युद्धामुळे गॅस टंचाई आता मोबाईल नेटवर्कही गायब ?
Gas shortage due to war, now mobile network also missing?

पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक एलपीजी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारतही याला अपवाद नाही. कतार भारताला बहुतांश गॅस पुरवठा करतो, परंतु या आखाती देशानेही आता पुरवठा थांबवला आहे.
सरकारकडून घरगुती सिलिंडरच्या नियमात महत्त्वाचा बदल
यामुळे देशात गॅस संकट निर्माण झाले आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या अनुपलब्धतेमुळे रेस्टॉरंट उद्योगाला मोठे नुकसान होत आहे. घरगुती सिलिंडरलाही समस्या भेडसावत आहेत.
या सगळ्यात एलपीजी’च्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आणखी एका उद्योग क्षेत्राला याचा फटका बसू शकतो अशी माहिती समोर आली आहे.
इराण-इस्रायल संघर्षाचा परिणाम केवळ स्वयंपाकघरातील गॅसपर्यंत मर्यादित न राहता, आता दूरसंचार क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीवरही होऊ लागला आहे. एलपीजी
रोहित पवार यांचा प्रफुल पटेल यांच्यावर थेट निशाणा
आणि एलएनजी पुरवठ्यात होणाऱ्या व्यत्ययामुळे टेलिकॉम टॉवरच्या उत्पादनावर आणि नवीन टॉवर बसवण्याच्या योजनांवर नकारात्मक परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
देशातील एलपीजी पुरवठ्यातील तुटवड्याचा मोबाईल आणि इंटरनेट सेवांवर परिणाम होऊ शकतो. असे टेलिकॉम टॉवर उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांकडून सांगितले जात आहे.
डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर्स असोसिएशन (डीआयपीए), डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर उद्योग संघटनांनी दिलेल्या माहितीनुसारस, सरकारी आदेशानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी टेलिकॉम टॉवर उत्पादक कंपन्यांना एलपीजी पुरवठा थांबवला आहे.
सरकारकडून घरगुती सिलिंडरच्या नियमात महत्त्वाचा बदल
सध्याच्या भू-राजकीय परिस्थिती आणि इंधन संकटामुळे मोबाइल आणि इंटरनेट सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांना सध्या फक्त घरगुती ग्राहकांना एलपीजी पुरवठा करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.
टेलिकॉम टॉवर उत्पादन प्रक्रियेत गॅल्वनायझेशनचा समावेश आहे, ज्यासाठी एलपीजी किंवा गॅस-आधारित इंधन आवश्यक आहे. यामुळे, टेलिकॉम टॉवर उत्पादक कंपन्यांना एलपीजीचा सतत पुरवठा आवश्यक आहे आणि आता हे थांबले आहे,
डोनाल्ड ट्रम्प आले गुडघ्यावर ,अमेरिका-इराण युद्ध थांबण्याचे संकेत
टॉवर उत्पादन युनिट्सना अडचणी येत आहेत. ही परिस्थिती दीर्घकाळ चालू राहिल्यास, टॉवर उत्पादन विस्कळीत होऊ शकते, ज्यामुळे मोबाइल आणि इंटरनेट सेवांवर परिणाम होऊ शकतो.
संघटनेने (DIPA) या प्रकरणात दूरसंचार सचिव अमित अग्रवाल यांच्याकडे तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
इराण-इस्रायलच्या युद्धामुळे भारतात ECA कायदा लागू , नेमकं काय आहे कायदा
संघटनेच्या म्हणण्यानुसार, तेल विपणन कंपन्यांकडून टेलिकॉम टॉवर उत्पादक कंपन्यांना एलपीजीचा पुरवठा ५ मार्च २०२६ पासून बंद करण्यात आला आहे.
यामुळे टॉवर उत्पादक युनिट्ससाठी गंभीर ऑपरेशनल समस्या निर्माण झाल्या आहेत. DIPA ने इशारा दिला की जर ही परिस्थिती दीर्घकाळ चालू राहिली तर प्लांट्सना उत्पादन पूर्णपणे थांबवावे लागू शकते. असे प्लांट्स पुन्हा सुरू करण्यास बराच वेळ लागतो, ज्यामुळे टॉवर उत्पादनावर बराच काळ परिणाम होऊ शकतो.
एकट्या बीड जिल्ह्यात २.८३ लाख लाडक्या बहिणींना योजनेतून वगळले







