इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाची झळ पुण्यापर्यंत

The Iran-Israel-America war has reached Pune.

 

 

गेल्या सात दिवसांपासून इस्त्रायल आणि अमेरिका एकत्रितपणे इराणवर हल्ला करत आहेत. आता हे युद्ध टोकाला पोहोचत आहे. सतत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले जात आहेत.

शिंदेंनी दिली कबुली, इराणने माझं विमान पाडण्याचा इशारा दिला होता

त्यामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण पाहायला मिळत आहे. या युद्धात इराणचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत जवळपास 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

 

या तीन देशांमध्ये सुरु असलेल्या देशाचा जगावर परिणाम होताना दिसत आहे. महाराष्ट्रावर देखील याचा परिणाम होत आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊया…

राहुल गांधींचा शब्द खरा ठरला ,अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची ‘तात्पुरती परवानगी

इराण हा जगातील प्रमुख तेल आणि गॅस उत्पादक देशांपैकी एक आहे. युद्ध अधिक तीव्र झाल्यास, तेल-गॅस पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते.

 

याचा थेट परिणाम कच्च्या तेल आणि एलपीजी (LPG) किमतींवर होतो, ज्याच्या झळा आता भारतात जाणवू लागल्या आहेत. विशेषतः महाराष्ट्रात व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा प्रभावित झाला आहे.

 

युद्धामुळे मध्य पूर्वेतील पुरवठा प्रभावित झाल्याने, पुण्यात व्यावसायिक (कमर्शियल) एलपीजी सिलेंडरचा पुरवठा बुधवारपासून (५ मार्च २०२६) थांबवण्यात आला आहे.

अधिवेशनात आमदाराची तब्बेत बिघडली ,रुग्णालयात हलवले

घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बीपीसीएलच्या शिक्रापूर प्लांट आणि एचपीसीएलच्या चाकण प्लांटमध्ये व्यावसायिक सिलेंडर भरून देणे बंद करण्यात आले आहे. डीलर्सना सूचना देण्यात आली आहे की, व्यावसायिक सिलेंडरसाठी गाड्या पाठवू नयेत. पुढील आदेश येईपर्यंत थांबा.

 

“प्रिय डीलर्स, युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल वापराचा गॅस पुरवठा तात्पुरता थांबवण्यात येत आहे. सिलेंडर्स घेऊन जाण्यासाठी पुढील सूचनेपर्यंत कृपया गाड्या पाठवू नका. परिस्थिती सुधारली की त्वरित कळवले जाईल” असे सांगण्यात आले आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पातील फडणवीसांच्या मोठ्या घोषणा

व्यावसायिक गॅस सिलेंडर मुख्यतः कुठे वापरले जातात?

-हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅफे, धाबे आणि केटरिंग सर्व्हिसेस

-बेकरी, मिठाई दुकाने

-हॉस्पिटल्स आणि ऑफिस कँटीन

-सेरॅमिक्स, वस्त्रोद्योग, धातू वितळवणारे कारखाने, पावडर कोटिंग युनिट्स इ.

 

२०२५ मध्ये इराण-इस्रायल संघर्ष आणि इराण-समर्थित गटांशी झालेल्या घटनांमुळे इस्रायलने इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमतेवर वारंवार इशारे दिले होते.

मोठा दावा:अजित पवार यांचा अपघात जाणीवपूर्वक घडवून आणला?

इराणने मात्र हे इशारे फेटाळले आणि आपला अण्वस्त्र-संबंधित कार्यक्रम सुरू ठेवला. अखेर, इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानसह विविध ठिकाणी हल्ले चढवले,

 

ज्यामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला. यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या झाल्याचेही अहवाल आहेत.

राजीनाम्याबाबत माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मोठे वक्तव्य

सरकारकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. घरगुती गॅस आणि इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,

 

पण युद्ध कालावधी वाढल्यास किमती आणि पुरवठ्यात अधिक अडचणी येऊ शकतात. परिसरातील लोक आणि व्यावसायिकांनी पर्यायी व्यवस्था करावी, अशी सूचना दिली जात आहे.

उमराह साठी सौदी अरेबियाला गेलेले 50 हजार महाराष्ट्रातील मुस्लिम बांधव युद्धामुळे अडकले

 

Related Articles