होतं?
एकूण प्रवासी 05

1. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार
2. मुंबई पीएसओ HC विदीप जाधव
3. पायलट कॅप्टन सुमित कपूर
4. कॅप्टन संभवी पाठक
5. पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट
विमानाने कधी केलेले उड्डाण?
मुंबई टेक ऑफ टाइमिंग सकाळी 08.10 वाजता
बारामती लँडिंग 08.50 वाजता

 

भीषण विमान अपघातानंतर विमान पूर्णतः जळून खाक झाले होते. स्फोटांमुळे अनेक मृतदेह विखुरलेल्या आणि ओळख न पटणाऱ्या अवस्थेत होते. अशा परिस्थितीत अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची ओळख पटवणे मोठे आव्हान ठरले होते.

कोट्याधीश भिकारी ,3 बंगल्यांचा मालक,कार आणि स्वतःसाठी ठेवलाय ड्रायव्हर

एका मृतदेहाची ओळख हातातील मनगटी घड्याळाच्या आधारे पटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे घड्याळ त्या व्यक्तीच्या वैयक्तिक ओळखीशी संबंधित असल्याने ते महत्त्वाचे पुरावे ठरले. घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि तपास पथकाने सखोल पाहणी करून ही ओळख निश्चित केली.

 

 

Related Articles