दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये यासाठी खरंच कट शिजवला गेला?
Was a conspiracy truly hatched to prevent the two nationalist parties from coming together?

महाराष्ट्रातील एक खंबीर नेतृत्त्वं अशी ओळख असणाऱ्या अजित पवार यांचा नुकताच एका भीषण विमान अपघातात मृत्यू ओढावला. या नेत्याच्या निधनानंतर राज्यात एकीकडे शोककळा असतानाच दुसरीकडे राजकीय घडामोडीनाही वेग आल्याचं पाहायला मिळालं.
त्यातच अजित पवारांच्या विमानाची दुर्घटना हा अपघात नसून तो घातपात असल्याचं म्हणत काही नेत्यांनी महत्त्वाचे प्रश्नही उपस्थित केले आहेत. शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊतही त्यापैकी एक. मात्र त्यांच्या वक्तव्याला आपल्याला फारसं महत्त्वं द्यायचं नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह कऱ्हाड दौऱ्यावर असताना प्रितीसंगमापाशी पोहोचला असता उपमुख्यमंत्री नव्हे तर तटकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.
दादांच्या अस्तित्वात राष्ट्रवादीनं निर्धारपूर्वक एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावर राज्यातील 13 कोटी जनतेनं विधानसभा निवडणुकीत शिक्कामोर्तब केलं असं म्हणत एनडीएसोबत जाण्याची आमची भूमिका अधोरेखित आहे ही बाब त्यांनी प्रकाशात आणली.
शरद पवारांनीही विलीनीकरणाच्या चर्चांवर वक्तव्य केलं, मात्र AP पक्षाकडून कोणतंही वक्तव्य नाही. नेमक्या कोणत्या चर्चा सुरू होत्या? असा प्रश्न विचारला असता अतिशय शिताफीनं शरद पावारांच्या वक्तव्यांवर आपण अजिबात बोलत नसून, इतर सहकाऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहता त्या त्यांनी बारामतीमध्ये अंत्यसंस्काराआधीच सुरू केली. विलीनीकरण कोणत्या पक्षाचं कोणत्या पक्षात? असा प्रतिप्रश्न तटकरेंनी केला.
एकत्र येऊ नये यासाठी कट शिजवला गेला का? या वडेट्टीवारांच्या प्रश्नाचं उत्तर देत त्यांना पहिलं काँग्रेसअंतर्गत पळवापळवी करणाऱ्या वडेट्टीवारांना आमच्या पक्षाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही असं तटकरे म्हणाले.
राष्ट्रवादीच्या 7 नगरसेवकांवर जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्रतेची कारवाई
त्यांनी त्यांचा चंद्रपुरात महापौर कोणत्या गटाचा होतोय याची आधी काळजी घ्यावी. आम्ही राष्ट्रवादी म्हणून राज्यात निवडणुका लढवल्या. राष्ट्रवादी विधीमंडळ काँग्रेस पक्ष भक्कम असून दादांचे विचार आणि सिद्धांतांवर वाटचाल करणारा आहे. स्वाभाविकपणे नेतानिवडीचा अधिकार हा राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या सदस्यांचा आहे, असं स्पष्टपणे सांगितलं.
‘मी वारंवार सांगतोय की आम्ही एनडीएत आहोत म्हणजेच भाजप आणि त्याचे मित्रपक्ष. युपीए म्हणजे काय, तर काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष. आज आम्ही एनडीए म्हणजे भाजपसोबत महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी आम्ही सत्तेत आहोत. हीच भूमिका आम्ही दादांच्या नेतृत्त्वाअंतर्गत सामूहिकरित्या घेतली.
महायुतीत रुसवेफुगवे ;एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी
या विचारांशी सुसंगत म्हणजे भाजपप्रणित एनडीएमध्ये येण्याची भूमिका ही ज्यांना सोबत यायचं आहे त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे’, असं तटकरेंनी स्पष्ट केलं.
