इराणचा इस्राईल,अमेरिकन तळांवर चौफेर हल्ला
Iran launches all-out attack on Israeli, American bases

मध्यपूर्वेतील तणावाने आता रौद्र रुप धार केले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराणचे रिव्होल्यूशनरी गार्ड्स आक्रमक झाले आहेत.
इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स या वाढत्या तणावादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाला लक्ष्य केले आहे. परंतु अद्याप इस्रायलकडून याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डस्न एक निवदेन जारी केले आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे की, इराणच्या सैन्याने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मुख्यालयावर थेट हल्ला केला आहे.
याशिवाय इस्रायलच्या हवाई दलावरही हल्ला करण्यात आला असल्याचे IRGC ने म्हटले आहे. IRGC ने ही कारवाई ऑपरेशन ट्रुथ प्रॉमिस ४ अतंर्गत केली आहे. याअंतर्गत क्षेपणास्त्रांनी थेट नेतन्याहूंच्या कार्यलयाला आणि हवाई दलाच्या कमांडरच्या रहिवासी ठिकाणीवर केला आहे. नेतन्याहू यांना इराणने गुन्हेगार पंतप्रधान म्हणून संबोधले आहे.
सध्या इराणच्या पंतप्रधान नेतन्याहू यांच्या कार्यालयावरी हल्ल्याबाबात इस्रायलकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलील नाही. मात्र इराणच्या या दाव्यामुळे मध्यपूर्वेत प्रादेशिक आणि लष्करी तणाव वाढण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या काही अधिकाऱ्यांनी हा दावा पूर्णपणे नाकरला आहे.
या हल्ल्याच्या काही तास आधीच इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने सीक्रेट बंकरचा एक खळबळजनक व्हिडिओ जारी केला होता. या व्हिडिओमध्ये यामध्ये शेकडो ड्रोन्स, मिसाईल्स, आणि अत्याधुनिक रॉकेट लॉन्चर्स यांचा मोठा साठा आहे.
तसेच हे अंडग्राउंड बंकर डोंगर पोखरुन तयार करण्यात आलेले आहे. मीलोलंब बोगद्यांमध्ये हजारो अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा साठा आहे. तज्ज्ञांच्या मते, इराणने हा व्हिडिओ जारी करुन इस्रायल-अमेरिकेला थेट खुले युद्धाचे आव्हानं दिले आहे.
अयातुल्ला अली खामेनी आणि 40 उच्चपदस्थ इराणी अधिकाऱ्यांच्या हत्येनंतर इराण आखातातील अमेरिकेच्या मालमत्तेवर चौफेर हल्ले करत आहे. या हल्ल्यांमध्ये बहरीनमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
इराक आणि कुवेतमध्ये इराणी हल्ल्यांचे प्रमाण जास्त असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व उद्दिष्टे साध्य होईपर्यंत इराणवरील हल्ले सुरूच राहतील
रोहित पवारांचा ‘चार’ नेत्यांना दम ,म्हणाले ‘सुनेत्रा काकींसोबत वागताना सांभाळून’
आणि तीन अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, इराणचे नेतृत्व संपवूनही इराण इतका प्रतिसाद कसा देत आहे यामुळे ट्रम्प प्रशासन आणि पेंटागॉन चिंतेत असल्याचे वॉशिंग्टन पोस्टने सुत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.
इराणमध्ये सध्या क्षेपणास्त्रे डागण्याचे आदेश नेमके कोण देत आहे आणि या शस्त्रास्त्रांवर नक्की कोणाचे नियंत्रण आहे, याबद्दल अमेरिकन लष्करी अधिकारी चिंतेत आहेत. इराणसोबतचा संघर्ष हाताबाहेर जात असल्याची भीती पेंटागॉन आणि ट्रम्प प्रशासनातील सदस्यांना वाटत आहे.
आठ महिन्यांपूर्वी 12 दिवसांच्या युद्धात, इराणला सावरण्यासाठी 12 तास लागले होते. त्यावेळी त्यांच्यावर अचानक हल्ला झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला होता.
