शरद पवारांचा पॉवर गेम; पत्रकार परिषदेतून अनेक संदेश

Sharad Pawar's power game; many messages conveyed through the press conference.

 

 

राष्ट्रवादीतील नवीन अंकाचा प्रयोग राजपटलावर रंगला. दुखावट्याटात काही भूमिका अपरिहार्यपणे घ्याव्या लागतात. पण त्यात मुरब्बीपणा, कसलेला नेताच दाखवू शकतो.

 

नाहीतर नाट्याचा पडदा उघडताना आतील गदारोळ आपोआप समोर येतो आणि मग या नाटकाचं नेपथ्य कोणी केलं, साग्रसंगीत कोण देतंय आणि पटकथा कुठं बसून लिहिल्या गेली हे समोर यायलं वेळ लागत नाही.

मराठवाड्यातील अजित पवार गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविकेचा अचानक मृत्यू

शरद पवार यांच्या हाती सध्या राजकीय घड्याळ नसलं तरी कोणती चाबी फिरवली की घड्याळातील काटे भराभर फिरतात हे त्यांना माहिती आहे.

 

आज सकाळीच शरद पवार यांनी ही चाबी फिरली आणि घड्याळीतील सर्वच काटे सैरभैर झाले. आजच्या राष्ट्रवादीच्या शपथविधीच्या अंकाचा पडदा जरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उघडला असला तरी दोरी कुणाच्या हाती आहे,

 

हे समोर आणण्यात शरद पवार हे यशस्वी झाले. थोरल्या साहेबांनी एकाच बार मध्ये टोळधाड आणि कणसावरील पक्षी आकाशात भिरकावल्याचे जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली. एकाच दगडात अनेक पक्षी गार करण्याची हतोटी थोरल्या साहेबांकडं पूर्वीच असल्याची चर्चा राजकीय चाणक्यांमध्ये रंगली आहे.

 

उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवारांचा शपथविधी संपन्न

शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. माध्यमांची नस शरद पवारांनाही माहिती आहे. त्यांनी प्रश्न येताच फटकारे मारले. त्याचे परिणाम पुढील तासात राज्यात दिसले.

 

धावपळ, गदारोळ आणि या सर्वच घडामोडींमागे कोण सूत्रधार आहे, याचे समतोल गणित शरद पवार यांनी मांडले. शरद पवार यांनी पडद्याआड घडलेल्या

 

गोष्टींची वाचत्या न करता राजकारणातील हा वेगळा टर्न लागोलाग राज्यासमोर आणला. सकाळच्या त्यांच्या मुलाखतीने अचूक टायमिंग साधलं

“या” जिल्ह्यात पुढील तीन दिवसांत पावसाचा

आणि परिपाक ,परिणामासह साधला. समाजमनात थेट संदेश गेला. राजकीय पटलावर संध्याकाळी घडामोडी घडल्या. पण जो संदेश दिल्या गेला. त्याचे दूरगामी परिणाम होतील हे सकाळच्या मुलाखतीने साध्य झालं.

 

शरद पवार यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत एकाच बाणात शंभर गार असा पॅटर्न राबवला. एकाच दगडात अनेक पक्षी टिपले. आज सुनेत्रा पवार या शपथ घेणार हे आपल्या गावी नसल्याचे सांगत त्यांनी खळबळ उडवली.

शपथविधीची इतकी घाई का? यामागं कुणाचं राजकीय हित?

तर या शपथविधीच्या प्रकरणात राजकीय पक्ष म्हणूनच नाही तर कुटुंब म्हणूनही आपला दुरान्वये संबंध नाही हा संदेश देण्यात पवार यशस्वी ठरले.

 

सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेतं त्यांनी पडद्यामागील सूत्रधाराचं नाव बाहेर आणलं नाही. पण वर्षावरील बैठकीनं लोकांचा अंदाज पक्का झाला. तर इतक्या घाईत शपथविधी का घेण्यात येत आहे यावर भाष्य न करता हा मुद्दा मात्र त्यांनी समोर आणला. त्यावरून दिवसभरात चर्चांना पेव फुटले.

महायुतीत रुसवेफुगवे ;एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी

तर राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणातही आपण सहभागी नव्हतो असे त्यांनी रेखाटले. दोन्ही बाजूच्या राष्ट्रवादीचे नेते सकारात्मक होते. त्यांच्या सुसंवाद तयार झाला होता.

 

अजित पवार हे विलीनि‍करणासाठी आग्रही होते. जयंत पाटील यांच्यासोबत दादांची बैठक झाली. 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची घोषणा होणार होती हा गौप्यस्फोट पवारांनी केला. तर त्याचवेळी सध्याचे राष्ट्रवादीतील नेते नेमकं त्याच्या उलट वागत असल्याचा मोठा संदेश यातून द्यायला ते विसरले नाहीत.

काँग्रेसच्या नगरसेवकांना भाजपकडून एक कोटींची ऑफर ?

तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजप हे सर्व घडवून आणत आहे का? यावर कुठलंही भाष्य न करता वा त्याविषयी एक चकार शब्द ही न बोलता तशा चर्चा मात्र आपोआप घडल्या

 

. शरद पवार यांनी या सर्वांमधून मोठा संदेश दिला आहे. तर राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाबाबत आता खंड पडल्याचे सांगत त्यांनी थेट संदेश दिला आहे.

 

महायुतीत रुसवेफुगवे ;एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या

 

कॅबिनेट बैठकीला दांडी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अचानक निधन झाल्यानंतर राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. राज्यात दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं. त्याबाबतच्या अनेक बैठका झाल्या होत्या.

 

अजित पवार यांना काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनातच काम करायचं होतं. पण अचानक झालेल्या निधनामुळे त्यांचं हे स्वप्न अर्धवट राहिलं आहे.

 

दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नसल्याचं अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं असलं तरी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या अंतिम बैठकीचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

 

हा अंतिम बैठकीचाच फोटो आहे की नाही याबाबत टीव्ही9 मराठी पुष्टी करत नाही. पण या फोटोने अख्खा सोशल मीडिया व्यापून घेतला आहे. त्यामुळे राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. या फोटोत नेमकं काय दिसत आहे?

 

 

सोशल मीडियात या कथित फोटोची चर्चा सुरू आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पक्षाच्या विलिनीकरणावर चर्चा सुरू असल्याच्या बैठकीचा हा फोटो असल्याचं सांगितलं जात आहे.

 

या फोटोत शरद पवार, अजित पवार, राजेश टोपे, जयंत पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासह शरद पवार गटाचे अन्य नेतेही दिसत आहेत. विशेष म्हणजे अजितदादा त्यांच्या पक्षाच्या वतीने एकटेच विलिनीकरणावर चर्चा करत होते. इतर नेते आपल्या शब्दावर तयार होतील, असं अजितदादांनी पवार गटाला सांगितल्याचं पुढं आलं आहे.

 

दरम्यान, या व्हायरल फोटोवर राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बारामतीच्या बैठकीतील हा फोटो आहे. ही अनौपचारिक भेट होती, असं राजेश टोपे म्हणाले. 17 जानेवारी रोजी बारामतीत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली होती.

 

त्यामुळे राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. ही काही औपचारिक राजकीय बैठक नव्हती. कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आम्ही बारामतीत होतो. त्यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांना नाश्त्यासाठी आमंत्रित केलं होतं. अजितदादा नाश्त्याला आले. त्यावेळी अनौपचारिक गप्पा झाल्या, असं राजेश टोपे म्हणाले.

 

 

या बैठकीला राजकीय रुप देणं योग्य नाही, असं टोपेंनी सांगितलं. तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची पार्टी एकत्र येण्याची इच्छा आहे. ती भावना अजितदादांनी शरद पवार यांना बोलून दाखवली होती, असंही त्यांनी सांगितलं. तसेच दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद ठेवण्याचा प्रयत्न करण्याची विनंतीही त्यांनी केली.

 

अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक राजकीय समीकरणं बिघडली आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या. आता त्याचं काय होणार? असा सवाल केला जात आहे. त्याबाबत अजून काही चित्र स्पष्ट झालेलं नाही. अजितदादा गटाने सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यावर पहिलं प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे बाकीच्या गोष्टी मागे पडलेल्या दिसत आहेत.

 

 

Related Articles