शरद पवार गटाचा नेता म्हणाला अजित पवाराकडील आमदारापैकी ‘अनेकांच्या ‘फाईल’ तयार’

Sharad Pawar group leader said 'files' of many of Ajit Pawar's MLAs are ready'

 

 

 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांच्या आणि आमदारांच्या ‘फाईल’ तयार असल्याने ते परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत येतील याची शक्यता वाटत नसल्याने माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितले.

 

 

 

अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर सर्वांच्याच मनात शंका होती. शरद पवार यांचीची ही खेळी असल्याचे बोलले जात होते. तसे दावेही केले जात होती.

 

 

 

अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांना सोडून जातील यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. त्यामुळे सर्वत्र संभ्रमाची स्थिती होती.

 

 

 

आमच्याही मनात शंका होती. शरद पवार यांच्या रोखठोक भूमिकेमुळे संशयाचे मळभ दूर झाले आहे. भाजपच्या महायुतीत सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आता परत येतील याती सुतरान शक्यता दिसत नाही असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

 

 

 

राष्ट्रवादीत फूट पडली आहे हे स्पष्ट आहे. नेते विखुरल्या गेले हेसुद्धा तितकेच खरे आहे. मात्र अजित पवार यांच्यासोबत फक्त नेते गेले आहेत, तळागाळातील कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबतच आहे.

 

 

हेच कार्यकर्ते शरद पवार यांची ताकद आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसेल असे दिसत नाही.

 

 

 

शरद पवार यांनी पावसात घेतलेल्या सभेने महाराष्ट्राचे राजकीय चित्र कसे पालटले होते हे सर्वांनाच ठावूक आहेत याकडेही अनिल देशमुख यांनी लक्ष वेधले.

 

 

सध्याच्या राजकीय घडामोडी व तोडफोडीच्या राजकारणावर बोलताना देशमुख यांनी पुढाऱ्यांना सोईची भूमिक घ्यावी लागते. त्यानुसार त्यांची भाषा कशी बदलते हे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका मुलाखतीचा दाखला दिला.

 

 

 

मोदी यांनी शरद पवार यांचा उल्लेख शेतकऱ्यांचा मसिहा असा केला होता. याशिवाय एका लेखात शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांनी

 

 

 

शेतकऱ्यांना शेतमालाचे भाव वाढवून दिले होते, शेतकऱ्यांविषयी त्यांना आस्था आहे, शेतकऱ्यांप्रती कटिबद्ध आहेत असेही मोदी यांनी म्हटले होते.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *