फारुख अब्दुल्लांवर जीवघेना हल्ला,हल्लेखोराला अटक ,पाहा LIVE VIDEO
Fatal attack on Farooq Abdullah, attacker arrested, watch LIVE VIDEO

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला, एका लग्नसमारंभमध्ये सहभागी झालेल्या फारुख अब्दुल्लांवर जवळच उभ्या असलेल्या व्यक्तीने गोळीबार केला.
मात्र दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला. मात्र या हल्ल्यामुळे जम्मू काश्मीरसह राजकीय वर्तुळातून नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराने 20 वर्षापासून त्यांना मारण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा धक्कादायक दावा केला आहे.
जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला जम्मूच्या ग्रेटर कैलाश भागात एका वकिलाच्या लग्नाला उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक देखील होते.
मात्र त्यांच्याच सोबत चालत असलेल्या घोळक्यामधून हल्ला करण्यात आला. कमल सिंग जामवाल असे हल्लेखोराते नाव आहे.
जवळच असलेल्या सुरक्षा रक्षकाने 63 वर्षीय हल्लेखोराला ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्यात आली आहे. या गोळीबार प्रकरणाचा तपास पोलीस करत असून हल्लेखोराची कसून चौकशी केली जात आहे.
फारुख अब्दुल्लांवर हल्ला करणारा हल्लेखोर कमल सिंग जामवाल याने अनेक धक्कादायक दावे केले आहेत. तो म्हणाला की, “माझ्याकडे असणाऱे अग्निशस्त्र हे माझेच आहे.
या शस्त्राचा माझ्याकडे परवाना देखील आहे. गेल्या 20 वर्षांपासून मी त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करतोय. हा माझा वैयक्तिक अजेंडा आहे. दैव बलवत्तर म्हणून ते काल वाचले,” असा खुलासा हल्लेखोर कमल सिंग जामवाल याने केला आहे.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे संरक्षक डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्यावर लग्न समारंभामध्ये हल्ला झाला. या जीवघेण्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.
यामध्ये त्यांच्यासोबत चालत असलेल्या व्यकीनेच गोळीबार केला असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. मात्र गोळी त्यांना छाटून गेली. यावेळी आसपास असलेल्या लोकांनी हल्लेखोराची धरपकड केली.
तसेच या घटनेवेळी जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी देखील त्यांच्यासोबत होते. सुरिंदर चौधरी यांना शस्त्रांच्या तुकड्यांमुळे किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना देखील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
एक शादी समारोह में Farooq Abdullah पर फायरिंग, बाल-बाल बचे। उस वक्त डिप्टी सीएम Surinder Choudhary भी साथ थे।
हमलावर कमल सिंह जामवाल गिरफ्तार।
सवाल उठता है—जब पूर्व मुख्यमंत्री ही सुरक्षित नहीं, तो आम जनता की सुरक्षा किस भरोसे? #Jammu #FarooqAbdullah pic.twitter.com/a6M4QH6eyL
— Ashfaq Joiya (@ashpak_Hussain7) March 11, 2026








