मोठा दावा:अजित पवार यांचा अपघात जाणीवपूर्वक घडवून आणला?
Big claim: Was Ajit Pawar's accident deliberately caused?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर धक्कादायक खुलासे केली जात आहेत. अजित पवार 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला.
अजित दादांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांचा सरकारला गंभीर इशारा
सुरूवातीला सांगितले गेले की, या विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाले. मात्र, त्यानंतर काही वेळाच त्यांच्या निधनाची बातमी आली. अजित पवार यांच्यासह विमानातील 5 जणांचा या अपघातात मृत्यू झाला.
मात्र, या प्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आमदार रोहित पवार आक्रमक भूमिका मांडत असून त्यांनी गंभीर आरोप केले.
राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी संशय व्यक्त केला. अजित पवार ज्या विमानाने बारामतीकडे निघाले होते, त्या विमानाचे दोन पायलट अगोदरच ठरले होते. मात्र, ऐनवेळी पायलटमध्ये मोठा बदल करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
अजित पवार यांच्या 28 जानेवारीच्या विमानासाठी पायलट साहिल मदन आणि यश हे दोघे नियुक्त होते. पण अचानक त्यांच्याऐवजी सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांना अचानक नियुक्त करण्यात आले.
राज्यसभेसाठी भाजपकडू रामदास आठवलेंचं नाव निश्चित?ऐनवेळी दोन नवीन नावं
यामुळे संशय अधिक वाढल्याचे बघायला मिळतंय. त्यामध्येच आता अमोल मिटकरी यांनी खळबळजनक दावा केला. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली. डीजीसीएने जाणीवपूर्वक अजित पवार यांचा घात घडवून आणला का? असाही प्रश्न त्यांनी केला.
अमोल मिटकरी यांनी म्हटले की, डीजीसीए या प्रकरणात कलपणा करत आहे. जवळपास एक महिन्यानंतर अहवाल दिला. अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता तीन आठवडे होऊन गेली आहेत आणि अजूनही ब्लॅक बॉक्स सापडला नाही.
रोहित पवार आक्रमक;पोहोचले थेट ठाण्यात पण पोलिसांचा FIR दाखल करण्यास नकार
डीजीसीएने अजूनही पायलट सुमित कपूर यांच्याबद्दल एकही विधान केले नाही. डिजीसीएच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल व्हायला हवा.
पुढे बोलताना अमोल मिटकरी यांनी म्हटले की, सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर म्हणून ठेवल्याची शंका आहे. यावर डीजीसीएने उत्तर देणे अपेक्षित आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी तिघे उत्सुक
नाही तर सांगतोय महाराष्ट्र यांना जिवंतच ठेवणार नाही. मुळात म्हणजे डीजीसीएच्या परवानगीशिवाय विमान वाहतूक करता येत नाही मग त्रुटी असलेले विमान का दिले असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले. पुढे त्यांनी म्हटले. पायलट साहिल मदन आणि यश हे दोघेही कुठे आहेत ?








