सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या काही मिनिटे आधी सुप्रिया सुळे यांचे मोठे वक्तव्य

Just minutes before Sunetra Pawar took the oath of office as Deputy Chief Minister, Supriya Sule made a major statement.

 

 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या 3 दिवसांत सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवारांचा शपथविधी संपन्न

शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री होण्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणावर मौन सोडले आहे. यानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपत घेण्याच्या काही मिनिटे आधी सुप्रिया सुळे यांचे मोठे वक्तव्य केले आहे.

शपथविधीची इतकी घाई का? यामागं कुणाचं राजकीय हित?

एकीकडे मुंबईत सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची लगबग सुरु असताना दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळेंनी काटेवाडीमध्ये अजित पवारांच्या आईंची भेट घेतली.

 

शरद पवारांच्या कुटुंबानं सुनेत्रा पवारांच्या शपथविधीकडे पाठ फिरवली. शरद पवार बारामतीतच थांबले तर सुप्रिया सुळेंनी त्यांच्या काकी आणि अजित पवारांच्या आईंची भेट घेऊन त्या पुण्याला रवाना झाल्या. पुण्याहून त्या दिल्लीला अधिवेशनासाठी जाणार आहेत.

शपथविधीची इतकी घाई का? यामागं कुणाचं राजकीय हित?

यावेळी सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. तुम्हाला सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचे निमंत्रण मिळाले का? असा प्रश्न विचारला. यावर त्या म्हणाल्या कसले निमंत्रण? सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत

 

याबाबत विचारले असता त्या स्पष्टपणे म्हणाल्या मला याबाबत काहीच माहिती नाही. यामुळे शरद पवार यांच्याप्रमाणे सुप्रिया सुळे देखील याबाबत काहीच माहित नसल्याचे सांगितले. याबद्दल काहीच माहित नाही असं मोठ वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

शरद पवारांचा पॉवर गेम; पत्रकार परिषदेतून अनेक संदेश

अजित पवार यांचं अकाली निधन झाल्यानंतर आशाताई काहिशा खचून गेल्याचं कळतंय. म्हणूनच मी आज वेळात वेळ काढून आशाकाकींंना भेटायला आलेले. बाकी काही नाही.

 

राहिला प्रश्न पार्थचा तर तो गोविंद बागेत त्याच्या आजी आजोबांना भेटायला आला होता. असा दावाही सुप्रियाताईंनी केला. तसेच मला बजेट सेशनसाठी दिल्लीला जायचं आहे. बाकी शपथविधीबाबत मला काहीही माहिती नाही, असं ञोटक उत्तर देऊन सुप्रिया सुळे लगेच पुणे मार्गे दिल्लीसाठी रवानाही झाल्यात.

दिल्लीला येणाऱ्या विमानाला बॉम्बची धमकी, आपत्कालीन लँडिंग

मुंबईत पक्षाशी संबंधित निर्णय घेतले जात आहेत. सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री होण्याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हती कारण कोणीही त्यांच्याशी सल्लामसलत केली नव्हती.

 

पक्ष विलीनीकरणाबाबत चर्चा लक्षणीयरीत्या पुढे गेल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार यांनी दोन्ही पक्ष एकत्र यावे अशीही इच्छा व्यक्त केली. आता त्यांना ती इच्छा पूर्ण करायची आहे.

काँग्रेसच्या नगरसेवकांना भाजपकडून एक कोटींची ऑफर ?

विलीनीकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएचा भाग राहील का असे विचारले असता ते म्हणाले की, तुमच्या बाजूने मीडियामध्ये हे सर्व पसरवले जात आहे; असे काहीही घडत नाही.

 

अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची सूत्रं कोणाच्या हाती? पक्षाला नवा चेहरा मिळणार?

Related Articles