मोठ्या नेत्याचा दावा:अजित पवार यांचा 100 टक्के घातपातच

Big leader claims: Ajit Pawar's 100 percent assassination

 

 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाची भीषण अपघात झाला. विमानातील एकही व्यक्ती या अपघातात जिवंत राहू शकली नाही.

टीईटी नापास गुरुजींना मोठा झटका!

28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. सकाळी 8 वाजून 45 मिनिटाला अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला.

 

या विमान अपघाताचे काही व्हिडीओ देखील पुढे ज्यामध्ये अजित पवार यांचे विमान एका बाजूला झुकताना स्पष्टपणे दिसत होते. रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक मोठी संशय व्यक्त करण्यात आली.

BREAKING NEWS: फुटबॉल खेळताना खासदाराचे निधन:VIDEO

रोहित पवार यांनी थेट एफआयआर दाखल करण्यासाठी प्रयत्न केली पण एफआयआर दाखल होऊ शकली नाही. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर चाैथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

 

सुनेत्रा पवार यांनी फक्त उपमुख्यमंत्रिपदाची शपथच नाही तर पक्षाची धुराही आपल्या हाती घेतली. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर एका महिन्याने आता या अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे.

BREAKING NEWS: फुटबॉल खेळताना खासदाराचे निधन:VIDEO

अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा याबाबत माहिती देण्यात आली आहे. 22 पानांच्या या अहवालातून धक्कादायक माहितीही समोर आली आहे. विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी ते एका झाडावर कोसळले असल्याचे अहवालात स्पष्ट सांगण्यात आले.

 

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले. हेच नाही तर अजित पवार यांचा 100 टक्के घातपात करण्यात आल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.

शिवशाही एसी बस बंद होणार

विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, या अहवालात सांगितले की, विमान एका झाडाला धडकले आणि खाली कोसळले. अशी तकलादू थेरी देत असतील तर स्पष्ट होते की, अजित पवार यांचा अपघात नाही तर 100 टक्के घातपात आहे.

 

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक संशय व्यक्त केली जात असतानाच काल अहवाल पुढे आला. अजित पवार यांच्या विमान अपघाताची काही कारणे स्पष्टपणे देण्यात आली. यासोबतच अहवालात सर्वात महत्वाचे स्पष्ट करण्यात आले की, पायलटची शेवटी शब्द नक्की काय होती.

IAS अधिकाऱ्यावर थेट निलंबनाची कारवाई

 

दरम्यान 22 पानांच्या या अहवालातून धक्कादायक माहितीही समोर आली आहे. विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी ते एका झाडावर कोसळले आणि त्यानंतर ते जमिनीवर आदळले असं या अहवालात सांगण्यात आलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

 

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) यांच्याकडून सुरू आहे. या संस्थेने आपला प्राथमिक अहवाल जारी केला आहे.

 

यात हा अपघात एकाच कारणामुळे नव्हे, तर हवामान + पायाभूत सुविधा + ऑपरेशनल निर्णय यांच्या संयोगामुळे घडल्याची शक्यता आहे अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच अपघाताची अंतिम कारणे CVR/FDR सविस्तर विश्लेषणानंतर स्पष्ट होतील अशीही माहिती देण्यात आली आहे.

 

बारामती येथे स्वतंत्र MET (हवामान) सुविधा नाही. विमानतळाच्या टॉवरने दृश्यमानता 3000 मीटर सांगितली होती. परंतु VFR ऑपरेशन्ससाठी किमान 5000 मीटर आवश्यक असते. मात्र विमान अपघातावेळी केवळ 2000 मीटर इतकी दृश्यमानता होती. त्यामुळे या विमान अपघातासाठी हवामान व दृश्यमानता मोठ्या प्रमाणात जबाबदार असण्याची शक्यता आहे असं अहवालातून समोर आलं आहे.

 

VFR मर्यादेपेक्षा कमी दृश्यमानतेत लँडिंगचा प्रयत्न हा मोठा जोखीम घटक ठरतो. VIP/चार्टर जेटसाठी आवश्यक असलेली मूलभूत सुरक्षा व नेव्हिगेशन उपकरणे अपुरी होती. कमी दृश्यमानता + दृश्य भ्रम + टेबलटॉप धावपट्टी यांच्या एकत्रित कारणामुळेही हा अपघात झाल्याची शक्यता आहे.

 

तसेच अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आत्तापर्यंत तांत्रिक बिघाडाचा थेट पुरावा समोर आलेला नाही, त्यामुळे आता CVR/FDR विश्लेषण निर्णायक ठरणार आहे.

 

अपघाताची संभाव्य कारणे
VFR minima पेक्षा कमी दृश्यमानता.
अनकंट्रोल्ड एअरफिल्डची अपुरी पायाभूत सुविधा.
टेबल-टॉप रनवे + फिकट मार्किंग.
मानवी घटक/दृश्य भ्रम
MET माहितीची मर्यादित अचूकता.

 

 

Related Articles