IAS अधिकाऱ्यावर थेट निलंबनाची कारवाई
त्या घटनेनंतर इराणच्या नेतृत्वाने आगामी युद्धाची पूर्ण तयारी करून ठेवली होती. कोणाला, कधी आणि काय करायचे आहे याचे आदेश आधीच देऊन ठेवले होते. यावेळी इराणच्या नेत्यावर हल्ला झाल्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी इराणला फक्त 2 तास लागले.
इराणने आपली लष्करी रचना अशा प्रकारे केली आहे की, त्यांचे वेगवेगळे गट वरिष्ठांच्या आदेशाची वाट न पाहता स्वतःहून काम करू शकतात. यामुळे मुख्य नेत्याची हत्या झाली तरी त्यांच्या युद्ध करण्याच्या क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही.
त्यामुळे अमेरिकेला क्षेपणास्त्रे नेमकी कोणाकडून डागली जात आहेत, याचा अंदाज आलेला नाही. कारण इराणचे लष्करी गट आता कोणा एका नेत्यावर अवलंबून नसून स्वतंत्रपणे काम करत आहेत.
अजित दादांच्या अपघातावर आमदार अमोल मिटकरींचे खळबळजनक वक्तव्य
दुसरीकडे, इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांनी अमेरिकेशी अणु चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी नवीन प्रयत्न केल्याचे अमेरिकन माध्यमांचे दावे फेटाळून लावले आहेत. इस्रायलने “तेहरानच्या हृदयावर” हल्ला करत असल्याचे म्हटलं आहे.
हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलवर रॉकेटचा मारा केल्यानंतर लेबनॉनवर हल्ले चढवले आहेत. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की इस्रायली हल्ल्यात 30 हून अधिक लोक ठार झाले आहेत.
इस्रायलचा इराणवर क्षेपणास्त्र महाप्रहार
इस्रायली हल्ल्यांमध्ये तेहरानच्या निलूफर चौकात किमान 20 लोक ठार झाले आहेत आणि गांधी रुग्णालय आणि पोलिस इमारतीचे नुकसान झाले आहे,
असे इराणी राज्य माध्यमांचे म्हणणे आहे. इस्रायलवर इस्रायली हल्ल्यांमध्ये तेल अवीव आणि जेरुसलेम शहरे आणि मध्यवर्ती शहरात किमान नऊ लोक ठार झाले आहेत.
इराणने कापली जगाची ‘लाईफलाईन’!
दुसरीकडे, इराणने इस्रायलसह चार मध्यपूर्वेतील देशांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. यापूर्वी, त्यांनी कतार, कुवेत, जॉर्डन, बहरीन, सौदी अरेबिया आणि युएईमधील अमेरिकन तळांना लक्ष्य केले होते. युएईच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दुबईमधील पाम हॉटेल अँड रिसॉर्ट आणि बुर्ज खलिफाजवळ ड्रोन हल्ले करण्यात आले.
इस्रायल आणि अमेरिकेने इराकची राजधानी बगदादमध्ये क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, क्षेपणास्त्रांनी जुर्फ अल-सखार परिसरातील इराण समर्थक दहशतवादी गट हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य केले.
उमराह साठी सौदी अरेबियाला गेलेले 50 हजार महाराष्ट्रातील मुस्लिम बांधव युद्धामुळे अडकले
या हल्ल्यात अनेक इमारती, वाहने आणि गोदामांचे मोठे नुकसान झाले आणि आग लागली. तथापि, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
मध्यपूर्वेत वाढत्या तणावामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांना धोका वाढला आहे. जागतिक तेल पुरवठ्यासाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या ओमानजवळ “स्काय लाईट” नावाच्या तेल टँकरवर हल्ला करण्यात आला. वाढत्या धोक्यामुळे, जर्मन शिपिंग कंपनी हापॅग-लॉयडने या मार्गावरून आपल्या जहाजांची वाहतूक थांबवली आहे.
युद्धामुळे कोणत्या वस्तू महागणार?