जयंत पाटील आणि देशमुखांपर्यंत अनेकांनीच 10 ते 12 दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर एकत्रीकरणासंदर्भातील गोष्टींबाबत आम्ही वक्तव्य करू असं म्हटलेलं असताना ते बोलण्याचा त्यांचा तो अधिकार असस्याचं स्पष्ट करत, मी प्रदेशाध्यक्ष
रात्री गाडीने जाऊ; ड्रायव्हरने अजितदादांना दिला होता सल्ला
आणि गेली 40 वर्षे दादांचा सहकारी आणि राज्यात माझी ओळख असल्याचं पाहता नेमकं काय आहे ते बोलल्यानंतर आम्हीही त्या विषयावर बोलू. आता बोलण्याची घाई नाही असं म्हणत विषयाला वेगळं वळण दिलं.
राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण करताना तिथं पार्थ पवार यांची अनुपस्थिती होती. असं का? या प्रश्नाचं उत्तर देताना, पार्थ पवार हे अजित पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव असून,
मुख्यमंत्री योगींना 40 दिवसांचे ओपन चॅलेंज …अन्यथा तुम्हाला बनावट हिंदू, पाखंडी आणि ढोंगी
बारामतीमध्ये अनेक व्यक्ती आपल्या संवेदना व्यक्त करण्यासाठी तिथं त्यांच्या भेटीस येत होते. त्या सांत्वनपर भेटी घेतल्यानंतर ते मुंबईत आल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं.
‘मी वारंवार, गेले 6 महिने अगदी दादा असतानाच म्हणत आलो की एनडीएमध्ये आम्ही असून, या निर्णयाशी ज्यांची अनुकूलता असेल त्यांनी त्यासंदर्भातील निर्णय घ्यायचा आहे.
शरद पवारांचा पॉवर गेम; पत्रकार परिषदेतून अनेक संदेश
त्यानंतर मग त्याबाबतची स्पष्टक्ती येईल. राहिला मुद्दा प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना खलनायकी दृष्टीकोनातून पाहिलं जाण्याचा तर, त्यावर तटकरे म्हणाले ‘भाजप हा देशातील प्रमुख पक्ष असून राष्ट्रवादी हा मित्रपक्ष म्हणून त्यांच्यासोबत गेला आहे.
आमच्या पक्षात आम्ही काय निर्णय घ्यावेत हे भाजपनं कधी सांगितलं नाही. राष्ट्रवादी पक्ष हा शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा पक्ष असून आमचे निर्णय आम्ही घेणार.
अमेरिका इराणवर हल्ला करण्याची शक्यता, भारतावरही महासंकट
यामुळं भाजपनं स्पष्टपणाची भूमिका घेत राष्ट्रवावादीचा जो निर्णय असेल तो अंमल करण्यासाठी भाजपनं तयारी दाखवली’, अशी भूमिका मांडत आपणही दादांसोबत राहून पक्षाची भूमिका राज्यात पोहोचवण्यासाठी काम केलं आहे
असं सांगचाना 2014 ते 2018 मध्ये ‘राष्ट्रवादीची धुरा मी शरद पवार साहेब आणि दादांच्या सांगण्यावरून पार पाडली होती’, तटकरेंनी लक्षात आणून दिलं.
शरद पवारांचा पॉवर गेम; पत्रकार परिषदेतून अनेक संदेश
भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल आणि विमान अपघाताच्या प्रकरणावरून राऊतांच्या आरोपांवरून प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणाच्या सथोल तपासाचे आदेश दिले.
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडेही त्याबाबतची चौकशी केली असून, ब्लॅक बॉक्स सापडला आहे त्यामुळं सत्य बाहेर येऊन ते जनतेपर्यंत जावं हीच पक्षाचीही भूमिका आहे असं तटकरे म्हणाले.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या काही मिनिटे आधी सुप्रिया सुळे यांचे मोठे वक्तव्य









