राजीनाम्याबाबत माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मोठे वक्तव्य

Former Vice President Jagdeep Dhankhar's big statement regarding resignation

 

 

मागील वर्षी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे जोरदार चर्चेत आले होते. अधिवेशन सुरु होताच दुसऱ्याच दिवशी धनखड यांनी अचानकपणे राजीनामा दिला होता.

राज्यसभेसाठी भाजपकडू रामदास आठवलेंचं नाव निश्चित?ऐनवेळी दोन नवीन नावं

उपराष्ट्रपतींनी तडकाफडकी दिलेल्या या राजीनाम्यावरुन राजकीय रान उठले होते. या विरोधकांनी संशय देखील व्यक्त केला होता. आता पुन्हा एकदा धनखड यांचा राजीनामा हा चर्चेत आला आहे,

 

राजस्थानमध्ये याबाबत त्यांनी वक्तव्य केले असून मी आजारी नव्हतो अशी कबुली जगदीप धनखड यांनी दिली आहे.

 

गेल्या वर्षी जुलैमध्ये जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे जोरदार चर्चा रंगल्या होत्या. धनखड यांनी आजारपणाचे कारण देत हा राजीनामा दिला होता.याबाबत माजी उपराष्ट्रपती धनखड यांनी एक मोठे विधान केले आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी तिघे उत्सुक

गुरुवारी राजस्थानमधील चुरू येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मागील वर्षी राजीनामा प्रकृती अस्वास्थ्यामुळे नव्हता, तर त्यांनी त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे धनखड यांनी स्पष्ट केले आहे.

 

चुरू येथे एका छोट्या मेळाव्याला संबोधित करताना जगदीप धनखड म्हणाले, “असे म्हटले जाते की पहिले सुख म्हणजे निरोगी शरीर. मी कधीही माझ्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले नाही.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी तिघे उत्सुक

जेव्हा मी राजीनामा देत असल्याचे म्हटले तेव्हा मी कधीही असे म्हटले नाही की मी आजारी आहे. मी आरोग्याला प्राधान्य दिले आहे आणि ते असले पाहिजे.”असे वक्तव्य माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.

 

२१ जुलै २०२५ रोजी राष्ट्रपतींना सादर केलेल्या राजीनामा पत्रात धनखड यांनी लिहिले आहे की ते “आरोग्य सेवेला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी”

 

आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत असे राजीनाम्याचे कारण सांगितले होते. मात्र या कारणावरुन देखील मोठी राजकीय चर्चा रंगली होती.

राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट टळले, आता उकाडा वाढणार

तसेच राजीनाम्यानंतर धनखड यांनी माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले. तसेच सार्वजनिक जीवनातून देखील ब्रेक घेतला होता. त्यांचे हे मौन चर्चेस कारण बनले.

 

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धनखड यांच्या अचानक राजीनाम्याबद्दल आणि त्यानंतरच्या मौनाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी राहुल गांधी म्हणाले,

रोहित पवारांचा ‘चार’ नेत्यांना दम ,म्हणाले ‘सुनेत्रा काकींसोबत वागताना सांभाळून’

“त्यांनी राजीनामा का दिला यामागे एक मोठी कहाणी आहे. तुमच्यापैकी काहींना ते माहित असेल, काहींना ते माहित नसेल. पण त्यामागे निश्चितच एक कहाणी आहे. आणि मग ते का लपून बसले आहेत याची कहाणी आहे.

 

भारताचे उपराष्ट्रपती अशा स्थितीत का आहेत की ते एक शब्दही बोलू शकत नाहीत… आणि त्यांना लपून बसावे लागते… अचानक, राज्यसभेत इतका आवाज करणारा माणूस पूर्णपणे गप्प झाला आहे.” अशी टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली होती.

लाडक्या बहिणींवर मोठं संकट?

 

Related Articles