अजित दादा चे विमान लियरजेट-45 मॉडलच्या विमानांबद्दल मोठा खुलासा
A major revelation about Ajit Dada's aircraft, the Learjet-45 model.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि रुबाबदार नेते अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले आहे. रोखठोक वक्तव्यासाठी ओळखले जाणारे अजित पवार हे बारामती दौऱ्यासाठी मुंबईहून रवाना झाले होते.
मात्र, विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच नियंत्रण सुटल्यामुळे शेतात कोसळले. प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार यांच्यासोबत असलेल्या विमानातील इतर चारही सदस्यांचा मृत्यू झाला आहे. आता या विमान अपघाताचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.
अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला तेव्हाचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. अपघात झालेल्या शेताजवळील एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे. सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी मोठा स्फोट झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
तसेच आजूबाजूच्या परिसरात मोठा आवाज आला. या घटनेची भीषण दृश्य आता समोर आली आहेत. जेट ज्यावेळी आकाशातून खाली आलं तेव्हा आकाशात काही वेळ घिरट्या घालत होते. त्यानंतर ते हळूहळू खाली येत गेलं.
एका बाजूने झुकलेलं हे विमान एका शेतात जाऊन कोसळलं. त्यानंतर मोठा स्फोट झाला. अपघात किती भीषण होता हे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. स्फोट होतच विमान खाली कोसळत असल्याचे चित्र व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर विमान जमीनीवर पडल्यानंतरही स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. आजूबाजूच्या लोकांना काही सेकंद लागली नेमकं काय झाले आहे हे काळायला.
उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते ते विमान VSR (व्हीएसआर) या खाजगी कंपनीच्या मालकीचे होते. लिअरजेट 45 (Learjet 45) हे या विमानाचे मॉडेल होते. ही विमाने प्रामुख्याने खाजगी प्रवासासाठी वापरली जातात. ते विमान अत्याधुनिक जेट स्वरुपातील होते. VT-SSK असा या विमानाचा नोंदणी क्रमांक होता. या विमानाचे कॅप्टन रोहित सिंग होते. या विमान कंपनीचे मालक व्ही. के. सिंग हे आहेत. या विमानात उपमुख्यमंत्र्यांसह एकूण पाच जण स्वार होते.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज विमान अपघातात निधन झालं. ते लियरजेट-45 मॉडलच्या चार्टर्ड विमानातून प्रवास करत होते. लँडिंगच्यावेळी अचानक विमानात बिघाड झाला.
अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची सूत्रं कोणाच्या हाती? पक्षाला नवा चेहरा मिळणार?
त्यानंतर विमान क्रॅश झालं. अपघाताशी संबंधित माहितीमध्ये हे सुद्धा समोर आलय की, लियरजेट-45 मॉडलच्या चार्टर्ड विमानांचे याआधीही अनेक अपघात झालेत. जगभरात या श्रेणीच्या विमानांचे जवळपास 200 अपघात झालेत. वर्ष 2023 मध्ये मुंबईतही लियरजेट-45 विमानाला अपघात झाला होता. पण त्यावेळी कोणाचा मृत्यू झाला नव्हता.
1960 साली बिझनेसमॅन विलियम पॉवेल लियर यांनी लियरजेट प्रकारच्या विमान निर्मितीची सुरुवात केली. हे विमान Bombardier Aerospace (कॅनडा) च्या अधीन आहे.
प्लेन क्रॅशपूर्वी अजित पवारांनी ‘या’ BJP नेत्याला केला होता शेवटचा फोन कॉल
या क्लासची विमानं नेते आणि बिझनेसमनच्या विशेष पसंतीची असतात. अपघाताची संख्या पाहून 2021 साली कंपनीने या प्लेनच प्रोडक्शन बंद केलं होतं. विमानांचा मेंटेनेंस आणि सर्विसच काम अजूनही सुरु आहे.
लियरजेट-45 श्रेणीतील चार्टर्ड विमानं जगभरात प्रसिद्ध आहेत. यात 6 ते 8 लोकांच्या बसण्याची क्षमता असते. लियरजेट 45 मॉडलचा टॉप स्पीड 860 किलोमीटर प्रतितास आहे. क्रूज स्पीडही इतकाच आहे. या विमानाची उड्डाणाची रेंज 1,900 ते 2,200 नॉटिकल मील म्हणजे जवळपास 3,500 ते 4,000 किलोमीटर आहे.
आज अजित पवारांच्या होत्या चार सभा
जमिनीवरुन उंचावर जाईपर्यंत विमानाच स्पीड खूप जास्त असतो. हे चार्टर्ड विमान फक्त 18 ते 20 मिनिटात 41 हजार फूट उंचीवर पोहोचू शकतं. विमानात वायफाय आणि सॅटलाइट फोनची सुविधा असते. हे विमान छोट्या रनवेवर लँडिंग आणि टेक ऑफसाठी परफेक्ट मानलं जातं.
या विमानात कॅनडाच्या Pratt & Whitney कंपनीने बनवलेलं ट्विन टर्बोफॅन इंजिन आहे. इंधनाच्या दृष्टीने हे विमान फायदेशीर मानलं जातं. विमानात डिजिटल फ्लाइट कंट्रोल, चांगल्या नेविगेशन सिस्टिममुळे सुरक्षेच्या दृष्टीने हे विमान चांगलं मानलं जातं.
हादरलेले कुटुंबीय,आता दादांच्या मृत्यूची बातमी साहेबांना कशी द्यायची
अजित पवार मुंबईहून बारामतीला चाललेले. त्यांच्या पक्षाच्या आज तिथे चार सभा होत्या. रिपोर्टनुसार लँडिंग आधी बारामती एअरपोर्टजवळ हे प्लेन क्रॅश झालं. अजित पवार यांच्या विमानाने दोनवेळा लँडिंगचा प्रयत्न केला. पण बारामती एअरपोर्टवर विमानाला लँडिंग करता आलं नाही. या दुर्घटनेत अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला.








