अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची सूत्रं कोणाच्या हाती? पक्षाला नवा चेहरा मिळणार?

After Ajit Pawar, who will take the reins of the NCP? Will the party get a new face?

 

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झालं आहे. बुधवारी सकाळी ही बातमी कळताच संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. पुणे जिल्ह्यात झालेल्या विमान अपघातात अजित पवार आणि इतर पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

 

पुण्यातील बारामती परिसरात अजित पवार यांचे विमान लँडींग होत असताना हा अपघात झाला. अजित पवार यांच्या अचानक निधनाने त्यांच्या शब्दांच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांचे एक स्वप्न होते, जे अपूर्ण राहिले. याचदरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांचा राज्यभरात दुखवटा जाहीर केला.

 

महायुतीत रुसवेफुगवे ;एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी
“संपूर्ण पवार कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढचे निर्णय घेतले जातील. महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी घोषित केली आहे. तीन दिवसांचा दुखवटा देखील जाहीर केला आहे.” हे कधीही भरून न निघाणारे नुकसान आहे. लोकनेते निघून गेल्यानंतर पोकळी निर्माण होते, ती भरून काढणे कठीण आहे. संघर्षाच्या काळात आम्ही एकत्र काम केलं आहे. या घटनेवर विश्वास ठेवण्यास मन तयार होत नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

धाराशिव जिल्ह्याचे जावई राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. मित्रचे उपाध्यक्ष भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे ते आतेमामा होत. त्यांच्या निधनाने व्यथित झालेल्या राणा पाटलांनी आपल्या समाजमाध्यमावर स्क्रीन काळी करून दुःख व्यक्त केले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी मागितला MIM ला पाठिंबा

अर्चना पाटील आणि मल्हार पाटील यांनीही स्क्रीन काळी करून दुःख व्यक्त केले आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी, ‘निशब्द: दादा.. माझे आतेमामा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन.. मनाला चटका लावून जाणारी धक्कादायक बातमी.. आशा भावना व्यक्त केल्या आहेत. धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या आहेत.

 

५ डिसेंबर २०२४ रोजी अजित पवार त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये ही भूमिका बजावली आहे. त्यांनी पहिल्यांदा २०१० मध्ये हे पद स्वीकारले. ते आठ वेळा बारामतीचे आमदार राहिले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी मागितला MIM ला पाठिंबा

२०१० मध्ये चव्हाण यांच्यानंतर ते २०१२ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये फडणवीस यांच्या अल्पायुषी सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवले. २०२२ मध्ये ते भाजप आणि शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले आणि उपमुख्यमंत्री झाले.

 

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. . बारामतीमध्ये लॅंडिंगदरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला असून यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या विमानाचा सकाळी 9 ते 9.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे.

मुंबईतील MIMचा पहिला हिंदू नगरसेवक,उमेदवारीसाठी डिपॉझिट भरायला पैसे उधार घेतले

अजित पवार यांच्यासह पाच जणांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली मृत्यूवर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले आहे. यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत राहुल गांधींनी लिहिले आहे की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आज विमान अपघातात निधन झाल्याची बातमी ऐकून खूप दुःख झाले आहे. या दुःखाच्या क्षणी मी महाराष्ट्राच्या जनतेसोबत आहे. या दुःखाच्या वेळी मी संपूर्ण पवार कुटुंब आणि प्रियजनांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो, अशा शोकभावना राहुल गांधींनी व्यक्त केल्या आहेत.

 

23 जानेवारीला सर्व शाळांना सुट्टी, नेमकं कारण काय?
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील अजित पवार यांच्या अकाली अपघाती निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. नितीन गडकरी यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जी यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक, दुर्दैवी आणि दुःखद आहे.

 

त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. गेली अनेक वर्षं राज्याच्या विधिमंडळात सोबत काम करताना अजितदादांशी अतिशय जवळचा संबंध राहिला आहे. त्यांचे प्रशासनिक कौशल्य, विकासात्मक दृष्टिकोन आणि लोकांना जोडण्याची हातोटी यांमुळे अजितदादांचे कायमच महाराष्ट्राच्या राजकारणात एक अढळ स्थान राहिले आहे.

 

महाराष्ट्राच्या विकासाची आकांक्षा असलेल्या या लोकनेत्याचे अकाली निधन होणे, ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची कधीही भरून न निघणारी हानी आहे. या दुःखद प्रसंगी संपूर्ण पवार कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो, असे नितीन गडकरी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

खळबळजनक घटना;नाशिक मध्ये 400 कोटी पळवले? पोलिसांना खबर नाही,

त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शोकभावना व्यक्त केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  अजित पवार आणि शिष्टमंडळातील इतर सदस्यांचे निधन अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे.

 

त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली. शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. मी भगवान श्री राम यांच्याकडे मृतांच्या आत्म्यांना शांती आणि शोकाकुल कुटुंबांना हे मोठे नुकसान सहन करण्याची शक्ती देण्याची प्रार्थना करतो, असे योगी आदित्यनाथ यांनी लिहिले आहे.

काँग्रेसच्या नगरसेवकांना भाजपकडून एक कोटींची ऑफर ?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी निधन झाले आहे. बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. लँडिंग दरम्यान विमान क्रॅश झाले आणि क्षणातच जमिवीवर कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की, विमानाचा चुराडा झाला.

 

या भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. पवार कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजकीय नेते, पवार कुटूंबीय, कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वजण बारामतीला रवाना झाले आहेत. अपघातस्थळी मोठी गर्दी झाली आहे.

कोणत्याही क्षणी उडू शकतो युद्धाचा भडका, जग भयंकर संकटात

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाचे नेतृत्व कोणाकडे जाणार आता अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. अजित पवार यांचा पक्ष शरद पवार यांच्या पक्षात विलीन होणार का की शिंदेंची शिवसेना आणि भाजप अजित पवार यांच्या पक्षाचे नेतृत्व स्विकारणार अशी चर्चा आता सर्वत्र सुरु आहे.

 

मात्र अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांचा पक्ष शरद पवारांच्या पक्षात विलीन होणार, असं विधान एका बड्या नेत्याने केलं आहे. अजित पवार यांचा झालेला अपघात आणि पक्ष एकत्र येणाचे विधान, यांचा संबंध तर नाही ना, अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

 

एका मेल वर 16 हजार कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

आगामी जिल्हा परिषद निवडणूकीची सर्वत्र तयारी सुरु आहे. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी एकत्र येत लढण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे आणि सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची युती झाली आहे.

 

यानंतर आता असा दावा देखील केला जात आहे की, निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिन होणार. असा दावा आमदार राजू खरे यांनी केला आहे. राजू खरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी सांगितलं होतं की, आगामी निवडणूकीसाठी पुणे आणि सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीनंतर शरद पवार यांचा पक्ष अजित पवार यांच्या पक्षात विलीन होणार आहे.

 

महायुतीत रुसवेफुगवे ;एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी
अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सुरु असतानाच अजित पवार यांचा आज अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाला आता नवीन चेहरा मिळणार का की अजित पवार यांचा पक्ष शरद पवार यांच्या पक्षात विलीन होणार, याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे नेतृत्व आता शरद पवारांच्या हाती जाणार का की अजित पवारांचे धाकटे पुत्र पार्थ पवार पक्षाचे नेतृत्व हाती घेणार, अशा चर्चांना आता उधान आले आहे.

 

 

Related Articles