मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन…;

President's rule in Manipur...;

 

 

मणीपुरमध्ये गेले अनेक महीने हिंसाचार सुरू होता. आता काही प्रमाणात त्या ठिकाणी स्थिती शांत झाली आहे. गेल्या वर्षभरापासून मणीपुरमध्ये राष्ट्रपती शासन लागू आहे.

राष्ट्रवादीच्या 7 नगरसेवकांवर जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्रतेची कारवाई

मात्र आता लवकरच तेथील राष्ट्रपती राजवट संपणार आहे. मणीपुरमध्ये लवकर लोकतांत्रिक सरकार स्थापन होणार आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. तरुण चुग यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

 

भाजपने मणीपुरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तरुण चुग यांची राष्ट्रीय निरीक्षक म्हणून भाजपने नियुक्ती केली आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये यासाठी खरंच कट शिजवला गेला?

ज्यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळ पक्षनेत्याची निवड केली जाणार आहे. एनडीएचे मणीपुरमधील आमदार दिल्लीत दाखल झाले आहेत. उद्या एक महत्वाची बैठक पर पडणार असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नावे निश्चित होण्याची शक्यता आहे.

 

भाजप प्रदेशाध्यक्ष ए. शारदा देवी या देखील दिल्लीत दाखल झाल्या आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह, वाय खेमचंद सिंह ही महत्वाचे नेते देखील दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे एकंदरीतच मणीपुरमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली वेगाने सुरू झाल्याचे दिसून येत आहेत.

 

एका मेल वर 16 हजार कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

गेल्या वर्षी मेईतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक हिंसाचारानंतर मणीपुरमध्ये राजकीय स्थिरता निर्माण करणे हे एक मोठे आव्हान आहे. भाजप याकडे गांभीर्याने पाहत असल्याचे समजते आहे.

 

दोन्ही समुदायांना नेतृत्व मिळावे यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही पदे विभागून दिली जाऊ शकतात. 13 फेब्रुवारी 2025 मध्ये मणीपुरमध्ये राष्ट्रपती शासन लागू झाले आहे.

आज अजित पवारांच्या होत्या चार सभा

नंतर ती 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. पुढील आठवड्यात हा कालावधी संपणार आहे. राज्यात सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने परिस्थिती अनुकूल आहे का याचा देखील विचार केला जात आहे. यासाठी केंद्रीय नेतृत्वाने तेथील पक्षासोबत चर्चा देखील केल्याचे समोर आले आहे.

 

मणीपुरमधील जातीय समीकरणे, भौगोलिक स्थिती जाणून घेऊन मणीपुरमध्ये सरकार स्थापन करण्याबाबत विचार करावा लागणार आहे. सत्ता स्थापन केल्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि दोन्ही समुदायामधील अविश्वास भरून काढणे असे आव्हान असणार आहे.

BRAKING NEWS;विमान दुर्घटना टळली! माजी उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले

मणीपुरमध्ये भाजपला सर्वसमावेशक सरकार स्थापन करता आली तर, ईशान्य भारतात संकटमोचक ही ओळख भाजपला अधिक मजबूत करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे उद्या राजधानी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत कोणता निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Image

Related Articles